दक्षिण कोरियानं विकसित केलेल्या ‘कृत्रिम सूर्या’चा जागतिक विक्रम; जाणून घ्या याचं महत्व
सूर्य हा अक्षय ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. मात्र, या ऊर्जेचा वापर करताना अनेक अडचणी येतात ज्यामुळे प्रत्येक ठिकाणी किंवा गरजेप्रमाणे याचा वापर करता येत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक विविध प्रयोग करत आहेत. त्यानुसार, आण्विक आणि न्यूक्लियर ऊर्जेला एक चांगला स्त्रोत मानून सूर्याप्रमाणे पृथ्वीवर न्यूक्लियर फ्युजनद्वारे ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न वैज्ञानिकांनी सुरु केला आहे. या प्रयत्नातूनच दक्षिण कोरियाने कृत्रिम सूर्य बनवला असून या सूर्याने उच्च तापमानाचा प्लाझ्मा २० सेकंदापर्यंत कायम ठेवण्याचा नवा जागतिक विक्रम केला आहे. कारण या कृत्रिम सूर्याचं तापमान १०० मिलियन (१० कोटी) डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. याची खऱ्या सूर्याशी तुलना केल्यास सूर्याच्या गाभ्याचे तापमान हे केवळ १५ मिलियन (१.५ कोटी) डिग्री सेल्सिअस आहे.
पहिल्यांदाच झाला असा विक्रम
दक्षिण कोरियाने विकसित केलेला हा कृत्रिम सूर्य म्हणजे एक उपकरण आहे, ज्याला KSTAR (Korea Superconducting Toakamak Advanced Research) असं म्हणतात. या उपकरणाने १० कोटी डिग्री सेल्सिअस तापमान २० सेकंदांपर्यंत कायम ठेवलं. जे यापूर्वी १० सेकंदांपर्यंतही कायम ठेवलं जाऊ शकत नव्हतं.
दक्षिण कोरिया आणि अमेरिकाचा संयुक्त प्रयत्न
गेल्या महिन्यांत कोरिया इन्स्टिट्यूट ऑफ फ्यूजन एनर्जी येथील KSTAR रिसर्च सेंटरने घोषणा केली होती की, सियॉल नॅशनल युनिव्हर्सिटी आणि अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त संशोधनातून त्यांनी प्लाझ्माचं तापमान १० कोटी डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक राखण्यात यश मिळवले आहे.
असं वाढलं वेळेतील अंतर
यापूर्वी सन २०१९ मध्ये KSTAR प्लाझ्मा मोहिमेत प्लाझ्माच्या तापमान वाढीचा वेळ केवळ ८ सेकंद होता. जो त्यावेळचा नवा जागतिक विक्रम होता. तर सन २०१८ मध्ये झालेल्या प्रयोगात पहिल्यांदा प्लाझ्मा आयनचं तापमान १० कोटी डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलं होतं. मात्र, ते केवळ १.५ सेंकंदांसाठीच कायम राहिलं होतं.
प्लाझ्माचं महत्व काय?
पृथ्वीवर सूर्याप्रमाणे न्यूक्लिअर फ्जुजन निर्माण करण्यासाठी प्लाझ्माची अवस्था तयार करणे अत्यंत गरजेचे असते. जे KSTAR सारख्या न्यूक्लिअर फ्युजनच्या उपकरणात हायड्रोजन आयसोटोपद्वारे निर्माण केलं जाऊ शकतं. या अवस्थेत आयन आणि इलेक्ट्रॉन विभक्त होतात आणि आयन अधिक तापमानावर गरम करुन त्याच तापमान कायम ठेवावं लागतं. आजवर दुसऱ्या प्लाझ्मा उपकरणांनी खूपच कमी कालावधीसाठी प्लाझ्माचं उच्च तापमान कायम ठेवलं होतं. पण कोणीही १० सेकंदापेक्षा जास्त वेळ गाठला नव्हता.
जगाला दिली जाणार माहिती
न्यूक्लियर फ्युजनच्या या उपकरणातून मिळवलेली ऊर्जा व्यावसायिक कारणांसाठी खूपच महत्वाची उपलब्धता आहे. KSTAR आपल्या प्रयोगातील प्रमुख निकाल हे जगभरातील संशोधकांसोबत शेअर करणार आहे. पुढील वर्षी मे महिन्यांत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा असोसिएशनच्या फ्यूजन एनर्जी कॉन्फरन्समध्ये वैज्ञानिक आपल्या यशाची माहिती देणार आहेत.