Ph.D Entrance Test 2021 (PET Exam)


Гео и язык канала: не указан, не указан
Категория: не указана


महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षांची (PET) तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
не указан, не указан
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


आढावा कशा घ्यावा,परिकल्पना अर्थ व तिचे प्रकार, गृहीतके, परिकल्पना व गृहीतके, जनसंख्या व नमुना निवड व त्याचे स्वरूप, चांगल्या नमुन्यांची वैशिष्ट्य व प्रकार,पथदर्शक अभ्यास, ऐतिहासिक, प्रायोगिक, सर्वेक्षण, व्यक्ती अभ्यास,कार्योत्तर,वांशिक, सहसंबंध इत्यादी संशोधन पद्धती,संशोधन विकास पूरक परिषद, कार्यशाळा व इतर बाबी, शोधनिंबध, प्रबंध लेखनाची रूपरेखा, संशोधनाची विविध साधने, संशोधनात संख्याशास्त्र वापर, माहिती तंत्रज्ञानाचा संशोधनात उपयोग, संदर्भ लेखनाचा पद्धती, संशोधन अहवालातील संक्षिप्त रूपे इत्यादी मुद्यांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
संशोधन पद्धती विषयाचा अभ्यास करतांना संशोधनातील संकल्पना बारकाईने समजावून घेणे आवश्यक आहे, तसेच संशोधन विषयावरील संदर्भ पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे.तसेच या विषयावरील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्याचा सराव आवश्यक आहे, संशोधनावरील प्रश्न सोडवण्यासाठी नेट सेट पेपर एक साठीची पुस्तके तसेच संशोधनाची बेसिक पुस्तके वापरता येऊ शकतात.संशोधनाचे प्रश्न सोडवण्यातून विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अभ्यासात अचूकता येईल.
संशोधन पद्धती पेपरच्या तयारीसाठी पुढील पुस्तके उपयुक्त ठरतील.
1.सामाजिक संशोधन पद्धती - डॉ.प्रदीप आगलावे, विद्या प्रकाशन, नागपूर
2.संशोधन पद्धती - पीएच.डी प्रवेश परीक्षा परीक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स
3.शोधनिबंधाची लेखनपद्धधती - मिलिंद मालशे, लोकवाड्मय गृह
4.सामाजिक अनुसंधान - राम आहुजा
5.साहित्यसंशोधन वाटा व वळणे -डॉ.सुधाकर शेलार, अक्षरवाड्मय प्रकाशन, पुणे
6.Research Methodology - C R Kothari
7.Research in Education - John Best
8.Designs of Social Research - Das & D K Lal
(कृपया सदर माहिती होतकरू व उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करावी ही विनंती)
अधिक माहितीसाठी आजच पुढील टेलिग्राम चॅनेल जॉइन करा. https://t.me/phd07


*डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश परीक्षा (PET 2021) जाहिरात प्रसिद्ध; अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 जानेवारी 2021*
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश परीक्षा (PET 2021) मधील विविध विषयांसाठीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीची संपूर्ण माहिती,PET प्रवेश परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम, संशोधन पद्धती प्रश्नांचे स्वरूप आणि PET परीक्षेची तयारी कशी करायची याची संपुर्ण माहिती पुढीलप्रमाणे आहे.
Join- https://t.me/phd07
*अर्ज करण्याचा दिनांक -*
1 ते 11 जानेवारी 2021
*ऍडमिट कार्ड उपलब्ध -*
21 जानेवारी 2021
*PET परीक्षा पेपर 1 दिनांक -* 30 जानेवारी 2021
*PET परीक्षा फिस -*
खुला प्रवर्ग - ₹ 1000/-
मागास प्रवर्ग - ₹ 600/-
*PET 2021 अधिकृत महिती वेबसाइट*
https://online.bamu.ac.in/unic/pet-2021/

*PET परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम व तयारी*
★ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या PET परीक्षेत PET पेपर 1 हा General Attitude आणि PET पेपर 2 हा विषयाशी व संशोधन पद्धतीशी निगडित आहे.
★परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग पद्धती लागू असून चुकीच्या उत्तराला 0.5 गुण वजा केले जाणार आहेत.

*PET पेपर 1: General Attitude*
PET पेपर 1 मध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारण्यात येणार असून वेळ 90 मिनिटे असणार आहे. PET पेपर एकमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पुढील घटकांचा अभ्यास करावा लागणार आहे.
*★Analytical Reasoning (विश्लेषणात्मक तर्क)*
*★Numerical Ability (अंकगणितीय योग्यता) ★Language Competency (भाषाविषयक क्षमता)*
*★Computer(संगणक)*
*★Environment Awareness (पर्यावरण विषयक जागरूकता)*
*★Logical Reasoning of Data Interpretation (तार्किक दृष्टीने माहितीचे विश्लेषण)*
वरील सर्व घटक नेट-सेट परीक्षेच्या पेपर एकच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत, त्यादृष्टीने आपणास सदर घटकातील इत्यंभूत मुद्यांची माहिती अभ्यासण्यासाठी पुढील संदर्भ पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.

*1.NET/SET/PET परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक - डॉ.शशिकांत अन्नदाते (चौथी आवृत्ती), के'सागर पब्लिकेशन्स, पुणे*
या पुस्तकात PET अभ्यासक्रमातील सर्व घटकांचे मुद्देसुद, आकृतीद्वारे विश्लेषण असून प्रत्येक घटकांचे साधारण 300 वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले असल्याने सदर पुस्तक आपणास परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
*तसेच PET परीक्षेच्या पेपर 1 च्या अभ्यासक्रमातील घटकानुसार पुढील स्वतंत्र पुस्तकेही विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील.*
■विश्लेषणात्मक तर्क क्षमतेसाठी के'सागर/अनिल अंकलगी/पंढरीनाथ राणे तसेच नेट सेट परीक्षेतील प्रश्नांचा सराव करावा.
■अंकगणितीय योग्यतेसाठी सतीश वसे/के सागर/वा. ना.दांडेकर
■भाषाविषयक क्षमतेसाठी नेट सेट परीक्षेतील आकलनविषयक उतारे सोडवावेत तसेच इंग्रजी व मराठी व्याकरणातील समानार्थी, विसुद्धार्थी शब्द, वाकप्रचार अभ्यासावेत.
■संगणक घटकासाठी MSCIT पुस्तक व अन्नदाते यांच्या पुस्तकातील माहिती अभ्यासावी.
■पर्यावरण विषयक जागरूकता घटकासाठी एरीक भरूचा पुस्तक वाचावे व नेट सेट पुस्तकातील प्रश्न सोडवावेत.
■तार्किकदृष्टीने माहितीचे विश्लेषण करिता डॉ.आर.एस.अग्रवाल व डॉ.अन्नदाते यांच्या पुस्तकातील माहितीचा व प्रश्नांचा सराव करावा.
*PET पेपर 1 उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान 50 टक्के व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 45 टक्के गुण आवश्यक आहेत.*

*PET परीक्षा पेपर 2 अभ्यासक्रम व तयारी*

■PET पेपर 1 उत्तीर्ण असणारे विद्यार्थीच पेपर 2 देऊ शकतात.
■PET पेपर 2 साठी 90 मिनिटे वेळ असून 100 गुण आहेत.
*■ PET पेपर 2 हा पदव्युत्तर विषयाशी संबंधित व त्या विषयाच्या संशोधन पद्धतीशी निगडित असतो.*
■PET पेपर 2 साठी पदव्युत्तर विषयाच्या अभ्यासक्रमात नेमलेली संदर्भ पुस्तके व नेट सेट पेपर दोनची पुस्तके वाचावीत.
■पेट पेपर दोन मध्ये साधारणपणे विषयाशी संबंधित 50 टक्के प्रश्न व 50 टक्के प्रश्न संशोधन पद्धती विषयाशी निगडित विचारले जाऊ शकतात.

*PET परीक्षा पेपर 2 दिनांक*
21 फेब्रुवारी 2021

*संशोधन पद्धती विषयाचे सर्वसाधारण स्वरूप व तयारी*
संशोधन पद्धती (Reserch Methodology) विषयाच्या पेपरमध्ये साधारणपणे संशोधनाचा अर्थ, संशोधनाचे प्रकार, वैज्ञानिक विचारपद्धती, ज्ञान मिळविण्याचे मार्ग व संशोधन, संशोधकांची गुणवैशिष्ट्ये, चांगल्या संशोधन प्रक्रियेचे निकष,संशोधनाचा प्रत्यक्षवादी, चिकित्सक दृष्टीकोन, संख्यात्मक व गुणात्मक संशोधन आणि त्यातील फरक,संशोधन पायऱ्या, संशोधन समस्या, संशोधन आराखडा, चांगल्या संशोधन अहवालाची वैशिष्ट्य, मूलभूत, उपयोजित व कृती संशोधन, संशोधन समस्येचे स्रोत, सम्बधित साहित्याचा


5_6300804808068564037.pdf
148.3Кб
पीएच.डी प्रवेश परिक्षा 2021 सूचना


5_6300804808068564036.pdf
139.9Кб
पीएच.डी प्रवेश परिक्षा 2021





Показано 6 последних публикаций.

22

подписчиков
Статистика канала