📚MPSC_STUDY WORLD 📖


Гео и язык канала: не указан, не указан
Категория: не указана


दररोजच्या 📖चालु घडामोडी आणि सर्व परिक्षा विषयी माहिती पाहण्यासाठी आताचं 👇भेट द्या.
https://mpscstudyworld.blogspot.com
follow Facebook page 👇
https://www.facebook.com/Mera-Education-106339141118787/
🎯Join us : @Mpsc_studyworld

Связанные каналы

Гео и язык канала
не указан, не указан
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


भारत छोडो आंदोलन 1942 माहिती | Bharat Chhodo Bndolan 1942 :


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✔ ब्रिटिश सरकारने 1935 चा भारत सरकारचा कायदा लागू केला. नव्या कायद्याअंतर्गत भारतात निवडणुका प्रांतिक सरकारे स्थापन झाली. सप्टेंबर 1939 ला दुसऱ्या महायुद्धास सुरूवात झाली. महायध्दात पाठिंबा द्यावयाचा की नाही या संदर्भात कॉंंग्रेेस आणि ब्रिटिश सरकारांत मतभेद होऊन कॉग्रेसच्या सर्व प्रांतिक मंत्रिमंडाळांनी राजीनामे देेऊन स्वातंत्र्याचा लढा चालू ठेेवला.

✔ युद्धकाळात भारतीयांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सरकारने 8 आ‍ॅॅगस्ट 1940 ला आ‍ॅगस्ट घोेषणा करून हिंदुस्तान वसाहतीचे स्वराज्य देणे हेे इंग्लंंडचे धोरण राहील अशी घोषणा केली. ब्रिटिशांनी पूर्ण स्वातत्र्याची मागणी डावलल्यामुळेे कॉंंग्रसने आपलेे आंदोेलन युद्धकाळातही सुरुच ठेवले.


✔ मुंबई कॉंंग्रस समितीची बैठक 15 व 16 सप्टेंबर 1940 ला होऊन वैयक्तिक सत्याग्रह कार्यक्रम आखण्याचे महात्मा गांधीजींनी घोषित केले.

✔ 13 आ‍ॅक्टोबर 1940 च्या वर्धा बैठकित विनोबा भावे पहिले सत्याग्रही म्हणुन निवडले गेले. चळवळीने जोर धरला. परंतु जपानने भारताच्या सरद्दीपर्यंत धडक मारली. त्यामुुळे महात्मा गांंधीजींंनी लगेच ही चळवळ बंद केली.

✔ यावेळी ब्रिटिशांनी भारतीयांच्या सहकार्याची गरज असल्याने क्रिप्स योेजना भारतीयांच्या पुढे ठेवली. भारतातील बहुतेक पक्षांनी क्रिप्स योजना फेटाळली.

✔ 7 आ‍ॅगस्ट1942 राजी अखिल भारतीय कॉंंग्रेस कमिटीचे अधिवेशन मुंबई येथेे भरले. कॉंग्रसपुढे सरकार विरुध्द लढा सुरू करण्याखेरीज अन्य पर्याय राहिला नाही.

✔ अधिवेशानाच्या दुसऱ्या दिवशी 8 आ‍ॅगस्ट 1942 रोेजी छाेेडोे भारत अथवा चलोे जाव चा ठराव मांंडण्यात येऊन मंजूर करण्यात आला.
Chale Jao Andolan 1942 in Marathi

✔ 9 आ‍ॅगस्ट 1942 रोजी माहात्मा गांधी, पं. नेहरूनींं कॉंग्रसच्या 148 प्रमुख नेेत्यांना अटक करण्यात आली. परिणामी संपुर्ण देशात छोडो भारत आदोंलनास सुरुवात झाली. महाराष्ट्रातही या आंदोलनाने जोर धरला. अर्थात चलेजाव चळवळीला प्रत्यक्ष भूमिगत आंंदोलनाचे रूप मिळाले.


♦️आपत्ती व्यवस्थापन कायदा म्हणजे काय ?👇 (NDM Act, 2005)

🔸आपत्ती म्हणजे काय?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी किंवा अन्य प्रकारची हानी संभवते. बाहेरील मदतीची आवश्यकता भासण्याइतपत तीव्रता असणारी बाब म्हणजे आपत्ती.

🔸आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय?
नैसर्गिक आपत्ती(Natural Calamities)  मानव संसाधन (Human Resources), राष्ट्रीय संपत्ती( National Wealth),आणि अर्थव्यवस्था (Economy) संबधित कोणतीही आपत्ती आल्यानंतर अथवा आपत्ती येऊ नये म्हणून केलेली कार्यवाही म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्तीपूर्व काळासंबंधी आपत्ती प्रतिबंध यंत्रणा किंवा पूर्वतयारी तसेच नियोजन, संघटन, समन्वय व कार्यप्रणाली यांची योग्य अंमलबजावणी महत्वाची असते.

🔸आपत्ती व्यवस्थापन कायदा :-
भारतात १९९३ साली ओरिसा (ओडिशा)च्या चक्रीवादळानंतर केंद्र सरकारने एक समिती स्थापन करून धोक्यांचा आणि त्यापासून उद्भवणाऱ्या आपत्तींचा सर्वंकष अभ्यास केला. तसेच भारताने आपत्तिदरम्यान मदतकार्यासाठी व्यवस्थापनातील सगळे विभाग, शास्त्रीय संशोधनातील संस्था, शिक्षण संस्था आणि सामान्य जनसमुदाय तसेच बचावकार्य करणाऱ्या संस्था यांच्यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु २००४ साली आलेल्या त्सुनामीमुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा बनवण्याची निकड कळून चुकली.

🔸त्यानंतर संसदेत पारित झाल्यानंतर NDMA
👉२५ डिसेंबर २००५👈 साली राष्ट्रपतीने संमत केला. आपत्ती व्यवस्थापनाचे धोरण आणि आराखडा तयार करण्याची तरुतूद कायद्यात आहे.

🔸आपत्ती व्यवस्थापन कायदा कोण लागू करु शकतो?
कोणत्याही प्रकारची आपत्ती लागू करताना राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्तरीय समितीचे प्रमुख आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा निर्णय घेतात. राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान, राज्यपातळीवर मुख्यमंत्री, जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी हा निर्णय घेतात. 

भारतात आपत्ती व्यवस्थापनामध्ये खालील 4 समिती/संस्था महत्वाची भूमिका पार पाडतात.

🔸राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण(NDMA)-
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती तयार केली जाते ज्याचे कायमस्वरुपी अध्यक्ष पंतप्रधान असतात. पंतप्रधान 9 तज्ज्ञांची नेमणूक करतात येणाऱ्या आपत्तींबाबत माहीत देतात. राज्यस्तरावर या समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात. 

🔸राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM)-  राज्यस्तरीय प्रशिक्षक तयार करण्याचे काम ही संस्था करते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या गाईडलाईननुसार ही संस्था आपत्ती व्यपस्थापनची सर्व प्रशिक्षण देते. 

🔸राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल(NDRF) -
राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल  उभारण्यात आल्या असून आपत्ती नंतरच्या काळात काम करतो.  केंद्रशासनार्गंत निमलष्करी दल म्हणजे सीमा सुरक्षा दल( BSF) आणि इंडो-तिबेट सीमा पोलिस (ITBP) सारखे दल आपत्ती व्यवस्थापनासाठी पाठविल्या जातात. त्यांच्याकडे उपलब्ध असलेले आधुनिक संसाधनाचा वापर करुन आपत्ती निवारणाचे काम हे दल करतात. पुर, त्सुनामी, भूकंप कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यास निमलष्करी दल आपत्ती निवारण करते.  


🔸राज्य स्तरावर तत्सम दल (SDRF) -
 राज्य स्तरावर तत्सम दल उभाण्यात आली असून मुख्यमंत्री अध्यक्ष असतात. राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापनामध्ये मुख्य सचिव(Chief Secretary) यांच्या खालोखल सर्व विभाग प्रमुख असतात. आपत्ती आल्यानंतर राज्य स्तरावर तत्सम दलाने दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्याचे काम हे अधिकारी करतात. राज्यशासनाने अथवा केंद्रशासनाने घेतलेला निर्णय अतिमपातळीपर्यंत पोहचवून अंमलबजावणी करण्याचे काम हे अधिकारी करतात. आपत्ती आल्यानंतर या सर्व विभागांच समन्वय साधण्याचे काम राज्य स्तरावर तत्सम दल विभागामार्फत केले जाते. 

🔸आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यानंतर अधिकाऱ्यांना मिळणारे अधिकार..
- आवश्‍यकता भासल्यास खासगी जागा, वाहने,  सेवा, वस्तू अधिग्रहित करण्याचा अधिकार.
उदा. हॉस्पिटल, डॉक्टर, अँमब्यूलन्स
- आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारा निधी उभा करणे.
- आपत्ती बाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करणे. 
- आपत्ती व्यवस्थापनसाठी लागणारी मानवी संसाधन( Man Power) उभारणे.
- आत्यवशक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करणे.

🔸आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यानंतर अधिकाऱ्यांवरील जबाबदारी..
- आपत्ती बाबत जनजागृती करणे
- आपत्ती बाबत गोंधळाची निर्माण होऊ नये यासाठी दक्ष राहणे.
- आपत्तकालिन मदत आणि सेवा लोकांपर्यंत पोहचवणे.
- आपत्ती निवारणासाठी धोरण आखणे आणि अंमलबजावणी करणे.

🔸आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे व दंड :
कायद्यातील प्रकरण १० मधील कलम ५१ ते ५८ यांमार्फत आपत्ती व्यवस्थापनाशी निगडित विविध प्रकारचे गुन्हे व त्यांवर करावयाच्या कार्यवाहीची तरतूद आहे.
@Mpsc_studyworld


📚 चालू घडामोडी (30/06/2020)*📚
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🛑 *भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राइक… TikTok सह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी

◆ पूर्व लडाखमध्ये झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर सीमेवर तणाव असून, देशातून चीनला उत्तर देण्याचा सूर उमटत आहे. केंद्र सरकारनं सीमेवरील तणाव निवळण्यासाठी लष्करी चर्चा सुरू केली आहे.

◆ तर दुसरीकडे चिनी अ‍ॅपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्यांना देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता.

◆ त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

◆ काही दिवसांपूर्वीच भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात इशारा दिला होता.

◆ भारत सरकारने या अ‍ॅप्सवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांना ही ५२ चिनी अ‍ॅप्स वापरुन नये असा इशारा यंत्रणांनी दिला होता.

◆ ही ५२ अ‍ॅप्स सुरक्षित नसून, या अ‍ॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असंही यंत्रणांनी म्हटलं होतं.

◆ सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टिक-टॉकबरोबरच युसी ब्राऊझर, एक्झेण्डर, शेअरइट, क्लीन मास्टर यासारख्या अ‍ॅप्सचा समावेश होता.

◆ सीमेवरील तणाव व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी चिनी अ‍ॅपविषयी दिल्यानंतर केंद्रानं ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ भारताचं सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचं हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयानं माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९अ च्या अधिकाराचा वापर करत निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याचं केंद्र सरकारनं जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

★ परदेशातील यंत्रणांनीही व्यक्त केला होता धोका

◆ पाश्चिमात्य देशांमधील सुरक्षा यंत्रणांनाही अनेकदा चिनी कंपनीच्या मालकीच्या अ‍ॅप्सच्या वापरासंदर्भातील धोका आणि उघडपणे बोलून दाखवलेला आहे. एखाद्या देशासोबत वाद निर्माण झाल्यास या अ‍ॅप्सच्या माध्यमातून विरोधी देशाची संवाद यंत्रणा निकामी केली जाऊ शकते, असाही एक इशारा या अ‍ॅप्सबद्दल देण्यात आला होता.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🛑 *६ राफेल लढाऊ विमानांची तुकडी २७ जुलैपर्यंत भारतात* #Rafael #IAF #Defence

◆ सहा राफेल लढाऊ जेट विमानांची पहिली तुकडी भारताला २७ जुलैपर्यंत मिळण्याची शक्यता असून, यामुळे भारतीय हवाई दलाची लढाऊ क्षमता अधिक उंचावण्याची अपेक्षा आहे.

◆ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी २ जूनला त्यांच्या फ्रान्सच्या समपदस्थ फ्लोरेन्स पार्ली यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

◆ फ्रान्समधील करोना महासाथीचा परिणाम न होता राफेल जेट विमाने ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारताला दिली जातील, असे या वेळी त्यांनी सांगितले.

◆ या विमानाची पहिली स्क्वाड्रन हवाई दलाच्या सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या तळांपैकी अंबाला हवाई दल स्थानकात तैनात केली जाईल.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🛑 *चंदीगडमध्ये तात्काळ बॅटरी विनिमयाची सुविधा कार्यरत

◆ 26 जून 2020 रोजी पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक असलेले व्ही. पी. सिंग बदनोर यांच्या समवेत पेट्रोलियम, नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते व्हीडियो कॉन्फ्रेंसच्या माध्यमातून ‘बॅटरी विनिमयाची जलद देवाणघेवाण करणाऱ्या सेवेचे’ (QIS) चंदीगड येथे उद्घाटन करण्यात आले.

◆ बॅटरीच्या देवाणघेवाणीची ही पध्दत धीम्या गतीने बॅटरी चार्ज करण्यासाठी आणि उत्कृष्ट अशी असून त्यामुळे वाहनचालकांचा परिचलन वेळ वाचतो.

★ ठळक बाबी

◆ बॅटरी विनिमयाचे हे प्रारुप सध्या व्यवसायिक विभागासाठी म्हणजे विजेवर चालणारी वाहने, रिक्षा, विजेवर चालणाऱ्या दुचाकी आणि विजेवर चालणाऱ्या कारखान्यात तयार केलेली अथवा कारखान्याबाहेर तयार केलेल्या वाहनांसाठी उपलब्ध असणार आहे.

◆ इंडियन ऑईल कंपनीने निवडक शहरांतल्या त्याच्या किरकोळ विक्रीकेंद्रांतून विजेवर चालणाऱ्या वाहनांकरीता जलद बॅटरी विनिमयाच्या प्रारुपाची सोय करण्याची यंत्रणा उभी करून बघण्यासाठी सन मोबिलिटी या उद्योगासोबत अबंधनकारक सहकार्य करार केला आहे.

◆ इंडियन ऑईल विजेवर चालणाऱ्या गाड्या, रिक्षा, दुचाकी आणि अ‍ॅटोरिक्षा या वाहनांकरिता देशातल्या निवडक शहरांमध्ये 20 ते 25 क्विक इंटरचेंज स्टेशन (QIS) सुरू करून प्रायोगिक तत्वावर ‘स्मार्ट मोबिलिटी पोप्रायटी सोल्युशन्स’ (SMPLs) सुविधा उभी करण्याच्या विचारात आहे.

◆ नवी दिल्ली, गुरूग्राम, बेंगळुरू, चंदीगड, अमृतसर आणि इतर महत्वाच्या शहरां...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂




. 📚 *Today In History* 📚 .
दररोजच्या 📖चालु घडामोडी आणि सर्व परिक्षा विषयी माहिती पाहण्यासाठी आताचं 👇भेट द्या.
https://mpscstudyworld.blogspot.com


https://t.me/Mpsc_studyworld
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           ■  दिनांक :-  30/06/2020  ■
                        वार :-  मंगळवार 
         
          ■    दिनविशेष : 30 जून    ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

             ■  ठळक घटना/घडामोडी   ■

◆ १९९७ : ब्रिटनने चीनकडुन ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग बेटांच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.

◆ १९८६ : केन्द्र सरकार व मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.

◆ १९७८ : अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.

◆ १९७१ : सोयुझ-११ या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.

◆ १९६६ : कोका सुब्बा राव यांनी भारताचे ९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

◆ १९६५ : भारत व पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.

◆ १९६० : काँगोला (बेल्जियमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

◆ १९४४ : मुंबईच्या ’सेंट्रल’ सिनेमात ’प्रभात’चा ’रामशास्त्री’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात ललिता पवार या अभिनेत्रीवर खलनायिकेचा कायमचा शिक्‍का बसला.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

               ■   जन्म/वाढदिवस   ■

◆ १९६९ : सनत जयसूर्या – श्रीलंकेचा क्रिकेटपटू,जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ १९६६ : माईक टायसन – अमेरिकन मुष्टीयोद्धा

◆ १९४३ : सईद मिर्झा – दिग्दर्शक आणि पटकथालेखक

◆ १९२८ : कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्‍या ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू (मृत्यू: २४ ऑगस्ट २०००)

◆ १४७० : चार्ल्स (आठवा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ७ एप्रिल १४९८)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

        ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■

◆ १९९९ : कृष्णा बळवंत तथा कृ. ब. निकुंब – सहजसुंदर काव्याविष्काराचा प्रत्यय घडवणारे मराठी काव्यसृष्टीतील कवी (जन्म: ? ? ????)

◆ १९९७ : राजाभाऊ साठे – शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक, यांनी २५ वर्षे कै. राम मराठे यांच्याबरोबर संगीत सौभद्र नाटकात श्रीकृष्णाची भूमिका केली होती.

◆ १९९४ : बाळकृष्ण हरी तथा ’बाळ’ कोल्हटकर – नाटककार, कवी, अभिनेते, निर्माते, लेखक व दिग्दर्शक (जन्म: २५ सप्टेंबर १९२६)

◆ १९९२ : डॉ. वसंत कृष्ण वराडपांडे – साहित्यिक, वक्ते व समीक्षक (जन्म: ? ? ????)

◆ १९१७ : पितामह दादाभाई नौरोजी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय (जन्म: ४ सप्टेंबर १८२५).
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂


〰〰〰〰📕🔷📕〰〰〰〰
प्रश्न :-१- हिवाळी(शीतकालीन) आॕलिम्पिक स्पर्धांची सुरवात कोणत्या वर्षापासून झाली ?

१) १८९६
२) १९४८
३) १९२८
४) १९२४✅
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-२- आॕलिम्पिक म्युजियम कोठे आहे ?

१) चीन
२) स्वित्झर्लंड✅
३) रशिया
४) यूरोप
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-३- 'बनाना किक'हा शब्द कोणत्या खेळा संबंधित आहे ?

१) टेबल टेनिस
२) व्हाॕकी
३) फुटबाॕल✅
४) कबड्डी
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-४- 'ग्राउंड स्ट्रोक' हा शब्द कोणत्या खेळा संबंधित आहे ?

१) टेबल टेनिस✅
२) व्हाॕकी
३) डाॕज बाॕल
४) बेसबाॕल
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-५- 'अमेरिका कप'हा कोणत्या खेळा संबंधितआहे ?

१) टेबल टेनिस
२) व्हाॕली बाॕल
३) बास्केट बाॕल✅
४) बेसबाॕल
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-६- 'चायना कप' हा कोणत्या खेळा संबंधितआहे ?

१) जिम्नास्टिक✅
२) पोलो
३) गोल्फ
४) शतरंज
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-७- गोळा फेक मैदानामध्ये फेक प्रदेशाचा वर्तुळातील कोण किती अंश असतो ?

१) ३५.६५°
२) ४०°
३) ३४.९२°✅
४) ४५°
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-८- सवाई मानसिंह स्टेडियम कोठे आहे ?

१) जयपूर✅
२) कोलकत्ता
३) मुंबई
४) विशाखापट्टन
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-९- अष्टांग योग चे प्रथम अंग कोणते आहे ?

१) आसन
२) प्राणायाम
३) नियम
४) यम✅
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-१०- 'अंजली भागवत'ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

१) टेनिस
२) जिम्नास्टिक
३) रायफल शुटिंग✅
४) अॕथेलॕटिक्स

➖➖➖➖📗🔷📗➖➖➖➖

Показано 6 последних публикаций.

4

подписчиков
Статистика канала