📚Mission_PSI_STI_ASO📚


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


..Mpsc,PSI,STI,ASO Study Group
Excise SI, वनसेवा,कर सहायक, लिपीक-टंकलेखक,रेल्वे बोर्ड,कृषिसेवा..
२५जुन २०१९
@दैनंदिन चालू घडामोडी
@सामान्य अध्‍ययन
@गणित बुध्‍दीमता चाचणी

Связанные каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


📗📗नमस्कार मित्रांनो 📕📕
‼️ join us ‼️

‼️🤗🤗 महाराष्ट्रातील फेमस टेलिग्राम चॅनेल्स 🤗🤗‼️

📚📚 MPSC /मेगाभरतीचा अभ्यास 📖📖 करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे टॉपमोस्ट टेलिग्राम चॅनेल आजच जॉइन करा.👇👇👇👇

❊ʙεsᴛ ᴛᴇʟεɢʀᴀᴍ ᴄʜᴀɳɳεʟ (10000+)

🌷 @MissionMegaBharati2019

🌷 @Ni3Ahir

🌷 @NitinMahale

🌷 @Tricks_Funny_Tricks

🌷 @Career1995Nsk

🌷 @Megabharati72000

🌷 @NoblePublication69

🌷 @MayboliMarathi

🌷 @Science_MPSC

🌷 @SpardhaParikshaMarathi

🌷 @LakshyaVedh

🌷 @ChaluGhadamodiMPSC

🌷 @Mission_PSI_STI_ASO

🌷 @MahaMega

🌷 @NokariA2Z

❊❊▬▬▬▬▬▬▬▬❊❊
🔝11 hour

✅✅ वरील सर्व चॅनेल्स जॉईन करा आणि मित्रांना शेअर करा.. नक्कीच फायदा होईल ... ✅✅✅✅✅✅✅




शब्दांच्या जाती (shabdanchya Jati)


 १) विकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचनं,बदल होतो त्यासB विकारी शब्द म्हणतात.

१) नाम: प्रत्यक्षात

व्यक्ती वाचक संज्ञा :सीताराम,गोपाल.

जातीवाचक संज्ञा :गाव,नदी.

भाववाचक संज्ञा :लहानपण,धैर्य.

समूह वाचक संज्ञा :भीड,संघ .

द्रव्य वाचक संज्ञा :पाणी,सोना

सर्वनाम : नामाचा वारंवार उपयोग टाळण्यासाठी

पुरुषवाचक सर्वनाम : मी,तु.

निश्चय वाचक सर्वनाम : हे ,ते,त्या,

अनिश्चय वाचक सर्वनाम : कोणी,काही.

संबंध वाचक सर्वनाम : जो,जी ,जे .

प्रश्न वाचक सर्वनामे :का ?काय?कोठे ?कोण ?कोणाला ? कोणाचा ? कोणता ? केंव्हा ? किती ?

विशेषण : नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे .

गुण वाचक

विशेषण :लहान ,मोठा,सुंदर ,हुशार .

संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.

परिणामवाचक विशेषण :चांगला परिणाम ,वाईट परिणाम .

संकेत वाचक विशेषण :हे ,ते .

क्रियापद : एखादी क्रिया घडणे .

📌सकर्मक क्रियापद :
पाहणे ,खेळणे .

📌अकर्मक क्रियापद : 
हसणे ,रडणे.धावणे,

संयुक्त क्रियापद :आहे, होता, असेल .

२.अविकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचन,यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारी शब्द म्हणतात.

.क्रियाविशेषण :क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे .

स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा .

कालवाचक
क्रियाविशेषण :आज,काल .

परिणामवाचक
क्रियाविशेषण :जास्त,सर्व.

रितीवाचक क्रियाविशेषण : अचानक,हळूहळू ,जोरात .

२) शब्दयोगी अव्यव :नामाला व सर्वनामाला अर्थ बोध होण्यासाठी जोडून येणारा शब्द .स,ला,ना,ते ,आत ,बाहेत,जवळ,पुढे

३) उभयान्वयी अव्यय :दोन किंवा तीन वाक्य एकत्र करणारा शब्द .आणि ,पण,परंतु, किंवा .

४) केवळ प्रयोगी अव्यय : आपल्या मनातील विकाराला अभिव्यक्त केले जाणारे शब्द . वाह !, अरे !, छट !

जॉईन करा:-@Mission_PSI_STI_ASO


🌀🌀 ३० नोव्हेंबर - घटना दिनविशेष 🌀🌀
#DinVishesh

१८७२: हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.

१९१७: कलकत्ता येथे आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युटची स्थापना.

१९६१: १९५९ मध्ये प्रकाशित आल्हाद चित्रच्या सांगत्ये ऐका या बोलपटाने पुणे येथील विजयानंद सिनेमागृहात ५५१ दिवस चालण्याचा विक्रम केला.

१९६६: बार्बाडोसला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९९५: ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म संपल्याची अधिकृत घोषणा.

१९९६: ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.

१९९८: एक्सॉन आणि मोबिल यांच्यामध्ये ७३.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स चा करार झाल्यामुळे एक्सॉनमोबिल ही जगातील सर्वात मोठी कंपनी तयार झाली.

२०००: पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन एन्डेव्हर या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.

🌀🌀 ३० नोव्हेंबर – जन्म 🌀🌀

१६०२: जर्मन पदार्थवैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचा जन्म. (मृत्यू: २१ मे१६८६)

१७६१: हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १८१५)

१८३५: विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क ट्वेन यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९१०)

१८५८: भारतीय वनस्पती शास्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९३७)

१८७४: ब्रिटनचे माजी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १९६५)

१९१०: गोमंतकीय कवी बाकीबाब उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा खावार्डे, गोवा येथे जन्म. (मृत्यू: ९ जुलै १९८४)

१९३५: मराठी लेखक आनंद यादव यांचा जन्म.

१९३६: युथ इंटरनॅशनल पार्टीचे संस्थापक ऍबी हॉफमन यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९८९)

१९४५: पार्श्वगायिका वाणी जयराम यांचा जन्म.

१९६७: सामाजिक कार्यकर्ता राजीव दिक्षीत यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर२०१०)

🌀🌀 ३० नोव्हेंबर – मृत्यू 🌀🌀

१९००: सुप्रसिद्ध लेखक कवी आणि नाटककार ऑस्कर वाईल्ड यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८५४)

१९७०: जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर निना रिकी यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८८३)

१९८९: कॅमेरून देशाचे पहिले अध्यक्ष अहमदिऊ आहिदो यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९२४)

१९९५: साहित्यिक वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९१४)

२०१०: सामाजिक कार्यकर्ता राजीव दिक्षीत यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १९६७)

२०१२: भारताचे १२ वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१९)

२०१४: अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री जर्बोम गॅमलिन यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १९६१)




❄️❄️आसाममध्ये गुटखा आणि पान मसाल्यावर वर्षभरासाठी संपूर्ण बंदी❄️❄️

♦️आसाम राज्य सरकारकडून वर्षभरासाठी राज्यात गुटखा आणि पान मसाल्यावर संपूर्ण बंदी

♦️राज्य सरकारने अन्न सुरक्षा व सुरक्षा अधिनियम (Food Safety and Security Act), २००६ अंतर्गत आदेश पारित

🔰गुटखा, पान मसाल्यावरील बंदी :-

♦️निर्मिती, विक्री, वितरण, साठवण, प्रदर्शन आणि वाहतुकीस बंदी

♦️निकोटीन किंवा तंबाखूयुक्त इतर च्युइंग मटेरियलवरही बंदी

🔰आसाम आणि तंबाखू :-

♦️आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार, आसाम हे भारतातील सर्वाधिक तंबाखू सेवन करणारे चौथे राज्य

♦️२०१६-१७: केवळ पाच वर्षात ग्लोबल अ‍डल्ट टोबॅको सर्व्हे (Global Adult Tobacco Survey (GATS) नुसार, तंबाखू सेवनात ३९.३ % वरून ४८.२% पर्यंत वाढ

♦️तंबाखू वापराची पातळी ३४.६% वरून २८.६% पर्यंत कमी

♦️आसाममधील ४१.१% प्रौढांकडून धूररहित तंबाखूचे सेवनात ९% वाढ

🔰पार्श्वभूमी :-

♦️तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी आसाम सरकारकडून अनेक उपाययोजना

♦️आसाम आरोग्य (निर्मिती, विक्री, जाहिरात, साठा, वितरण तसेच जर्दा, गुटखा आणि तंबाखूयुक्त पान मसाला यांचे सेवन) विधेयक, २०१३ राज्यसभेत मांडले

♦️२०१४ मध्ये लवकरच ही बंदी लागू करण्याचा राज्याकडून निर्णय

🔰उद्दिष्ट :-

♦️अनेकांचे जीव वाचवण्यासाठी तंबाखूच्या वापरावर नियंत्रण ठेवणे


🌺🌺 वैश्विक मुत्सद्देगिरी निर्देशांक 2019🌺🌺

🔰सिडनीच्या लोवी इंस्टीट्यूट या संस्थेनी नुकताच ‘वैश्विक मुत्सद्देगिरी निर्देशांक 2019’ (Diplomacy Index) प्रसिद्ध केला आहे. या यादीत 61 देशांना क्रम दिला आहे.

🔰यादीत भारत 12 व्या क्रमांकावर आहे. 2019 साली भारताचे जागतिक पातळीवर 123 दूतावास आणि उच्च आयोग आणि 54 वाणिज्य दूतावास आहेत.

🔰वर्ष 2019 मध्ये, चीनचे जगात 276 दूतावास आणि वाणिज्य दूतावास असून हा देश या यादीत प्रथम स्थानी आहे तर द्वितीय क्रमांकावर अमेरिका आहे.


🌺🌺 विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसणारे उद्धव ठाकरे हे सातवे मुख्यमंत्री 🌺🌺

🔰विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना म्हणजेच आमदार नसताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे सातवे
मुख्यमंत्री ठरले आहेत.

🔰 तर वडील मुख्यमंत्री व मुलगा आमदार हे चित्रही महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रथमच दिसणार आहे.

🔰आता ते विधान परिषदेवर जाणार की
विधानसभा निवडणूक लढवणार
याबाबत उत्सुकता आहे.

1.बॅरिस्टर ए. आर. अंतुले,
2.वसंतदादा पाटील (१९८३),
3.शिवाजीराव पाटील निलंगेकर,
4.शरद पवार (१९९३),
5.सुशीलकुमार शिंदे,
6.पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेसच्या सहा
नेत्यांवर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा हे नेते विधान परिषद किंवा विधानसभा या उभय सभागृहांचे सदस्य नव्हते.

🔰नंतर ही नेतेमंडळी विधानसभा किंवा विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून
आले.

🔰उद्धव ठाकरे हे आता विधान परिषदेवर निवडून जाणार की विधानसभेवर याबाबत उत्सुकता आहे.

🔰विधान सभेवर निवडून जायचे झाल्यास शिवसेनेच्या एखादा आमदाराला त्यांच्यासाठी राजीनामा द्यावा लागेल आणि पोटनिवडणुकीत उद्धव यांना
विधानसभेवर निवडून जाता येईल.

🔰पुढील सहा महिन्यांत
विधानसभेच्या १२ जागांसाठी
निवडणूक होणार आहे. या वेळी
ठाकरे यांना वरिष्ठ सभागृहात प्रवेश
करता येईल.


▪ अवयवदानामध्ये देशभरात महाराष्ट्र अव्वल; दिल्लीत आयोजित कार्यक्रमात राज्याला ‘उत्कृष्ट राज्य’ पुरस्काराने केले सन्मानित

▪ हैदराबाद बलात्कार आणि हत्येप्रकरणी चारही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; देशभरातून संताप व्यक्त

▪ खेळण्याच्या गाडीच्या चाकात लपवले 18.6 लाख रुपये किंमतीचं सोनं; चेन्नई विमानतळावर एकाला अटक

▪ जीएसटीमुळे येणाऱ्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळेल- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

▪ दहशतवादाला अर्थपुरवठा केल्याच्या आरोप प्रकरणी हाफिज सईदवर लाहोरमध्ये 7 डिसेंबर रोजी सुनावणी होणार

▪ अ‍ॅमेझॉन खोऱ्यातील जंगलाला लागलेल्या भीषण आगीमुळे अमेरिकेच्या एंडिज पर्वतरांगेतील हिमनग लागले विरघळू

▪ शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी 8 जानेवारी रोजी ग्रामीण 'भारत बंद'; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची माहिती

▪ मुंबई वगळता महाराष्ट्रात एचआयव्हीचे 10 हजार 743 नवे रुग्ण आढळले; पुण्यात 1 हजार 506 नव्या रुग्णांची नोंद

▪ भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; लिअँडर पेसने दुहेरीत साजरा केला विक्रमी 44वा विजय


🎯 एक नजर एचआयव्ही जागतिक आकडेवारीवर

AIDS (Acquired Immune Deficiency Syndrome) एड्स म्हणजे एचआयव्ही जिवाणूंचा संसर्ग होणे. यामध्ये रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

माहितीनुसार, गेल्या काही वर्षात एचआयव्ही बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे निर्दशनास येत आहे. सध्या जगभरात एचआयव्हीची काय परिस्थती आहे? किती लोक बाधित आहेत? किती लोकांना नव्याने लागण झाली? किती लोक मृत्यूमुखी पडले? याबाबत जाणून घेऊयात...

unaids या संकेत स्थळानुसार एचआयव्हीची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.

● 37.9 करोड लोक एचआयव्ही (2018 अखेर) सह जगत होते.
● 17 लाख लोकांना एचआयव्हीची (2018 अखेर) नव्याने लागण झाली.
● 7 लाख 70 हजार लोकांचा एड्स-संबंधित आजारांमुळे (2018 अखेर) मृत्यू झाला.
● 3.2 करोड लोक साथीचे रोग (2018 अखेर) सुरू झाल्यापासून एड्सशी संबंधित आजारांमुळे मृत्यूमुखी पडले.

📝 NACO च्या आकडेवारीनुसार देशातील आकडेवारी अशी :

● देश : 82 हजार ते 1 लाखापर्यंत रुग्णांना एचआयव्हीची लागण
● राज्य : 21 हजारावर एचआयव्हीचे रुग्ण

🔎 रक्तसंक्रमणातून एचआयव्ही लागण झालेले रुग्ण : (2018-19)

● उत्तर प्रदेश : 241
● प. बंगाल : 176
● महाराष्ट्र : 169
● गुजरात : 139

🇮🇳 देशपातळीवरील आकडेवारी :

● 2016-17 : 1 हजार 541
● 2017-18 : 1 हजार 406
● 2018-19 : 1 हजार 342

एड्सचा विषाणू जगभरात पसरला कसा?:

एच.आय.व्ही/ एड्स बाबत आजही अनेक प्रश्न अनुत्तरित आहे. एड्स पूर्वी अस्तित्वात होता का? हा आजार नक्की आला कुठून आहे? याचा इतिहास काय आहे? आज याचा देखील विचार करूयात...

एड्सची उत्पत्ती ही 1980 साली झाली असून शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एड्सची उत्पत्ती ही किन्शासा शहरात झाली असून हे शहर आता कॉन्गो गणराज्याच्या नावाने ओळखले जाते.

असे म्हटले जाते कि, निर्मितीनंतर तब्बल 30 वर्षांनी या रोगाची माहिती झाली. ‘सायन्स जनरल’ या नियतकालिकात याबाबतचा संशोधन लेख प्रकाशित करण्यात आला होता. त्यानुसार, शास्त्रज्ञांनी एड्सच्या विषाणूच्या जेनेटीक कोडच्या नमून्यांचे संशोधन केले. यात हे विषाणू किन्शासा शहरात निर्माण झाल्याचे समोर आले होते.

वेशाव्यवसाय, वाढती लोकसंख्या आणि दवाखान्यात वापरली जाणारी सुई या गोष्टी एड्सचे विषाणू वाढवण्यास कारणीभूत आहेत.

माहितीनुसार, एड्स हा चिंपांजी व्हायरसचे परिवर्तित रूप आहे. हा सिमियन इम्युनोडिफिसिएंसी व्हायरसच्या नावाने ओळखला जातो. किन्शासा शहर हे बुशमीटची मोठी बाजारपेठ होती. त्यामुळे संक्रमित झालेल्या रक्तामुळे हा व्हायरस मनुष्याच्या शरीरात आला असण्याची शक्यता आहे.

हा व्हायरस विविध माध्यमातून पसरला. त्याने सुरुवातीला चिंपांजी, गोरिल्ला आणि शेवटी माणासाच्या शरिरात प्रवेश केला. दरम्यान एचआयव्ही-1 ने कॅमरून शहरातील लाखो लोकांना संक्रमित केले. त्यानंतर हा व्हायरस जगभरात पसरला.


✅This grammar exercise tests your ability to use different verb forms correctly. Fill in the blanks with an appropriate verb form.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1. A team of US scientists ………………. how bacteria communicate with each other.

a) discovered
b) has discovered
c) had discovered

2. Robots ……………… more and more like their human inventors.

a) becoming
b) are becoming
c) became

3. This website …………………. at creating a vibrant community of students.

a) is aimed
b) aimed
c) has aimed

4. Twendy –One is a robot ……………. to help disabled people and the elderly around the house.

a) is designed
b) designed
c) designing

5. Scientists …………….. stem cells from skin cells.

a) have developed
b) are developed
c) have been developed

6. New techniques in stem cell research ……………… reprogramming cells.

a) involve
b) involves
c) is involving



🔺Answers
▬▭▬▭▬▭▬▭▬▭▬▭▬


1. A team of US scientists have discovered how bacteria communicate with each other.

2. Robots are becoming more and more like their human inventors.

3. This website is aimed at creating a vibrant community of students.

4. Twendy –One is a robot designed to help disabled people and the elderly around the house.

5. Scientists have developed stem cells from skin cells.

6. New techniques in stem cell research involve reprogramming cell


🏏 *वॉर्नरचे दणदणीत त्रिशतक*



💁‍♂ ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावत इतिहास रचला आहे.

🧐 *वॉर्नरची कामगिरी :*

▪ पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वॉर्नरने शतक पूर्ण केले होते. पण दुसऱ्या दिवशी द्विशतकासह त्याने त्रिशतकही पूर्ण केले.

▪ ऑस्ट्रेलियाकडून दिवस-रात्र कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावणारा वॉर्नर हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. वॉर्नरने नाबाद 389 चेंडूंत 37 चौकारांसह आपले त्रिशतक पूर्ण केले.

▪ वॉर्नरच्या त्रिशतकामुळे विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक धावांचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

👉 *ऑस्ट्रेलियाचे आजपर्यंतचे त्रिशतकवीर*

▪ सर डॉन ब्रॅडमन (1930 आणि 1934)
▪ बॉब सिम्पसन (1964)
▪ बॉब कॉपर (1966)
▪ मार्क टेलर (1998)
▪ मॅथ्यू हेडन (2003)
▪ मायकेल क्लार्क (2012)
▪ डेव्हिड वॉर्नर (2019)

📍 दरम्यान, ऑस्ट्रेलियाने आपला डाव 3 बाद 589 वेबर घोषित केला असून सध्या पाकिस्तान 6 बाद 96 धावांवर खेळात आहे.


📌राज्यसेवा पूर्व व मुख्य📌

📌PSI-STI-ASO पूर्व व मुख्य📌

📌Tax Asst-Clerk-Ex Insp पूर्व व मुख्य📌

📌मेगाभरती📌


📌 स्पर्धा परीक्षेची तयारी करता आयोगाच्या नवीन परीक्षापद्धती प्रमाणे आलेल्या घटकनिहाय नोट्स मिळवा व परिक्षेला जाता जाता एकदा नक्की वाचा...

चालू घडामोडी
📎 click here ➥  Download

राज्यघटना
📎 click here ➥  Download

भूगोल
📎 click here ➥  Download

इतिहास
📎 click here ➥  Download

अर्थव्यवस्था
📎 click here ➥  Download

विज्ञान
📎 click here ➥  Download

गणित व बुद्धीमत्ता
📎click here ➥  Download

मराठी व्याकरण
📎 click here ➥  Download

इंग्रजी व्याकरण
📎click here ➥  Download

इतर महत्वाचे
📎 click here ➥  Download




बेहरामजी मलबारी

☘मेहरवानजी यांचा मलबार किनारपट्टीवरून मसाले व सुगंधी द्रव्ये आणून सुरतमध्ये विकण्याचा व्यवसाय होता; त्यामुळे त्यांना मलबारी म्हणून ओळखले जात असे.

☘बेहरामजी यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सुरतमधील आयरिश प्रेझबिटेरिअन  मिशन स्कूलमध्ये झाले. ते १८७१ मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. मिशनरी शाळेत शिकलेल्या बेहरामजींवर रेव्हरंड डॉ. विल्सन यांच्या विचारांचा व व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव होता. बेहरामजी पुढे मुंबईला आले व होरमुसजी जहांगीर यांच्या मालकीच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले (१८७६).

☘बेहरामजी यांचा विवाह धनबाईजी यांच्याशी झाला (१८७४). त्यांना तीन मुले व दोन मुली होत्या.

☘समाजसुधारणेच्या कार्यात आयुष्यभर स्वत:स वाहून घेणारे बेहरामजी यांनी पत्रकार म्हणूनही ख्याती मिळविली. प्रसिद्ध पारशी व्यावसायिक सर कासवजी जहांगीर यांनी बेहरामजी यांची ओळख टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक मार्टीन वूड यांच्याशी करून दिली. तेव्हापासून त्यांच्या पत्रकारितेतील कार्याची सुरुवात झाली.

☘पुढे वूड यांनी बॉम्बे गॅझेट हे साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकामधून बेहरामजी यांनी गुजरात आणि गुजरातीज  ही  लेखमाला लिहिली. तसेच इंडियन स्पेक्टॅटर या साप्ताहिकामधून त्यांनी स्तंभलेखन करण्यास सुरुवात केली. इंडियन स्पेक्टॅटर हे साप्ताहिक त्यांनी विकत घेतले (१८७९) व अखेरपर्यंत त्यांनी संपादक म्हणून काम केले.

☘दादाभाई नवरोजी व विल्यम वेडरबर्न यांनी चालविलेल्या व्हॉइस ऑफ इंडिया या नियतकालिकामध्येही त्यांनी लेखन केले. ईस्ट अँड वेस्ट या नियतकालिकाचेही ते संपादक होते (१९०१–१२).

☘बेहरामजी हे एक उत्तम गुजराती कवी होते. त्यांनी सन १८७५ मध्ये नितिविनोद हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला.

☘यात त्यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाहाच्या प्रथेतून महिलांवर लादले गेलेले वैधव्य यांबाबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. १८७६ मध्ये त्यांनी इंडियन म्यूज इन इंग्लिश गार्ब हा इंग्रजी काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. याचबरोबर गुजरात अँड गुजरातीज (१८८२), द इंडियन आय ऑन इंग्लिश लाइफ (१८९१), सोशल रिफॉर्म इन इंडिया : इट्स स्कोपॲन्ड इम्पॉर्टन्स (१८८६), ॲन अपील फ्रॉम द डॉटर्स ऑफ इंडिया (१८९०) हे त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ. त्यांनी आपल्या लेखनाद्वारे भारतीय स्त्रियांचा सामाजिक दर्जा वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. शिवाय त्यांनी बालविवाहाला कडाडून विरोध करत विधवांच्या पुनर्विवाहाचे जोरदार समर्थन केले. 

☘बालविवाह व महिलांवर सक्तीने लादण्यात आलेले वैधव्य – काही टिपणे (१८८४) या लेखातून त्यांनी बालवैधव्यावर प्रकाश टाकला. १८८४–१८९१ या कालखंडात बेहरामजी मलबारी यांनी चालविलेल्या व्यापक आंदोलनामुळे ब्रिटिश शासनाला संमती वयाचा कायदा (१८९१, द एज ऑफ कन्सेन्ट ॲक्ट) संमत करावा लागला.

☘जर्मन प्राच्यविद्यापंडित माक्स म्यूलर यांच्या हिबर्ट व्याख्यानमालेतील ऑरिजिन अँड ग्रोथ ऑफ रिलिजन (१८७८) या भाषणांचा बेहरामजी यांनी गुजराती भाषेत अनुवाद केला (१८८१).

☘बेहरामजी यांचा म्यूलर यांच्याशी पत्रव्यवहार होता. समाजसुधारक दयाराम गिडूमल यांच्या सहकार्याने मुंबई येथे त्यांनी ‘सेवासदनʼ ही संस्था स्थापन केली (११ जुलै १९०८).

☘ सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांच्या माध्यमातून निराश्रित व अनाथ स्त्रियांचा विकास घडवून आणणे हे या संस्थेचे ध्येय होते. मुंबईप्रमाणेच अहमदाबाद व सुरत येथेही ‘सेवासदन’च्या शाखा स्थापन करण्यात आल्या.

☘बेहरामजी यांनी क्षयरुग्णांसाठी कन्सम्पटिव्ह होम्स सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीच्या माध्यमातून १९०९ मध्ये सिमला रोडवरील धर्मपूर या ठिकाणी ‘किंग एडवर्ड सॅनिटेरियम’ सुरू केले. यामुळे अनेक रुग्णांना फायदा झाला. या सोसायटीला पतियाळा, ग्वाल्हेर आणि बिकानेर येथील राजांनी आर्थिक मदत केली होती..

☘बेहरामजी यांना मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली (१८८७), तसेच १८९६च्या दुष्काळात केलेल्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारकडून कैसर-ए-हिंद या पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले (१९००). १८८५ मध्ये मुंबई येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये ते सहभागी झाले होते.

☘सिमला येथे त्यांचे निधन झाले.


टीईटी परीक्षा तयारी महत्वाच्या बाबी*
- बेसिक संदर्भ पुस्तके वाचण्यावर भर द्यावा.
-मागील टीईटी पेपर एक व पेपर दोनच्या मागील प्रश्नपत्रिका बघून अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार करा.
-टीईटी परीक्षेत 90 प्लस गुण मिळवण्याच्या हेतूने प्रामाणिकपणे अभ्यास करा.वेळेचा अपव्यय करणाऱ्या सर्व बाबींपासून दूर रहावे.
-बालमानसशास्त्र विषय चांगला समजून घेतल्यास व वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचा सराव केल्यास दोन्ही पेपरमध्ये अधिक गुण मिळवता येतील.
-परीक्षेसाठी घटकनिहाय संदर्भ पुस्तके वाचावीत.
-इतिहास, भूगोल, विज्ञान व गणित विषयांची पाचवी ते दहावी पर्यंतची पुस्तके वाचावीत.
-शक्य असल्यास नोट्स काढा/पुस्तकांना महत्वाच्या मुद्यांना अंडरलाइन करा.
-प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत सोडविण्याचा सराव करावा.
-टीईटी परीक्षा होईपर्यंत फेसबुक, व्हाट्सप पासून दूर राहिल्यास बराच अभ्यासक्रम कव्हर होईल.
- परीक्षेला सकारात्मकतेने "टीईटी पास होणारच" या आत्मविश्वासाने सामोरे जा.
*Best of luck*


*TARGET MAHA TET 2020 परीक्षा तयारी*

*TET पेपर एक अभ्यासक्रम, तयारीची दिशा व उपयुक्त संदर्भ पुस्तक*
*१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)*
यामध्ये बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित 6 ते 11 वर्षे वयोगटाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यात अध्ययन, अध्यापन, विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो.
*महत्वाचे संदर्भ पुस्तक*
१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे(पाचवी आवृत्ती),के सागर पब्लिकेशन्स, पुणे
*2.मराठी भाषा(30 गुण)*
यामध्ये मराठी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
*महत्वाची संदर्भ पुस्तके*
के'सागर/बाळासाहेब शिंदे/डॉ.आशालता गुट्टे/विनायक घायाळ
*3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)*
यामध्ये इंग्रजी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
*महत्वाची संदर्भ पुस्तके*
के सागर/बाळासाहेब शिंदे
*4.गणित (30 गुण)*
यामध्ये विविध गणितीय घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
*महत्वाची संदर्भ पुस्तके*
सतीश वसे/नितीन महाले/शांताराम अहिरे
*5.परिसर अभ्यास (30 गुण)*
यामध्ये परिसर अभ्यास,विज्ञान,भूगोल, इतिहास,नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तकांवर आधारित बेसिक प्रश्न विचारले जातात.
*महत्वाची संदर्भ पुस्तके*
१.पाचवी ते दहावीची संबंधित विषयाची पाठ्यपुस्तके/अनिल कोलते/चंद्रकांत गोरे/विनायक घायाळ
*घटकांच्या एकत्रित तयारीसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ*
TET पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक - के'सागर (तिसरी आवृत्ती)
*परीक्षभिमुख दृष्टीकोनासाठी मागील प्रश्नपत्रिका व प्रश्नपत्रिका सराव अत्यंत आवश्यक*
TET पेपर एकच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती व अभ्यासाचा परीक्षाभिमुख दृष्टीकोन विकसित होण्यासाठी मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे, प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत सोडविण्याचा सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. 2013 ते 2018 पर्यंत TET परीक्षा 5 वेळा आयोजित करण्यात आली होती, या परीक्षेच्या 5 प्रश्नपत्रिका समजून घेऊन अभ्यासास सुरवात केल्यास परीक्षभिमुख अभ्यास होईल, तसेच परीक्षेसाठी कोणते घटक महत्वाचे आहे, ते लक्षात येईल.
*प्रश्नपत्रिका महत्वाचे संदर्भ पुस्तक*
TET पेपर पहिला सराव प्रश्नपत्रिका व TET परीक्षेच्या 2013 ते 2018 च्या मागील 5 प्रश्नपत्रिका संग्रह उत्तरांसह - डॉ.शशिकांत अन्नदाते,के'सागर पब्लिकेशन्स,पुणे
*TET पेपर दोन अभ्यासक्रम,तयारीची दिशा व उपयुक्त संदर्भ पुस्तक*
*१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)*
यामध्ये बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित 11 ते 14 वर्षे वयोगटाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यात अध्ययन, अध्यापन,विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो.
*महत्वाचे संदर्भ पुस्तक*
१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे(पाचवी आवृत्ती),के सागर पब्लिकेशन्स, पुणे
*2.मराठी भाषा(30 गुण)*
यामध्ये मराठी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
*महत्वाची संदर्भ पुस्तके*
के सागर/बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे/विनायक घायाळ
*3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)*
यामध्ये इंग्रजी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
*महत्वाची संदर्भ पुस्तके*
के सागर/बाळासाहेब शिंदे
*4.गणित व विज्ञान (60 गुण)*
यामध्ये गणितासाठी 30 व विज्ञान साठी 30 गुण आहेत.
4.1- गणित (30 गुण)
यामध्ये विविध गणितीय घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
*संदर्भ पुस्तके*
सतीश वसे/नितीन महाले/शांताराम अहिरे
4.2- विज्ञान (30 गुण)
विज्ञान विषयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व आरोग्यशास्त्र यावरील मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
*महत्वाची संदर्भ पुस्तके*
अनिल कोलते/चंद्रकांत गोरे/कविता भालेराव/विनायक घायाळ
*5.सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल (60 गुण)*
5.1- इतिहास (30 गुण)
इतिहासात प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारत यावर आधारित मूलभूत प्रश्न विचारले जातात.
*महत्वाची संदर्भ पुस्तके*
१.पाचवी ते बारावी शालेय इतिहास पाठ्यपुस्तके
5.2 - भूगोल.(30 गुण)
भूगोल विषयात महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल , जगाचा भूगोलचे बेसिक प्रश्न विचारले जातात.
*संदर्भ पुस्तके*
१.इयत्ता पाचवी ते बारावी भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके
*TET पेपर दोन साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ*
१.TET सराव प्रश्नपत्रिका पेपर दुसरा (मागील प्रश्नपत्रिकांसह)- विनायक घायाळ व विद्या देशपांडे, के सागर पब्लिकेशन्स,पुणे
*


दीनबंधू मोहापात्रा

- युनियन बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: राजकीरण राय जी.

- कॅनरा बॅंक
मुख्यालय: बेंगलोर
प्रमुख: आर. ए. शंकर नारायणन

- बॅंक ऑफ बडोदा
मुख्यालय: वडोदरा
प्रमुख: पी. एस. जयकुमार

- पंजाब नॅशनल बॅंक
मुख्यालय: नवी दिल्ली
प्रमुख: सुनिल मेहता

- स्टेट बँक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: रजनिश कुमार



» भारत मालदीव संयुक्त युद्धसराव
» 07 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2019
» “एक्सरसाईज एकुवेरीन”
» एकुवेरीन-मित्र (मालदीवी भाषेत)
» 2002 पासून आयोजन
» यंदा 10 वि आवृत्ती पुणे(औंध)

#current_affairs

📌गुगल कंपनीने 1 ऑक्टोबर रोजी डॉ. हर्बर्ट क्लेबर यांच्या उत्कृष्ट योगदानाचा गौरव केला. डॉ. क्लेबर कशासाठी प्रसिद्ध होते?

(A) मानसशास्त्रज्ञ✅✅✅
(B) ऑन्कोलॉजिस्ट
(C) चिकित्सक
(D) कृषीशास्त्रज्ञ

#current_affairs

📌कोणत्या विषयाखाली 2 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्र सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्यटन पर्व 2019’ या कार्यक्रमाला सुरुवात झाली?

(A) पधारो म्हारे देश
(B) देखो अपना देश✅✅✅
(C) टुरिझम रिस्पोंडींग टू द चॅलेंज ऑफ क्लायमेट चेंज अँड ग्लोबल वार्मिंग
(D) वसुधैव कुटुंबकम: इंडिया अँड द वर्ल्ड

#current_affairs

📌3 ऑक्टोबर रोजी _ येथे ‘जागतिक आर्थिक मंच’च्या ‘भारत आर्थिक शिखर परिषद’ची 33 वी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

(A) नवी दिल्ली✅✅✅
(B) मुंबई
(C) हैदराबाद
(D) बेंगळुरू

#current_affairs

📌ओडिशाच्या चांदीपूर येथे यशस्वीपणे चाचणी घेण्यात आलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या जमिनी-आवृत्तीची मारा क्षमता ____ एवढी आहे.

(A) 290 किलोमीटर✅✅✅
(B) 450 किलोमीटर
(C) 320 किलोमीटर
(D) 270 किलोमीटर

#current_affairs

📌तैवानमध्ये धडकलेल्या _ चक्रीवादळामुळे कमाल 162 किलोमीटर प्रतितास गतीने वारे वाहू लागले, ज्यामुळे अनेक लोक जखमी झालेत आणि हजारो घरे अंधारात गेली व शेतीचे क्षेत्र नष्ट झाले.

(A) पाबुक
(B) मिताग✅✅✅
(C) एलिस
(D) वूटीप

#current_affairs

📌नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स' संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या,

I. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने निर्देशांक प्रसिद्ध केला आहे.

II. या यादीत केरळ आणि बिहार अनुक्रमे प्रथम व तळाशी आहेत.

III. शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात कोणत्याही केंद्रशासित प्रदेशाचे मूल्यांकन केले गेले नाही.

वरती दिलेले कोणते विधान अचूक आहे?


(A) केवळ I
(B) एकही नाही✅✅✅
(C) I आणि II
(D) II आणि III

#current_affairs

📌____________________ याच्यावतीने देशभरात 15 दिवस चालणारा “अॅप्रेंटिसशिप पखवाडा’ नावाचा कार्यक्रम राबविण्यास सुरू करण्यात आला आहे.

(A) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय
✅✅✅
(B) कामगार व रोजगार मंत्रालय
(C) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय
(D) मनुष्यबळ विकास मंत्रालय

#current_affairs

📌_____________ याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्यावतीने नवी दिल्लीत ‘आरोग्य मंथन’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

(A) आयुषमान भारत✅✅✅
(B) स्वच्छ भारत
(C) राष्ट्रीय पोषण मिशन
(D) मिशन इंद्रधनुष

#current_affairs

📌NBCC या संस्थेनी राष्ट्रीय क्रिडा विद्यापीठाच्या विकासासाठी क्रिडा मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला आहे. त्यासंदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या,

I. प्रस्तावित विद्यापीठ अरुणाचल प्रदेशात उभारले जाणार आहे.

II. NBCC ही एक मिनीरत्न कंपनी आहे जी या प्रकल्पांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवा प्रदान करणार आहे.

III. क्रिडाशास्त्र, क्रिडा चिकित्सा, क्रिडा व्यवस्थापन, क्रिडा प्रशिक्षण व क्रिडा तंत्रज्ञान इत्यादी विषयांमध्ये क्रिडा विषयक शिक्षण देणारे विद्यापीठ अत्याधुनिक असे पहिलेच विद्यापीठ असणार.

वर दिलेले कोणते विधान चुकीचे आहे?


(A) केवळ I
(B) केवळ I आणि II✅✅✅
(C) केवळ II
(D) एकही नाही

आसाममधल्या लोकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ (NRC) याच्या अंतिम यादीमधून वगळलेल्या व्यक्तींना कायदेशीर मदत देण्याकरिता भारतातली पाच राष्ट्रीय विधी विद्यापीठे एकत्र आली आहेत.“परिचय” या नावाने एक कायदेशीर मदत केंद्र (legal aid clinic) स्थापन करण्यात आले 

नव्या पिढीची बँक म्हणून ख्याती असलेल्या येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे रजत मोंगा यांनी खासगी बँकेच्या वरिष्ठ समूह अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मोंगा हे बँकेचे मुख्य वित्तीय अधिकारीही राहिले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये व्याजदरांमध्ये (रेपो रेट) 25 बेसिस पॉइंट्सनी म्हणजेच पाव टक्क्यांनी कपात केली असून हा दर आता 5.15 टक्के इतका झाला आहे. 


महत्त्वाचे प्रादेशिक पुरस्कार

● महाराष्ट्र भूषण पुरस्कार :-
२०१५:- बाबासाहेब पुरंदरे
२०११:- डॉ. अनिल काकोडकर
२०१०:- जयंत नारळीकर

● लता मंगेशकर पुरस्कार :-
२०१८:- विजय पाटील
२०१७:- पुष्पा पागधरे
२०१६:- उत्तमसिंग

● जनस्थान पुरस्कार :-
२०१९:- वसंत डहाके
२०१७:- डॉ. विजय राजाध्यक्ष
२०१३:- भालचंद्र नेमाडे

● गदिमा पुरस्कार :-
२०१८:- सई परांजपे
२०१७:- प्रभाकर जोग
२०१६: सुमन कल्याणपूरकर

● राजश्री शाहू पुरस्कार:-
२०१९:- अण्णा हजारे
२०१८:- पुष्पा भावे
२०१७:- डॉ रघुनाथ माशेलकर

● पुण्यभूषण पुरस्कार:-
२०१९:- डॉ. गो. ब. देगुलरकर
२०१८:- प्रभा अत्रे
२०१७:- डॉ. के. एच. संचेती

● ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार :-
२०१८:- किसन महाराज साखरे
२०१७:- ह. भ. प. निवृत्ती महाराज वक्ते
२०१६:- डॉ. उषा माधव देशमुख

● चतुरंग जीवनगौरव पुरस्कार:-
२०१८:- सुहास बाहुलकर
२०१७:- डॉ. गो. ब. देगलूरकर
२०१६:- सदाशिव गोरक्षकर

● यंशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार:-
२०१८:- डॉ. रघुराम राजन

● मास्टर दीनानाथ मंगेशकर(जीवनगौरव पुरस्कार ):-
२०१९;- सलीम खान

● कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार :-
२०१८:- वेद राही
२०१७:- डॉ. एच.एस. शिवप्रकाश
२०१६:- विष्णू खरे

● 64 वी राष्ट्रकुल संसदीय परिषद

- 64 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेची (CPC) वार्षिक बैठक 22 ते 29 सप्टेंबर 2019 या कालावधीत युगांडा देशाची राजधानी कंपाला येथे आयोजित करण्यात आली होती.

- राष्ट्रकुल संसदीय संघटना (CPA) आणि युगांडा सरकार यांनी संयुक्तपणे ही परिषद आयोजित केली होती.

- परिषद राष्ट्रकुल या गटाच्या सदस्य देशांच्या खासदारांसाठी भरणार्‍या सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी एक आहे.
- यावर्षी परिषद ‘अडोप्ट, एंगेजमेंट अँड इव्होल्युशन ऑफ पार्लिमेंट्स इन ए रॅपीडली चेंजिंग कॉमनवेल्थ’ या विषयाखाली पार पडली.

- परिषदेत विविध देशांमधून आलेले जवळपास 500 हून अधिक खासदार, निर्णय घेणारे आणि इतर कर्मचारी एकत्रित आले होते.

● राष्ट्रकुल संसदीय संघटना [Commonwealth Parliamentary Association -CPA]

- स्थापना: 1911 साली ‘एम्पायर पार्लीमेंटरी असोसिएशन’ म्हणून करण्यात आली.
- सचिवालय: लंडन (ब्रिटन)
- कार्य: सुव्यवस्था, लोकशाही आणि मानवाधिकारांचे समर्थन करण्यासाठी कार्य करते.
- 1989 साली संघटनेनी संरक्षक (Patron) व उप-संरक्षक ही घटनात्मक पदे तयार केलीत.
- सध्या या संघटनेच्या अंदाजे 180 शाखा आहेत आणि त्या 9 प्रदेशांमध्ये विभागल्या गेल्या आहेत, ज्या आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटीश बेटे आणि भूमध्य, कॅनडा, अमेरिका, कॅरिबियन आणि अटलांटिक, प्रशांत, भारत आणि आग्नेय आशिया या प्रदेशांमध्ये आहेत.

#polity
#state_services_pre_2020

🔰सर्वोच्च न्यायालय - न्यायाधीश संख्यावाढ🔰
--------------------------------------------------------

● मूळ संविधान - कलम 124 नुसार न्यायाधीश संख्या - 8 (1 सरन्यायाधीश व 7 इतर न्यायाधीश)

●2009 साली ही संख्या पूर्वीच्या 25 वरून 31 करण्यात आली होती.

●कलम 124 (1) नुसार संसदेस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या आवश्यकता वाटल्यास वाढवण्याचा अधिकार आहे.

●2019 साली नुकतेच - 31 वरून न्यायाधीश संख्या 34 पर्यंत वाढवली आहे.

----------------------------------------------------
माहिती संकलन - प्रशांत खेडकर (STI)

» स्वछ रेल स्वछ भारत 2019
» पश्चिम रेल्वे 10 व्या तर मध्य रेल्वे 13 व्या क्रमांकावर
» उत्तर पश्चिम रेल्वे झोन प्रथम क्रमांकावर कायम
» शेवटच्या क्रमांकावर उत्तर मध्य रेल्वे झोन
» स्थानके क्रमांक_
» उपनगरीय नसलेली 1)जयपूर 2) जोधपूर 3) दुर्गापूर
» उपनगरीय 1) अंधेरी 2)विरार 3) नायगाव

● International Day of Older Persons

- 1 ऑक्टोबर
- 2019 Theme: The Journey to Age Equality

● ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात शाखा उघडणारी State Bank of India पहिली बँक ठरली आहे.

● Mahatma Lives OR Bapu Zinda Hain

- यावर्षी गांधीजींची 150 वी जयंती आपण साजरी करत आहोत.
- युनेस्को आणि दुरदर्शन यांनी संयुक्तपणे प्रदर्शित केलेला कार्यक्रम
- हा कार्यक्रम 1 आणि 2 ऑक्टोबर 2019 रोजी बहुभाषेत प्रसारित झाला.

● जागतिक अंतराळ आठवडा

- 4 ते 10 ऑक्टोबर
- संयुक्त राष्ट्रच्या आमसभेने 1999 मध्ये हा आठवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला
- 2019 Theme: The Moon: Gateway to the Star's



● सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रमुख

- पंजाब आणि सिंध बॅंक
मुख्यालय: नवी दिल्ली
प्रमुख: एस. हरीशंकर

- बॅक ऑफ महाराष्ट्र
मुख्यालय: पुणे
प्रमुख: ए. एस. राजीव

- युको बॅंक
मुख्यालय: कोलकाता
प्रमुख: अतुल कुमार गोयल

- इंडियन ओव्हरसिज बॅंक
मुख्यालय: चेन्नई
प्रमुख: कमाम सेकर

- सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: पल्लव मोहापात्रा

- इंडियन बॅंक
मुख्यालय: चेन्नई
प्रमुख: पद्मजा चुनदूरू

- बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख:


Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
📋📓 तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करताय ⁉️

✅ पर्याय निवडा

✅ आणि मिळवा परीक्षेसाठी लागणारे अभ्याससाहीत्य / टेस्ट / नोट्स मोफत

Показано 20 последних публикаций.

8 183

подписчиков
Статистика канала