Репост из: 🎯 Study Katta 🎯
🔸राज्यात सौरऊर्जेवरील पहिली सूतगिरणी परभणीत
परभणी तालुक्यात जय भवानी महिला सहकारी सूतगिरणीच्या उभारणीला लवकरच आरंभ होत असूून सौरऊर्जेवर चालणारी ही राज्यातील पहिली सूतगिरणी ठरणार आहे. त्याचप्रमाणे सहकार तत्त्वावरील मराठवाडय़ातील पहिली महिला सूतगिरणी म्हणूनही या गिरणीची नोंद होणार आहे.
परभणी जिल्ह्यत दरवषी कापूस लाखो क्विंटल कापूसाचे उत्पादन होते. ज्या भागात कापूस पिकत नाही अशा सांगोला, इचलकरंजी, कोल्हापूर या भागात सहकारी तसेच खासगी सूतगिरण्या संपूर्ण क्षमतेने चालतात मात्र परभणी जिल्ह्यत सूतगिरणी का चालत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्याची कारणे राजकीय नेतृत्वाचा नाकर्तेपणा आणि जिल्ह्यतील सहकाराच्या अधोगतीत आहेत, मात्र या प्रश्नावर उत्तर शोधण्याचा सकारात्मक प्रयत्न आमदार राहुल पाटील यांनी केला आहे.
तेच या सूतगिरणीचे प्रवर्तक आहेत. एरंडेश्वर, नांदगाव शिवारात ही सूतगिरणी साकारत आहे. ही सूतगिरणी २५००० चकत्यांची असून हा प्रकल्प शंभर कोटी रुपयांचा आहे. त्यासाठी यंत्रसामग्री आयात केली जात आहे.