🚩🚩PSI STI ASO & MPSC 2020 🚩🚩


Гео и язык канала: не указан, не указан
Категория: не указана


Mpsc PSI STI ASO Mahapariksha

Связанные каналы

Гео и язык канала
не указан, не указан
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций




Репост из: 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐃𝐇𝐀𝐖𝐀𝐋𝐄'𝐒 𝐌𝐀𝐓𝐇𝐒 𝐀𝐍𝐃 𝐑𝐄𝐀𝐒𝐎𝐍𝐈𝐍𝐆 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘
प्रति,
---------------------------------
---------------------------------
---------------------------------
विषय. - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा -२०२०’ पुढे ढकलण्याबाबत . . . .
संदर्भ - महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिरात क्र. १९/२०१९ दि. २३ डिसेंबर २०१९.
महोदय,
उपरोक्त संदर्भिय विषयांनव्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे “राज्यसेवा पूर्व परीक्षा – २०२०” ही दिनांक ५ एप्रिल २०२० रोजी घेण्यात नियोजित आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूने देशभर धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्र राज्यात दिनांक १९मार्च २०२० रोजी ४९ रुग्ण आढळले असून ही संख्या वाढतच जात आहे आणि भरपूर संशयित रुग्ण देखील उपचार घेत आहेत. या विषाणूचा फैलाव जोरात आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने ३१ मार्च २०२० पर्यंत सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि गर्दी टाळण्यास सांगितले आहे, याकरिता मुख्यशहरांमध्ये ‘संचारबंदी’ लागू करण्यात आली आहे. सर्व उमेदवाराच्या आरोग्याचा विचार करता आणि या विषाणूचा फैलाव टाळण्याकरिता ५ एप्रिल २०२० ची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.
आम्ही सर्व उमेदवार आपणास नम्र विनंती करतो की, वरील विषयाचा गांभीर्यपूर्वक विचार करावा. कळावे.
आपला आज्ञाधारक,

वरील ई-मेल सर्वांनी पाठवावा

मुख्यमंत्री - cm@maharashtra.gov.in

MPSC सचिव sec.mpsc@maharashtra.gov.in

राज्य मुख्य-सचिव cmmaha@bom3.vsnl.net.in

आरोग्यमंत्री- min.familywelfare@maharashtra.gov.in

MPSC office - support@mahaonline.gov.in
---------------------------------


Репост из: ExcellenceMpsc 📚
राज्यात 20 तारखेपासून होणार मेगाभर्तीला सुरवात




Репост из: राज्यसेवा परीक्षा २०१९
PSI STIASO Anskey Science 6.pdf
24.8Кб
संयुक्त पूर्व परीक्षा 2020

प्रश्नपत्रिका क्र.07 उत्तरतालिका.....

विषय : विज्ञान

#PSI / #STI / #ASO #Combinepre #CombinepreT20
#Science

Dnyandeep Academy

संयुक्त पूर्व परीक्षा मोफत टेस्ट सिरीज उपक्रम खालील लिंकवर राबविण्यात येत आहे, सहभागी होण्यासाठी क्रपया लिंकवर क्लिक करा आणि मोफत सहभागी व्हा......

https://t.me/joinchat/AAAAAEVjyt-EaxAk8emjHA


📚राज्य कामगार विमा योजना📚



भारतीय राज्य कामगार विमा योजना ही कामगार वर्गाला सामाजिक आर्थिक सुरक्षितता पुरविण्यासाठी तयार केलेली बहुमुखी सामाजिक सुरक्षितता प्रणाली असून त्या अंतर्गत त्यांचे अवलंबित सुद्धा समाविष्ट आहेत. कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना नोकरीच्या पहिल्या दिवसापासूनच संपूर्ण वैद्यकीय देखभाली बरोबरच विमाधारक व्यक्तीचे आजारपण, तात्पुरते किंवा कायमचे अपंगत्व, इत्यादीमुळे कमाईच्या क्षमतेत झालेली घट व विमाधारक महिला विविध तऱ्हेचे रोख लाभ मिळण्यास पात्र असतात. औद्योगिक अपघात किंवा सेवेतील इजेमुळे किंवा व्यावसायिक जोखीमिमुळे मृत्यू पावणाऱ्या विमा धारक व्यक्तीवर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना अवलंबित्व लाभ नावाने दरमहा निवृत्ती वेतन दिले जाते.

राज्य विमा योजनेचे वैशिष्ट्य असे की त्यातील अंशदान हे वर्गणीदाराच्या क्षमतेवर अवलंबून कामगारांना देय असणाऱ्या वेतनाची ठराविक टक्केवारीच्या स्वरुपात असते तर मिळणारा सामाजिक सुरक्षिततेचा लाभ हा प्रत्येकाच्या गरजेनुसार कोणताही भेदभाव न करता दिला जातो.

योजनेविषयी

राज्य कामगार विमा अधिनियम १९४८ अंतर्गत लागू करण्यात आलेली राज्य कामगार विमा योजना ही आरोग्य विमा योजनांची मातृयोजना आहे. सुरक्षिततेची भावना ही मनुष्य स्वभावात अनुस्युतच आहे. एकत्र कुटुंब पद्धती नष्ट होत चालल्यामुळे, औद्योगिकीकरण, व नागरीकरणामुळे आधुनिक काळात सुरक्षितता आवश्यक झाली आहे. १४ इस्पितळे, व ६१ दवाखान्यांद्वारे राज्य कामगार विमा योजना कामगार वर्गाच्या सेवेत कार्यरत आहे. महाराष्ट्रात सप्टेंबर १९५४ मध्ये ही योजना प्रथम लागू करण्यात आली. सध्या १८ जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू आहे.

अंमलबजावणी केलेल्या क्षेत्रांमध्ये कामगारांना एक वैद्यकीय व समान दराने रोख स्वरुपात अशा दोन पद्धतीने लाभ दिला जातो. दहा किंवा जास्त कामगार असणाऱ्या सर्व कारखान्यांना राज्य विमा योजना अधिनियमाअंतर्गत अंतर्भूत करण्यात आले आहे. वरील सर्व आस्थापनांमध्ये ह्या योजनेत पात्र होण्यासाठी रु १५०००/- ही कमाल वेतन मर्यादा (ज्यादा काम वगळून) आहे.


🌺🌺​ बेंगळुरूमध्ये दक्षिण भारतातले पहिले ‘भारतीय बँकनोट’ संग्रहालय🌺🌺

🔰 कर्नाटक राज्याच्या बेंगळुरू या शहरात प्रेस्टीज फाल्कन टॉवर्स या ठिकाणी “म्यूजियम ऑफ इंडियन पेपर मनी” या बँकनोटांच्या संग्रहालयाचे उद्घाटन उद्योजक रेझवान रझाक ह्यांच्या हस्ते करण्यात आले. हे देशातले द्वितीय तर दक्षिण भारतातले पहिले ‘भारतीय बँकनोट’ संग्रहालय आहे. पहिल्या संग्रहालयाची भारतीय रिझर्व्ह बँकेनी मुंबईत स्थापना केलेली आहे.

🔴सग्रहालयाची वैशिष्ट्ये

🔰 ब्रिटिशांना ‘भारत छोडो’ असा संदेश मिळाला होता अश्या स्वातंत्र्यपूर्व युगात चलनात असलेल्या नोटा, ‘जय तेलंगणा’ या राजकीय संदेशाला अनुसरून असलेल्या नोटा, 1000 रुपयांची नोट अश्या सर्व बँकनोटांचा समावेश या नव्या संग्रहालयात करण्यात आला आहे.

🔰 ब्रिटीश राजवटीआधीच देशात विकसित झालेल्या कागदी नोटांनी भरलेल्या या संग्रहालयात गेल्या 20 वर्षांच्या कालावधीतल्या 700 हून अधिक कलाकृती संग्रहित करण्यात आल्या आहेत.

🔰 सर्वात जुनी नोट म्हणजे 1812 साली प्रसिद्ध झालेली नोट होय. तसेच पोर्तुगीज सरकारने गोव्यामध्ये 1924 मध्ये प्रसिद्ध केलेल्या रु. 50 आणि रु. 500 इतके मूल्य असलेल्या नोटा देखील ठेवण्यात आल्या आहेत.

🔰 तिथे 10,000 रुपये इतके उच्च मूल्य असलेली पूर्वीची नोट देखील प्रदर्शनात ठेवली गेली आहे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


​🔷 मान कौर यांना नारीशक्ती पुरस्कार

- मान कौर यांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना सन्मानित करणार आहेत.

- 104 वर्षीय कौर यांनी वयाच्या 93 व्या वर्षी धावण्यास प्रारंभ केला होता.

- मान कौर पिंकाथॉनच्या ब्रँड ऍम्बेसिडर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मान कौर यांचे कौतुक केले आहे.


​🔷 अर्थ सचिवपदी अजय भूषण पांडे

- केंद्रीय अर्थसचिवपदी अजय भूषण पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे सध्या महसूल सचिव म्हणून कार्यरत आहेत. ते सध्याचे अर्थ सचिव राजीव कुमार यांची जागा घेतील.

- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने पांडे यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. पांडे हे 1984च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत.

- पांडे हे "युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया'च्या म्हणजेच आधारच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ओळखले जातात. या विभागात ते सप्टेंबर 2010 पासून तब्बल नऊ वर्षे कार्यरत होते. त्यानंतर त्यांची अर्थ खात्यात महसूल सचिवपदी निवड झाली होती.

- पांडे आयआयटी कानपूरचे पदवीधर आहेत. तसेच, त्यांनी मिनिसोटा युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, "पीएचडी'ही केली आहे.
————————————————


​🔷 राष्ट्रीय ललित कला पुरस्कार 2020

- राष्ट्रपती राम नाथ कोविंद ह्यांच्या हस्ते 4 मार्च 2020 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात 15 गुणवंत कलाकारांना 61वे ‘वार्षिक ललित कला अकादमी पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.

▪️स्वरूप
- विजेत्यांना पुरस्कारस्वरूपात थाळी, शाल आणि एक लक्ष रुपये रोख बक्षीस देण्यात आले.

▪️पुरस्कार विजेते कलाकारांमध्ये-
१) अनुप कुमार मनझुखी गोपी, २) डेव्हिड मलाकार, ३) देवेंद्र कुमार खरे,४) दिनेश पंड्या, ५) फारुक अहमद हलदर, ६) हरी राम कुंभावत,७) केशरी नंदन प्रसाद, ८) मोहन कुमार टी.,९) रतन कृष्ण सहा, १०) सागर वसंत कांबळे,११) सतविंदर कौर, १२) सुनील थिरूवायूर, १३ )तेजस्वी नारायण सोनावणे, १४) यशपाल सिंग १५) यशवंत सिंग यांचा समावेश आहे.

- या कलाकारांच्या कलाकृती 22 मार्च 2020 पर्यंत नवी दिल्लीत ललित कला अकादमीच्या कलादालनात 61 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनीत ठेवण्यात आल्या आहेत.

▪️ललित कला अकादमी

- ललित कला अकादमी याची स्थापना 5 ऑगस्ट 1954 रोजी एक स्वायत्त संस्था म्हणून करण्यात आली, ज्याला 1957 साली वैधानिक दर्जा दिला गेला.

- ललित कला अकादमी दरवर्षी कलेला आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कला प्रदर्शन आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करते
—————————————————


​🔷 नागरी उड्डयण क्षेत्रातल्या 100 टक्के थेट परकीय गुंतवणूकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

- नागरी उड्डयण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सरकारी एअर इंडिया लिमिटेड या कंपनीच्या बाबतीत गुंतवणुकीचे धोरण बदलण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळाने सध्याच्या थेट परकीय गुंतवणूक (FDI) धोरणात दुरुस्ती करण्यास मान्यता दिली आहे.

▪️ ठळक बाबी

- या निर्णयामुळे एअर इंडियामध्ये अनिवासी भारतीयांना स्वयंचलित मार्गाने 100 टक्के परकीय गुंतवणूकीला परवानगी देण्यात येणार.

- एअर इंडिया लिमिटेडच्या विद्यमान धोरणानुसार, एअर इंडिया या कंपनीमध्ये 49 टक्क्यांपेक्षा जास्त परकीय गुंतवणूकीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या परवानगी नाही आणि कंपनीमध्ये पुरेसे मालकी आणि प्रभावी नियंत्रण हे भारतीय नागरिकांना असावे अशी अट आहे.

- अनुसूचित हवाई वाहतूक सेवा / स्थानिक अनुसूचीत प्रवासी विमान कंपनीमध्ये अनिवासी भारतीयांना स्वयंचलित मार्गाने 100 टक्के गुंतवणूक करण्यास परवानगी असली तरी एअर इंडियाच्या बाबतीत ते प्रमाण 49 टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे.

- नव्या निर्णयामुळे एअर इंडियामध्ये सरकारचा कोणताही हिस्सा नसणार आणि ती संपूर्ण खासगी मालकीची बनणार. म्हणूनच, एअर इंडियाला परदेशी गुंतवणूकीच्या मार्गाने इतर अनुसूचित विमान कंपनींच्या श्रेणीत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गुंतवणूक, उत्पन्न आणि रोजगार यांच्या विकासाला चालना देणार्‍या सर्वात मोठ्या परदेशी गुंतवणूकीचा मार्ग मोकळा होणार.

▪️थेट परकीय गुंतवणूक (FDI)

- थेट परकीय गुंतवणूक (FDI) हा आर्थिक विकासाचा प्रमुख वाहक आहे आणि देशाच्या आर्थिक विकासासाठी कर्जविरहीत वित्तपुरवठ्याचा स्रोत आहे. सरकारने गुंतवणूकीसाठी अनुकूल FDI धोरण तयार केले आहे ज्याच्या अंतर्गत बहुतेक भागात/ कामांमध्ये स्वयंचलित मार्गाने 100 टक्क्यांपर्यंत FDI ला परवानगी देण्यात आली आहे.

- 2017-18 या वर्षात भारतात थेट परदेशी गुंतवणूक 60.97 अब्ज डॉलर एवढी झाली होती.
—————————————————


🦋 🦋कुपोषणमुक्त भारत तयार करण्याच्या उद्देशाने “सुपोषित माँ अभियान”...🦋 🦋

◾️भारतात कुपोषण निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सरकारच्या महिला व कुटुंब कल्याण मंत्रालयाने “सुपोषित माँ अभियान” राबविण्यास सुरुवात केली. लोकसभा सभापती ओम बिर्ला ह्यांच्या हस्ते या राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन राजस्थानच्या कोटा या शहरात करण्यात आले.

◾️या मोहिमेद्वारे किशोरवयीन मुली आणि देशातल्या गर्भवती महिलांना पोषक आहार प्राप्त व्हावा हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भावी पिढ्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या बळकट ठेवण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे.

⭐️योजनेचे स्वरूप...

◾️कार्यक्रमाच्या प्रारंभीक टप्प्यात 1 महिना आणि 12 दिवस या कालावधीत 1000 गर्भवती महिलांना संतुलित आहार दिला जाणार आणि आवश्यक चाचण्या, अल्ट्रासाऊंड, रक्त तपासणी यासारख्या सर्व वैद्यकीय खर्चाचा भार सरकार उचलणार आहे.

◾️गहू, हरभरा, मका, बाजरीचे पीठ, गूळ, डाळी, मसूर, तूप, शेंगदाणे, तांदूळ आणि खजूर इ. पौष्टिक वस्तू प्रत्येक कुटुंबातल्या एका गर्भवती महिलेस देण्यात येणार.
उद्घाटनाला 1000 गर्भवती महिलांना संतुलित आहार असलेल्या 17 किलोग्राम इतक्या वजनाच्या अन्न पदार्थांचे 1000 संच वितरित करण्यात आले.


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) (पूर्व) व (मुख्य) स्पर्धा परीक्षा योजनेसंदर्भात घोषणा...


🌺🌺 जागतिक वन्यजीव दिन World Wildlife Day🌺🌺

🔰 3 मार्च 1973 रोजी Covention on International Trade in Endangered Species (CITES) या करारावरती सह्या करण्यात आल्या या दिनाचे स्मरण म्हणून UN हा दिवस 2013 पासून साजरा केला जातो.

🔰 जगातील वन्यप्राणी & वनस्पती बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो.

🔰 आजपर्यंतच्या इतिहासात हा पहिलाच दिवस आहे, जो पाण्याखालील सृष्टीवर भर देतो.

🔴 2018 Theme: Big Cats Predators Under Threat

🔴 2019 Theme: Life Below Water For People & Planet

🔴 2020 Theme: Sustaining all life on Earth

🔴 Covention on International Trade in Endangered Species of Wild Fauna & Flora (CITES)

🔰 धोका असणार्‍या प्राणी आणि वनस्पतींचे संरक्षण करणारा करार

🔰 यालाच Washington Convention या नावानेही ओळखलं जाते.

🔰 3 मार्च 1973 रोजी या करारावर सह्या झाल्या तर 1 जुलै 1975 पासून याची अंमलबजावणी सुरू झाली.

🔰 सध्या भारतासह 183 देश सदस्य आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


⭐️⭐️ खेलो इंडिया स्पर्धेचा समारोप. ⭐️⭐️

🔰 खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचा समारोप ओदिशातल्या भूवनेश्वर इथं झाला. 

🔰 चंदीगढच्या पंजाब विद्यापीठानं १७ सुवर्ण, १९ रौप्य आणि १० कांस्य पदकांसह चॅम्पियन्स चषक पटकावला.

🔰 पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठानं १७ सुवर्ण, ११ रौप्य आणि ९ कांस्य पदकांसह दुसरा क्रमांक मिळवला. 

🔰 पतियाळाच्या पंजाबी विद्यापीठाला १३ सुवर्ण, ६ रौप्य, आणि १४ कांस्य पदकासह तिसरा क्रमांक मिळाला. या क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण ११३ विद्यापीठांनी भाग घेतला होता. 

🔰 काल शेवटच्या दिवशी झालेल्या स्पर्धांमध्ये भारतातली सर्वात जलदगतीनं धावणारी महिली द्युती चंद हिनं कलिंगा औद्योगिक तंत्रज्ञान संस्था प्रतिनिधीत्व करताना २०० मीटर धावण्याची शर्यत २३ पूर्णांक ६६ शतांश सेकंदात पूर्ण करुन सुवर्ण पदक पटकावलं.


​🔷 दिल्लीत 11 वी ‘राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (KVK) परिषद’ संपन्न झाली

- केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास व पंचायती राज मंत्री नरेंद्र सिंग तोमार ह्यांच्या हस्ते दि. 28 फेब्रुवारी 2020 रोजी 11 व्या ‘राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (KVK) परिषद’ या कार्यक्रमाचे उद्घाटन दिल्लीत झाले.

▪️कृषी क्षेत्रातले KVKचे योगदान

- कृषी क्षेत्रात संशोधन व विकास करण्यात कृषी विज्ञान केंद्राचा मोठा हातखंडा आहे. आतापर्यंत पिकांचे अनेक उत्तम वाण विकसित करण्यात आले आहेत.

- शिवाय मार्गदर्शनासाठी 171 मोबाइल अॅप तयार करण्यात आले आणि 3 लक्षाहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटर उघडण्यात आले आहेत.

- शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी ‘eNAM’ ही डिजिटल व्यासपीठ तयार करण्यात आले. आज यावर 585 मंडई उपलब्ध आहेत आणि आणखी 415 मंडई उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहेत.

- प्रत्येक विभागामध्ये किमान दोन फॉर्मर्स प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन (FPO) स्थापन करण्याचे केंद्र सरकारचे उद्दीष्ट आहे.

- 1974 साली पुडुचेरी येथे प्रथम कृषी विज्ञान केंद्र उघडण्यात आले. आज देशभरात 717 KVK कार्यरत आहेत
——————————————————


Репост из: MPSC टेस्ट सिरीज & PDF मटेरियल 2021-22
आर्थिक पाहणी अहवाल 2019 20.pdf
3.2Мб
विद्यार्थी मित्रहो 320 पानाचा आर्थिक पाहणी अहवाल२०१९- २० मराठी मध्ये १० pages मध्ये परीक्षाभिमुख करून देण्यात आलेला तब्बल सोळा तासाच्या प्रयत्नानंतर हा अहवाल मराठीमध्ये संक्षिप्त स्वरूपात तयार करण्यात आलेला आहे.

Join us: @eMPSCPuneTest


Репост из: Geography by Rani Jain


Репост из: 🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝘂𝗶𝗱𝗲𝗻𝗰𝗲 🚨
महाराष्ट्रात मेगाभर्तीमध्ये तब्बल एक लाख एक हजार पदांवर होणार भरती;अडीच महिन्यात भरतीला सुरवात मोठी घोषणा.


Репост из: 🎯MH Exam Guru🎯
सोलापूर तलाठी
निवड यादी प्रसिद्ध
👆👆👆👆👆👆👆

Показано 20 последних публикаций.

1 093

подписчиков
Статистика канала