एकांतात गुंतलीय मी
यातून बाहेर मला काढशील का?
तुझ्याशी बोलायचं ठरवलं
अबोल शब्दांना बोलकं करशील का?
प्रीतीच्या या नात्याला
अनोख्या ऋणानुबंधाचं नाव देशील का?
प्रेम दडलंय काजळात
माझ्या डोळ्यातून ओळखून घेशील का?
काळोख्या वाटेत
मला मुक्त करायला तू येशील का?
वाटेवर चालतेवेळी
माझा आधार तू बनशील का?
पडताक्षणी वाटेवर
सावरायला तू येशील का?
झोप लागेल मला शांततेची
स्वप्नात एकदा तरी तू भेट देशील का?
गाढ निद्रेतही असतांना
स्वप्न माझे जागवशील का?
समजुतदारीच्या जगात हरवली मी
मला शोधून तू काढशील का?
बुडतेय मी खोलवर पाण्यात
यातून बाहेर मला काढशील का?
आयुष्य जगायचंय तुझ्यासोबत
माझा स्वप्नकिनारा तू बनशील का?
____________________________
✍शब्दशृंगार_सुप्रिया गोटेकर_
यातून बाहेर मला काढशील का?
तुझ्याशी बोलायचं ठरवलं
अबोल शब्दांना बोलकं करशील का?
प्रीतीच्या या नात्याला
अनोख्या ऋणानुबंधाचं नाव देशील का?
प्रेम दडलंय काजळात
माझ्या डोळ्यातून ओळखून घेशील का?
काळोख्या वाटेत
मला मुक्त करायला तू येशील का?
वाटेवर चालतेवेळी
माझा आधार तू बनशील का?
पडताक्षणी वाटेवर
सावरायला तू येशील का?
झोप लागेल मला शांततेची
स्वप्नात एकदा तरी तू भेट देशील का?
गाढ निद्रेतही असतांना
स्वप्न माझे जागवशील का?
समजुतदारीच्या जगात हरवली मी
मला शोधून तू काढशील का?
बुडतेय मी खोलवर पाण्यात
यातून बाहेर मला काढशील का?
आयुष्य जगायचंय तुझ्यासोबत
माझा स्वप्नकिनारा तू बनशील का?
____________________________
✍शब्दशृंगार_सुप्रिया गोटेकर_