Dr_Aniruddha_Official


Гео и язык канала: не указан, не указан
Категория: не указана


📌 राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर -1
📌 राज्यसेवा पूर्व 📌 PSI-STI-ASO पूर्व व मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी भूगोल व इतिहास विषयाचे समग्र ज्ञान...
स्पर्धा परीक्षा सुप्रसिद्ध लेखक, समुपदेशक डॉ. अनिरुद्ध सरांचे टेलिग्राम चॅनेल...

Связанные каналы

Гео и язык канала
не указан, не указан
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций




महाराष्ट्रातील महिला समाजसुधारक सीरीज
भाग 1

🔰 रमाबाई रानडे...🔰

💥महत्त्वाच्या नोंदी👇👇

(१) नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी 'रमाबाईंनी सहधर्मचारिणी या नात्याने माधवरावांच्या सावलीप्रमाणे घालवली' अशा शब्दांत रमाबाईंच्या कार्याचा गौरव केला आहे.

(२) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आज स्त्रियांना ३३ टक्के जागा राखीव आहेत. महाराष्ट्रात तर ५० टक्के जागा स्त्रियांसाठी राखीव आहेत. विधानसभेत आणि लोकसभेतही स्त्रियांना ३० टक्के राखीव जागा
असाव्यात असे विधेयक मांडले गेले आहे. स्त्रियांना राखीव जागा असाव्यात, या आशयाचा विचार रमाबाईंनी शंभर वर्षांपूर्वी मांडला होता.

(३) डॉ. भांडारकरांसारखी श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्ती रमाबाईंचा उल्लेख 'पूज्य वहिनीबाईसाहेब' असा करीत असे.

(४) इ. स. १९०४ मध्ये भरलेल्या पहिल्या भारत महिला परिषदेचे अध्यक्षपद रमाबाई रानडे यांनी भूषविले होते.

(५) रमाबाईंनी केलेले व्यापक समाजकार्य लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने सन १९१३ मध्ये त्यांना 'कैसर-इ-हिंद' ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला.

(६) केसरीचे संपादक न. चिं. केळकरांनी रमाबाईंच्या कार्याचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना म्हटले की, "न्यायमूर्ती रानडे गेल्यानंतरही पुण्याला जो पोरकेपणा भासला नाही, तो रमाबाईसाहेबांच्या निधनाने आता भासू लागेल."

(७) महात्मा गांधी रमाबाईसंबंधीच्या मृत्यूलेखात म्हणतात, “श्रीमती रमाबाई रानडे यांचा मृत्यू ही मोठी
राष्ट्रीय हानी आहे. हिंदू गतभर्तृकात दिसून येणाऱ्या गुणांनी रमाबाईंमध्ये परिणत रूप धारण केले होते.
त्यांचे लोककल्याणाचे कार्य स्त्रियांपुढे आदर्श म्हणून राहील.'

संदर्भ : महाराष्ट्रातील समाजसुधारक (लेखक : डॉ. अनिरुद्ध)
पृष्ठ क्र. ७१

Join : @Dr_Aniruddha_official




📌 राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर -1
📌 राज्यसेवा पूर्व 📌 PSI-STI-ASO पूर्व व मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी भूगोल व इतिहास विषयाचे समग्र ज्ञान...

स्पर्धा परीक्षा सुप्रसिद्ध लेखक, समुपदेशक डॉ. अनिरुद्ध सरांचे Official टेलिग्राम चॅनेल...

Join 👉 T.me/Dr_Aniruddha_official

Показано 4 последних публикаций.

33

подписчиков
Статистика канала