Maharashtra Police Bharti


Гео и язык канала: Индия, Маратхи
Категория: Новости и СМИ



Гео и язык канала
Индия, Маратхи
Категория
Новости и СМИ
Статистика
Фильтр публикаций


सरकारचे 100 दिवसातले महत्वाचे निर्णय




Репост из: Spardha Pariksha Notes 📝
करार’ झाला, चिंता उरली!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय आखणी करण्यात व्यस्त आहेत. ‘अमेरिका फर्स्ट’ असा नारा देऊन सत्तेत आलेल्या ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांदरम्यान अमेरिकेतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी अन्यही काही आश्वासने दिली होती. त्यांची पूर्तता करण्यासाठी गेल्या दोन-अडीच वर्षांत त्यांनी बीजपेरणी केली होती. त्याला आता फळे येण्यास सुरुवात झाली आहे. ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या काळात रोजगाराचा प्रश्न हा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. पण आता अमेरिकेतील बेरोजगारीचा दर घटला असून या महासत्तेची अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या सुधारताना दिसत आहे. अशाच प्रकारे त्यांनी आणखी एक महत्त्वाचा वायदा अमेरिकन जनतेला केला होता, तो म्हणजे अफगाणिस्तानातून सैन्य माघारीचा. त्यासाठी ट्रम्प यांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केले. अखेरीस थेट अफगाणिस्तानमधील तालिबानशीच चर्चा करुन त्यांना करार करण्यासाठी एका टेबलवर आणण्यात ट्रम्प यांना यश आले. 29 फेब्रुवारी रोजी कतारची राजधानी दोहा इथे या ऐतिहासिक करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. या करारानुसार अफगाणिस्तानात असलेले 12 हजार अमेरिकन सैन्य पुढील 14 महिन्यांमध्ये काढून घेतले जातील.
खरे पाहता, या कराराच्या निमित्ताने तालिबानसारखी एक दहशतवादी संघटना अमेरिकेला भारी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या 20 वर्षांपासून अमेरिका अफगाणिस्तानातील या दहशतवादी संघटनेवर नियंत्रण प्रस्थापित करू शकला नाही. वास्तविक, अमेरिकेने त्यांच्यावर एक लष्करी दबाव कायम ठेवणे गरजेचे होते. अमेरिका जगभरात स्वतःला महासत्ता म्हणून मिरवते; पण याच जागतिक आर्थिक-सामरीक महासत्तेला एका दहशतवादी संघटनेवर नियंत्रण प्रस्थापित करून त्यांना चर्चेसाठी टेबलवर आणताना अक्षरशः नाकी नऊ आल्याचे संपूर्ण जगाने पाहिले. या कराराच्या आणि त्यादरम्यान घडलेल्या सर्व घडामोडींमध्ये तालिबानचाच वरचष्मा राहिलेला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. 


Репост из: Spardha Pariksha Notes 📝
🌺🌺राष्ट्रीय ललित कला पुरस्कार 2020🌺🌺

🔰 राष्ट्रपती राम नाथ कोविंद ह्यांच्या हस्ते 4 मार्च 2020 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात 15 गुणवंत कलाकारांना 61वे ‘वार्षिक ललित कला अकादमी पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.

🔴स्वरूप

🔰 विजेत्यांना पुरस्कारस्वरूपात थाळी, शाल आणि एक लक्ष रुपये रोख बक्षीस देण्यात आले.

🔴पुरस्कार विजेते कलाकारांमध्ये-

🔰 १) अनुप कुमार मनझुखी गोपी, २) डेव्हिड मलाकार, ३) देवेंद्र कुमार खरे,४) दिनेश पंड्या, ५) फारुक अहमद हलदर, ६) हरी राम कुंभावत,७) केशरी नंदन प्रसाद, ८) मोहन कुमार टी.,९) रतन कृष्ण सहा, १०) सागर वसंत कांबळे,११) सतविंदर कौर, १२) सुनील थिरूवायूर, १३ )तेजस्वी नारायण सोनावणे, १४) यशपाल सिंग १५) यशवंत सिंग यांचा समावेश आहे.

🔰 या कलाकारांच्या कलाकृती 22 मार्च 2020 पर्यंत नवी दिल्लीत ललित कला अकादमीच्या कलादालनात 61 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनीत ठेवण्यात आल्या आहेत.

🔴ललित कला अकादमी

🔰 ललित कला अकादमी याची स्थापना 5 ऑगस्ट 1954 रोजी एक स्वायत्त संस्था म्हणून करण्यात आली, ज्याला 1957 साली वैधानिक दर्जा दिला गेला.

🔰 ललित कला अकादमी दरवर्षी कलेला आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कला प्रदर्शन आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करते.


Репост из: Spardha Pariksha Notes 📝
✈️ औरंगाबाद विमानतळाचं नामांतर करण्यात आलं आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद विमानतळाचं नाव 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तशी माहिती दिली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Репост из: Spardha Pariksha Notes 📝
🌺🌺मुकेश अंबानी खरेदी करणार अनिल अंबानींची आरकॉम..🌺🌺

🔰देशातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचे बंधू अनिल अंबानी यांची दिवाळखोरीत गेलेली रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) विकत घेणार आहेत.

🔰यासंदर्भातल्या आराखड्याला स्टेट बँक ऑफ इंडियानं मंजुरी दिली आहे. यामधून 23 हजार कोटी रुपये मिळतील, अशी आशा कर्जपुरवठा केलेल्या बँकांना आहे. स्टेट बँकेनं रिलायन्स कम्युनिकेशन्सला हजारो कोटींचं कर्ज दिलं होतं.

🔰तर मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओनं आरकॉमचे टॉवर आणि फायबर बिझनेस (रिलायन्स इंफ्राटेल) खरेदी करण्यासाठी 4700 कोटी रुपयांची ऑफर दिली. यूव्ही असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीनं (UVARC) आरकॉम आणि रिलायन्स टेलिकॉमच्या मालमत्तेसाठी 14700 कोटींची बोली लावली.

🔰आरकॉमला भारतीय आणि चीनमधील देणेकऱ्यांचे 4300 कोटी रुपये प्राधान्यानं द्यायचे आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बोर्डनं आरकॉमच्या ठराव योजनेला मंजुरी दिली आहे. यासंदर्भात देणेकरांच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. आरकॉमवरील सुरक्षित कर्जाची रक्कम 33 हजार कोटींच्या घरात आहे. तर देणेकऱ्यांचा दावा 49 हजार कोटींचा आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Репост из: Spardha Pariksha Notes 📝
🌺🌺सर्वोच्च न्यायालयाने उठवली क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगवरील बंदी.🌺🌺

🔰सर्वोच्च न्यायालयाने आभासी चलनाच्या (क्रिप्टोकरन्सी) वापरावर लावण्यात आलेली बंदी उठवली असून व्यवहारात वापर करण्यासाठी परवानगी दिली आहे.

🔰रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) एप्रिल 2018 मध्ये बिटकॉइनसारख्या आभासी चलनाच्या ट्रेडिंगवर बंदी आणली होती.

🔰आरबीआयने बिटकॉइन तसंच इतर आभासी चलनांसंबधी नियम अत्यंत कठीण केले होते. यावेळी त्यांनी बँक आणि इतर आर्थिक संस्थांना कोणत्याही सेवा देण्यापासून बंदी आणली होती.

🔰तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवण्याचा निर्णय दिला. यावेळी न्यायालयाने आरबीआय अशा प्रकारची बंदी आणू शकत नाही असं सांगितलं.

🔰तर आरबीआयने आपल्या आदेशात सांगितलं होतं की, कोणत्याही आर्थिक संस्थेने क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करु नये. यासोबतच आरबीआयने सामान्य नागरिकांना क्रिप्टोकरन्सीवर ट्रेडिंग केल्यानंतर होणाऱ्या नुकसानासाठी स्वत: जबाबदार असतील असा इशारा दिला होता.

🔰2018 मध्ये आभासी चलन बिटकॉइनचं महत्व आणि किंमत वाढत होती. अनेकांनी बिटकॉइनच्या सहाय्याने मोठी कमाई करत नफा मिळवला होता.

🔰बिटकॉइनचा वाढता वापर लक्षात घेता आरबीआयने त्याला चलन म्हणून मान्यता देण्यास नकार दिला होता. सोबतच बिटकॉइनमध्ये ट्रेडिंगमुळे होणाऱ्या नुकसानासाठी आरबीआय जबाबदार राहणार नाही असंही स्पष्ट केलं होतं.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Репост из: Spardha Pariksha Notes 📝
म टा पुणे.pdf
12.3Мб
🌺.....महाराष्ट्र टाईम्स.....🌺
🗓 06 / 03 / 2020
🌞Search = #NewsPaper
═══════════════════


Репост из: Spardha Pariksha Notes 📝
loksatta-pune-06-03-2020.pdf
5.0Мб
🌺.....लोकसत्ता.....🌺
🗓 06 / 03 / 2020
🌞Search = #NewsPaper
═══════════════════


Репост из: Spardha Pariksha Notes 📝
Good morning


​ कुपोषणमुक्त भारत तयार करण्याच्या उद्देशाने “सुपोषित माँ अभियान”

🔰 भारतात कुपोषण निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सरकारच्या महिला व कुटुंब कल्याण मंत्रालयाने “सुपोषित माँ अभियान” राबविण्यास सुरुवात केली. लोकसभा सभापती ओम बिर्ला ह्यांच्या हस्ते या राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन राजस्थानच्या कोटा या शहरात करण्यात आले.

🔰 या मोहिमेद्वारे किशोरवयीन मुली आणि देशातल्या गर्भवती महिलांना पोषक आहार प्राप्त व्हावा हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भावी पिढ्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या बळकट ठेवण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे.

🔴 योजनेचे स्वरूप

🔰 कार्यक्रमाच्या प्रारंभीक टप्प्यात 1 महिना आणि 12 दिवस या कालावधीत 1000 गर्भवती महिलांना संतुलित आहार दि जाणार आणि आवश्यक चाचण्या, अल्ट्रासाऊंड, रक्त तपासणी यासारख्या सर्व वैद्यकीय खर्चाचा भार सरकार उचलणार आहे.

🔰 गहू, हरभरा, मका, बाजरीचे पीठ, गूळ, डाळी, मसूर, तूप, शेंगदाणे, तांदूळ आणि खजूर इ. पौष्टिक वस्तू प्रत्येक कुटुंबातल्या एका गर्भवती महिलेस देण्यात येणार.

🔰 उद्घाटनाला 1000 गर्भवती महिलांना संतुलित आहार असलेल्या 17 किलोग्राम इतक्या वजनाच्या अन्न पदार्थांचे 1000 संच वितरित करण्यात आले.






लोकसत्ता पुणे (2).pdf
17.9Мб
🌺.....लोकसत्ता.....🌺
🗓 05 / 03 / 2020
🌞Search = #NewsPaper
═════════════


कोविड-19 संबंधी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

🔰 कोविड-19 रोगाचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करायला हवे असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केले. दिल्ली सरकार तसेच दिल्लीतील सरकारी रुग्णालयांचे संचालक आणि वैद्यकीय अधीक्षकांबरोबर त्यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. आतापर्यंत 78 देशांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली असून राज्य आणि केंद्र सरकारकडून अतिदक्षता बाळगली जात आहे, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव प्रीती सुदान यांनी म्हटले आहे.

🔰 डॉ. हर्ष वर्धन यांनी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 विरुद्ध सज्ज राहण्याचे तसेच निगराणी, प्रयोगशाळेत निदान, दळणवळण व्यवस्थापनासाठी क्षमता अधिक बळकट करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचे रुग्ण आढळल्यास त्यांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यासाठी विलगीकरण सुविधा सज्ज ठेवायला सांगितले. तसेच वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून स्थानिक भाषांमध्ये जनजागृती करायची सूचना आरोग्यमंत्र्यांनी केली.


​🌺🌺ICC Women T20 World Cup 2020: 'मिताली'नंतर शेफाली! आयसीसीच्या क्रमवारीत पटकावलं अव्वल स्थान 🌺🌺

🔴 ठळक मुद्दे

🔰 शेफाली वर्मा महिला ट्वेंटी-२० स्पर्धेत नंबर वन फलंदाज ठरली आहे.

🔰 उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

🔰 ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत शेफालीने ४ सामन्यांत १६१ धावा केल्या

🔰 नवी दिल्ली - अवघ्या १६ व्या वर्षी आपल्या फटकेबाजीने नावलौकीक करणाऱ्या शेफाली वर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. सध्याच्या महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये शेफालीने आतापर्यंत केलेल्या फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली आहे. शेफालीच्या तुफानी फलंदाजीच्या सुरुवातीने सुरूवातीस जवळपास प्रत्येक सामन्यात भारतीय संघाचा फायदा झाला. यामुळे टीम इंडिया प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे.

🔰 उपांत्य सामन्यात गुरुवारी टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे, परंतु, त्याच्या पूर्वीच भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेफाली महिला ट्वेंटी-२० स्पर्धेत नंबर वन फलंदाज ठरली आहे. आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या फलंदाजांच्या क्रमवारीत शेफालीने अव्वल स्थान पटकावलं आहे. केवळ १८ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या शेफाली वर्माने आयसीसी जागतिक महिला ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला आहे.

🔰 ऑस्ट्रेलियायात सुरू असलेल्या महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत शेफालीने ४ सामन्यांत १६१ धावा केल्या आहेत. या कामगिरीच्या जोरावर तिने ही फिनिक्स भरारी घेतली. भारताची माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज मिताली राज हिच्यानंतर जागतिक ट्वेंटी-२० क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी शेफाली ही पहिलीच भारतीय महिला फलंदाज ठरली.

🔰 शेफालीने आतापर्यंत महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ४७, ४६, ३९ आणि २९ धावांची तुफानी खेळी खेळली आहे. यावेळी सलग दोनदा ती प्लेअर ऑफ दि मॅच देखील होती. सलामीवीर शेफाली वर्मा ७६१ गुणांसह अव्वल स्थानावर आहे न्यूझीलंडचा सुजी बेट्स दुसर्‍या स्थानावर आहे. तिच्याकडे ७५० गुण आहेत.

🔰 शेफालीने सुजी बेट्सला दुसऱ्या नंबरवर ढकललं आहे. ऑक्टोबर २०१८ पासून सुझीने हे स्थान कायम ठेवलं होतं. वेस्ट इंडीजची कर्णधार स्टेफनी टेलरकडून तिने हा नंबर पटकावला तेव्हापासून ती १ नंबरलाच होती. महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात किमान 200 धावा काढलेल्या क्रिकेटपटूंमध्ये शेफाली वर्मा हिने १४६.९६ च्या स्ट्राइक रेटने ४८५ धावा केल्या आहेत. शेफालीच्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेच्या चोले ट्रियोनचा नंबर लागतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


​🌺🌺 मध्यप्रदेशाचे राष्ट्रीय चंबळ अभयारण्य ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून घोषित 🌺🌺

🔰 राष्ट्रीय चंबळ अभयारण्य, जे मध्यप्रदेशात आहे, त्याला भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून जाहीर केले. अधिसूचनेनुसार, अभयारण्याच्या सभोवताल असलेला शून्य ते दोन किलोमीटरपर्यंत पसरलेले क्षेत्र ‘इको-सेन्सेटिव्ह झोन’ असणार.

🔰 मध्यप्रदेश राज्य सरकार क्षेत्राच्या संवर्धनासाठी एक योजना तयार करणार. पर्यावरण मंत्रालयाने राज्य सरकारला भूजल व्यवस्थापन व जलसंधारणाच्या संवर्धनासाठी योजना तयार करण्याचे निर्देश दिले आहे.

🔴अभयारण्याविषयी

🔰 राष्ट्रीय चंबळ अभयारण्य मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सीमेवर आहे. या अभयारण्यात स्थलांतरित पक्ष्यांच्या 180 प्रजाती आणि गोड्या पाण्याच्या कासवांच्या नऊ प्रजाती आढळतात.

🔰 अभयारण्य चंबळ नदीलगत विंध्य पर्वतरांगपासून सुरू होते आणि यमुना नदीवर समाप्त होते. अभयारण्य 435 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेले आहे आणि हे मध्यप्रदेशातल्या भिंड, मोरेना आणि शेओपूर जिल्ह्यात आहे.

🔰 राष्ट्रीय चंबळ अभयारण्य हे गंगेटिक डॉल्फिन आणि देशातल्या 75 टक्के घडियाल या मगरीच्या जातीचे घर आहे .

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Репост из: Spardha Pariksha Notes 📝
Good morning


⭐️⭐️ खेलो इंडिया स्पर्धेचा समारोप. ⭐️⭐️

🔰 खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचा समारोप ओदिशातल्या भूवनेश्वर इथं झाला. 

🔰 चंदीगढच्या पंजाब विद्यापीठानं १७ सुवर्ण, १९ रौप्य आणि १० कांस्य पदकांसह चॅम्पियन्स चषक पटकावला.

🔰 पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठानं १७ सुवर्ण, ११ रौप्य आणि ९ कांस्य पदकांसह दुसरा क्रमांक मिळवला. 

🔰 पतियाळाच्या पंजाबी विद्यापीठाला १३ सुवर्ण, ६ रौप्य, आणि १४ कांस्य पदकासह तिसरा क्रमांक मिळाला. या क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण ११३ विद्यापीठांनी भाग घेतला होता. 

🔰 काल शेवटच्या दिवशी झालेल्या स्पर्धांमध्ये भारतातली सर्वात जलदगतीनं धावणारी महिली द्युती चंद हिनं कलिंगा औद्योगिक तंत्रज्ञान संस्था प्रतिनिधीत्व करताना २०० मीटर धावण्याची शर्यत २३ पूर्णांक ६६ शतांश सेकंदात पूर्ण करुन सुवर्ण पदक पटकावलं.


🌸💕दिल्लीत 11 वी ‘राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (KVK) परिषद’ संपन्न झाली💕🌸

✍केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास व पंचायती राज मंत्री नरेंद्र सिंग तोमार ह्यांच्या हस्ते दि. 28 फेब्रुवारी 2020 रोजी 11 व्या ‘राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (KVK) परिषद’ या कार्यक्रमाचे उद्घाटन दिल्लीत झाले.

🔷कृषी क्षेत्रातले KVKचे योगदान...

✍कृषी क्षेत्रात संशोधन व विकास करण्यात कृषी विज्ञान केंद्राचा मोठा हातखंडा आहे. आतापर्यंत पिकांचे अनेक उत्तम वाण विकसित करण्यात आले आहेत. शिवाय मार्गदर्शनासाठी 171 मोबाइल अॅप तयार करण्यात आले आणि 3 लक्षाहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटर उघडण्यात आले आहेत.

✍शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी ‘eNAM’ ही डिजिटल व्यासपीठ तयार करण्यात आले. आज यावर 585 मंडई उपलब्ध आहेत आणि आणखी 415 मंडई उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहेत.

✍प्रत्येक विभागामध्ये किमान दोन फॉर्मर्स प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन (FPO) स्थापन करण्याचे केंद्र सरकारचे उद्दीष्ट आहे.1974 साली पुडुचेरी येथे प्रथम कृषी विज्ञान केंद्र उघडण्यात आले. आज देशभरात 717 KVK कार्यरत आहेत.

Показано 20 последних публикаций.

10 238

подписчиков
Статистика канала