Marathi Kavita Sangraha


Kanal geosi va tili: ko‘rsatilmagan, ko‘rsatilmagan
Toifa: ko‘rsatilmagan


@Marathi_Kadambari_Sangraha 📚
@nature_beautiful_pics 🌺

Связанные каналы

Kanal geosi va tili
ko‘rsatilmagan, ko‘rsatilmagan
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


आदिवासी

रानटी मी आदिवासी या पथी संचारतो। रूपशाली वाहनांचा ओघ ज्यावर वाहतो ।।

जंगली मातीतृणांच्या शिंपता मार्गी खुणा। संस्कृतीच्या पापण्यांतुन क्रुद्धता काढी फणा।।

मी दुकानी जातसे थैलीत घेउनि तारका। त्या पुढारुन सांगतो, मज एक घरटे द्याल का?।।

हासती, रागावती, धिक्कारुनी ते बोलती। चांदण्यांची, बर्बरा, येथे न नाणी चालती।।

३० / करार एका ताऱ्याशी


स्तोत्र

प्रकाशदाता
जीवनदाता
हे सविता, उदयाचलि ये

विश्वकमल हे
मुग्ध अचेतन
दलादलातुनि फुलवित ये

निराकारल्या
चराचरांतुन
सुवर्णरषा सांधित ये

नीरवतेच्या
मरुभूमीवर
सौध स्वरांचे बांधित ये

अवकाशातिल
भ्रांत घनांवर
जीवन आशय शिपित ये

पृथ्वीवरच्या
रित्या मनांतुन
प्रकाशपद तव रोवित ये

-कुसुमाग्रज
३/ करार एका ताऱ्याशी


@Marathi_Kavita_Sangraha 🦢


नभा तूच

साता जन्माची वैरीण
पृथ्वी झाली होती सारी
माझा व्याकुल वणवा
न्यावा कोणाच्या मी दारी.

माझ्या डोळ्यांतील ओल
नभा तूच पाहिलीस
निळ्या हातांनी ओढून
मला उरी घेतलेस.

नाही विचारले प्रश्न
नाही बोधखेद केला
फक्त चांदण्यात तुवा
दिले मिसळून मला.

-कुसुमाग्रज
२/करार एका ताऱ्याशी


@Marathi_Kavita_Sangraha


उषासूक्त

तांबूस स्तनांचा
प्रफुल्ल उद्रेक
विश्वास दावीत ये।

सोनेरी मांड्यांची
मिरास पृथ्वीच्या
मातीत रोवीत ये।।

तमात लोपल्या
रंगीत रेषांचे
प्रासाद बांधीत ये।

मृत्यूची राणीव
जिण्याची जाणीव
पुनश्च सांधीत ये।।

पक्ष्यांच्या पंखांत
झऱ्यांच्या गीतांत
आकाश पेरीत ये।

मानवी संज्ञेच्या
कड्यात कलेचे
कैलास कोरीत ये।।

अंधाऱ्या गुहांत
डोहांत, सूर्याचा
सांगावा शिपीत ये

सावळ्या घनांच्या
तळ्यांत तेजाची
कमळे लावीत ये।।

अरूप विश्वात
आकारबंधांची
आरास मांडीत ये।

सूर्याच्या समोर
अशेष आपुले
अस्तित्व सांडीत ये।।

-कुसुमा
्रज
(१/करार एका तार्‍याशी)

@Marat
hi_Kavita_Sangraha 🌻


केव्हातरी मिटण्यासाठीच...


केव्हातरी मिटण्यासाठीच
काळजामधला श्वास असतो

वाट केव्हा वैरीण झाली
तरी झाडे प्रेमळ होती
लाल जांभळे भेटून गेली
साथीत उरली निळी नाती

काळोखाच्या गुहेतदेखील
धडपडणारे किरण होते
पेटविलेल्या दीपालींना
वादळवारयात मरण होते

असणे आता असत असत
नसण्यापाशी अडले आहे
जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत
बरेच चालणे घडले आहे

माथ्यावरचा आभाळबाबा
सवाल आता पुसत नाही
पृथ्वी झाली पावलापुरती
अल्याड पल्याड दिसत नाही

- वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)


"मराठी कविता संग्रह" हे फक्त एक चॅनल नसून ते काव्यप्रेमींसाठी एक संगमस्थळ आहे. प्रत्येक शब्दाला अर्थाने संवाद देणारं, प्रत्येक ओळीची एक प्रतिमा चित्रित करणारं एक अद्वितीय ठिकाण आहे, @Marathi_Kavita_Sangraha चे साथी बना, आणि काव्याच्या स्पंदनांमध्ये जीवनाच्या आवाजांचा आस्वाद घ्या!


सर्व कवीप्रेमींना नमस्कार,
आमच्या मराठी कविता संग्रहाला तुम्ही दिलेल्या भरघोस प्रेमानंतर, आम्ही 'मराठी कविता संग्रह' या नवीन चॅनलची नवीन कल्पना सुरू केली आहे. त्यामुळे तुम्हाला या नवीन चॅनलवर दाखवल्या जाणाऱ्या प्रत्येक कविता संग्रहात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.

7 ta oxirgi post ko‘rsatilgan.

50

obunachilar
Kanal statistikasi