Current Affairs Daily 5 Questions


Гео и язык канала: не указан, не указан
Категория: не указана


Current affairs Daily 5 Question by LOKNITI IAS , By Gajanan Deshmukh Sir
स्पर्धा परीक्षा चालु घडामोडी विषयाची तयारी दर्जात्मक प्रश्र्नांच्या आधारे करण्यासाठी महत्त्वाचे चॅनल. आपल्या मित्रांनाही शेअर करा.
शंका/सुचना/विचारा- @easywaytoask

Связанные каналы

Гео и язык канала
не указан, не указан
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


#UPSC/MPSC #LOKNITI_IAS
परीक्षेला 2/3 महीने राहीले असताना युट्युब व्हिडीओस, टेलिग्राम चॅनल अपडेट्स, वाट्स्सप ग्रुप डिस्कशन इत्यादीचा आणि पर्यायाने मोबाईल चा वापर कमीत कमी करणे अपेक्षित आहे

सततचे नोटीफिकेशन्स मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि बैचेन करीत राहतात, मोबाइलच्या वापरतात परीक्षार्थी इतके आकंठ बुडुन जातात की त्यांना बहुमोल वाया गेलेला वेळ लक्षातही येत नाही.

दर एक तासांनी समजा 15 मिनिटे मोबाईल वापरला तर दिवसांत साधारणपणे 180 मिनिटे आणि 5400 मिनिटे एक महीन्यात वाया जातात, दररोज आपल्याला नवीन 24 तास जिंकण्यासाठी मिळतात, स्वतःवर काम करण्यासाठी मिळतात, ते मोबाईल वर खर्च करु नका.

समाज माध्यामांचा सततचा वापर आपल्यासाठी माहितीचा पुर घेऊन येत असला तरी या पुरात आपण इतंक दुर वाहून जातो की आपल्या नावीन्यपूर्ण आणि सृजनशील विचारसरणीवर पाणी फिरते. आपली एकाग्रता हळुहळु नष्ट होते, मेंदुची आकलनक्षमता कमी होत जाते, जलद निर्णय क्षमता क्षीण होत जाते, यासर्वच गोष्टींमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो, आपली प्रोडक्टव्हीटी कमी होत जाते पर्यायाने आपण अनिश्चिततेत्या नौकेत दिशा भरकटल्यासारखे चौफेर घुटमळत राहतो. हे सगळे सुरु होते मोबाईल च्या सतत वापरण्याच्या सवयीमुळे त्यामुळे मोबाईल वापरण्यावर काही शिस्त लावली पाहिजे, दिवसभरातून फक्त अर्धा तासच मोबाईल वापरायला हवा.

मोबाईलचा कमी वापर आपल्याला परीक्षेत अधिकाधिक जास्त गुण मिळवून द्यायला खुप मदत करेल. त्यामुळे आतापासूनच मोबाईल वापरावर बंधने घाला, आॅनलाईन स्टडी मटेरियल शोधत बसण्यापेक्षा टेक्स्ट मटेरियल वर अधिक फोकस करा. चांगला रिझल्ट येईल.

- टिम लोकनीति
@mpscnavimumbai

अभ्यासात सातत्य ठेवा, नक्की सिलेक्ट व्हाल!!!


पुतळ्याची उंची 182.


Daily5CA_LOKNITI.20.01.2020.pdf
600.8Кб
Daily5CA_LOKNITI.20.01.2020.pdf


🏆SUCCESS🏆

🏆S- Set a definite Goal. (First be clear what you want. Sit calmly think for few minute, fix the definite target. Write it on your vision board what you can see every day.)

🏆U- Unite your Tools. (Now decide what are the required tools {It may be money, time, things or man power} to achieve the goal. Arrange all the tools by which you can get right things at right time.)

🏆C- Calculate the Time limit. (Everything is valuable at right time. So fix the time deadline. Before which date you want to achieve it. Write the date under your goal.)

🏆C- Commence Now. (Well begun is half done. No time is wrong for a right work. Never wait for a perfect time, now take the time and make it perfect. “Do it now” is the best formula to achieve any goal.)

🏆E- Energize your Power. (Everything is interested at starting and just before the ending. But in the middle time most of the people make delay. So never lose your enthusiasm. Work when others are taking rest. “The best is possible when the rest is impossible”. Always take rest through your work.)

🏆S- Strive up to End. (“Never, Never, Never Quit” this is winning formula of Winston Churchill to win the world war. It is best reason to fail is “Don’t do up to end”. We know that Thomas Alva Edison invented the electric bulb after 10000 times of failure. So never quit and keep patience for ending. It gives result what you are searching.)

🏆S- Succeed the Success. (When hard work in proper track is your tools then SUCCESS is your slave. Now enjoy the success or get ready to go towards another goal)










४५ बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नियुक्तीस मान्यता - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती

बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी 'एमपीएससी'कडून शिफारसप्राप्त 45 उमेदवारांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगास विभागातील 45 रिक्त पदे भरण्यासाठी मागणी पाठविली होती. त्यानुसार आयोगाकडून 45 बाल विकास प्रकल्प अधिकारी (वर्ग-2) पदांसाठी शिफारशी प्राप्त झाल्या होत्या. या 45 रिक्त पदांवर शिफारसप्राप्त उमेदवारांची नियुक्ती करण्यास ॲड. श्रीमती ठाकूर यांनी मान्यता दिली.

ॲड. ठाकूर या महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा व कामकाजाचा आढावा घेत आहेत. त्यादरम्यान विभागातील मनुष्यबळ, रिक्त पदे, साधनसामुग्री तसेच विभागाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक बाबींची माहिती देखील त्या घेत आहेत. विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत व्हावा या दृष्टीने आगामी काळात विशेष प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.


2_5264891183405991392.pdf
89.8Кб
Emailing 2_5264891183405991392.pdf


*प्राधान्यक्रम ठरवताना*
राज्यसेवा 2019 साठी मुलाखतीला पात्र ठरलेल्या सर्वांचे सर्वप्रथम अभिनंदन,
मुलाखती पूर्वीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे पदांबाबत प्राधान्यक्रम ठरविणे. प्राधान्यक्रम ठरविताना अनेकदा मुलांचा गोंधळ उडतो, विविध पदांबाबत अनेक गैरसमज रूढ झाले आहेत. त्याचाही परिणाम होतो. जसे की, डिवायएसपी चे लवकर प्रमोशन होते. हे आजघडीला जरी खरे असले तरी केवळ प्रमोशन होते म्हणून
इच्छा नसताना डिवायएसपी पद वरती ठेवणे योग्य नाही. राज्यसेवेतून भरण्यात येणारी सर्वच पदे ही महत्त्वाची आहे. त्यामुळे प्राधान्यक्रम ठरविताना सर्वप्रथम आपला स्वभाव कसा आहे हे जाणून घेऊन त्याला योग्य पद कोणते ते बघणे जरूरी आहे. केवळ सगळे टाकतात म्हणून आपणही तेच पदे टाकू नका. दोन तीन वर्ष त्या पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यास प्रत्यक्ष भेट द्या. तुम्ही ज्या गावात शहरात आहात तेथील डीवायएसपी, तहसीलदार, BDO तसेच इतर सर्व शासकीय अधिकाऱ्यांची भेटी गाठी घेऊन कामाचे स्वरूप समजावून घेतल्यास त्याचा मुलाखतीस आणि प्राधान्यक्रम ठरविताना देखील निश्चितच फायदा होईल.
- विश्वास शिरसाट DC


Daily 5CA_LOKNITI.18.01.2020.pdf
579.7Кб
Daily 5CA_LOKNITI.18.01.2020.pdf




पसंतीक्रम ठरवितांना.........
१) आपली आवड कशात आहे ते ठरवा
जसे:- महसूलप्रशासन,पोलीसप्रशासन आणि विकासात्मक पोस्ट
२) पदसंख्या आणि आपल्या प्रवर्गानुसार उपलब्ध जागा
३) मागील काही वर्षांचा कटऑफ आणि आपले सध्याचे गुण
४) महत्वाचे म्हणजे आपण त्या-त्या पदावर काम करु शकतो का? हे तपासा.
५) बहुतेक विद्यार्थी आधीच ठरवून टाकतात मला क्लास १ मिळेल अथवा क्लास २ पोस्ट.मला पुढे अभ्यासासाठी वेळ मिळेल का? जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत कोणतेही अंदाज बांधू नका.
६) मलाईदार पोस्ट,वर्दीचा दरारा,लोक साहेब म्हणतील का? माझ्या पोस्टला मानसन्मान,पब्लिक डिमांड आहे का? असे विचार असतील तर आहे तिथेच थांबा.तुमची इथे गरज नाही.
७) महिलांसाठी सुरक्षित पोस्ट असे काही नसते.राज्यसेवेची प्रत्येक पोस्ट जबाबदारीची आहे.जोखीम सगाळीकडे आहे.
८) आपली आवड आणि पसंती यातील फरक ओळखा.
९) मित्राचा पसंतीक्रम,प्रेयसी/बायको/प्रियकर/नवरा,सिनिअर,क्लासेसचे शिक्षक,सूत्र यांचा प्रभाव असावा पण गरजेपुरता.आपल्याला काय झेपेल हे आपणच ठरवा.
१०) राज्यसेवेची प्रत्येक पोस्ट ही सारख्याच तोलामोलाची, मानसन्मानाची, रुबाबदार आणि जबाबदार आहे.




AMVI PRE 2020 ADVT 17012020 (1).pdf
575.2Кб
Emailing AMVI PRE 2020 ADVT 17012020 (1).pdf


Daily 5CA_LOKNITI.17.01.2020.pdf
585.1Кб
Daily 5CA_LOKNITI.17.01.2020.pdf


Daily5CA_LOKNITI.16.01.2020.pdf
568.9Кб
Daily5CA_LOKNITI.16.01.2020.pdf


Other side of Competitive exams

This morning started with the tragic news. MPSC mains result was declared and one young man, a friend of my brother committed suicide because his name was not in the PDF.

Life of an UPSC/MPSC aspirant is undoubtedly difficult. It is filled with uncertainty and stress. An anonymous existence bogged down by a joyless routine of mugging up information and revision, mess food and bed infested with bed bugs. Living in isolation, away from family and being constantly anxious.

A dream and regular day dreams of being a ”Saheb” becomes so overpowering that it shadows all other things which should be near and dear to us. How have we come to this situation? This glorification of civil services by society needs reevaluation. It s not the only thing which will make your life meaningful. It is not the only thing which will make you successful and happy. It is not the only thing which will make your parents proud of you. And it is definitely not a thing worth taking your life over.

Life is much greater than a competitive exam. It is not about being called a ”Saheb”. Its not about your posters in every chowk. It is not about your grand “miravnuk.”

Life is beyond that. We have not come on this earth only to become a government employee. We have not struggled in our years so that one exam would render our life meaningless. Our parents have not endured all hardships so they can see their child lifeless over some exam.

Your existence does not depend on other peoples’ approval or appreciation. It is mere incidental. A farmer, a construction worker, a teacher live their lives doing hard work. They contribute according to their capacity to the society without ever coming in the public gaze. They have a dignified existence without clearing any exam. Do not associate ideas of accomplishments, pride, honor with a government job. Pursue your dream but also be conscious about the larger picture. That is LIFE.

There is a joy in sharing a laugh with your family over dinner, there is a happiness in playing a game with your brothers and sisters, there is an intense fulfillment in loving someone and being loved, there is a pride in having friends who will never leave your side. There is a satisfaction in reading an amazing book. There is a peace in getting lost in the beauty of nature. Do not miss out any of these because you cannot clear an exam. It is not worth by any means.

A humble and practical advice to aspirants and parents. Please do not force yourself and your child into the myriad world of civil services examination. Be practical in assessing your capabilities, inclinations, passion and most importantly your aptitude for the exam. Have a solid back up plan if you decide to enter this world and do not bet everything you have in this gamble.

Make your priorities clear and do hard work. And if you fail even then, remember it’s a part of life. Accept it with dignity and grace and move on.

Best wishes to all my dear friends.


◆ *गेल्या दशकातील सर्व घटनादुरुस्तींचा थोडक्यात आढावा* -

● 95 वी घटनादुरुस्ती (2010) - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच अँग्लो इंडियन समाज यांच्या संसद व राज्य विधिमंडळ येथील आरक्षणास आणखी 10 वर्षे मुदतवाढ.

● 96 वी घटनादुरुस्ती (2011) - ओरिसा राज्याचे नाव ओडिशा तसेच ओरिया भाषेचे नाव ओडिया केले गेले.

● 97 वी घटनादुरुस्ती (2012) - सहकारी संस्था स्थापन करणे आता मूलभूत अधिकार तसेच सहकारी संस्थांबाबत नवीन भाग IX-B चा समावेश.

● 98 वी घटनादुरुस्ती (2013) - कर्नाटक राज्यातील हैद्राबाद-कर्नाटक भागासाठी अनुच्छेद 371-J अन्वये विशेष तरतुदी.

● 99 वी घटनादुरुस्ती (2015) - राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची स्थापना. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही घटनादुरुस्ती घटनाबाह्य ठरवली.

● 100 वी घटनादुरुस्ती (2015) - भारत व बांगलादेश यांच्यातील सीमावादाचा निपटारा करणे.

● 101 वी घटनादुरुस्ती (2016) - केंद्र तसेच राज्ये यांच्या एकापेक्षा अधिक अप्रत्यक्ष करांऐवजी संपूर्ण देशात एकच वस्तू व सेवा करार.

● 102 वी घटनादुरुस्ती (2017) - राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आयोगास घटनात्मक दर्जा.

● 103 वी घटनादुरुस्ती (2018) - आर्थिक मागासवर्गास शिक्षण तसेच नोकरी यांत 10 टक्के आरक्षण.

● 104 वी घटनादुरुस्ती (2019) - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या संसद व राज्य विधिमंडळ येथील आरक्षणास आणखी 10 वर्षे मुदतवाढ परंतु अँग्लो इंडियन आणखी आरक्षणास मुदतवाढ नाही.

Показано 20 последних публикаций.

329

подписчиков
Статистика канала