💫* जीवनाचा प्रवास * 💫✍️


Kanal geosi va tili: ko‘rsatilmagan, ko‘rsatilmagan
Toifa: ko‘rsatilmagan


* लेख ✍️* चारोळी ,कविता , साहित्य, कथा...✍️
इथे तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल.
Feelings ! Positive | Motivation | Love |
Life | Facts | Inspirational | Attitude.
‌* स्वलिखित लेख आपल्या नावासहीत
पाठवू शकता 👇👇
: @NeharkarPV

Связанные каналы

Kanal geosi va tili
ko‘rsatilmagan, ko‘rsatilmagan
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri










https://coneixelriu.museudelter.cat/ocells.php


वरील लिंक ओपन केल्यावर अनेक पक्षी दिसतील, सदर पक्षाला बोट लावताच तो आपला मुळ आवाज काढून दाखवेल.
किती छान टेक्नॉलॉजी आहे...


नात्यांची ओळख ही प्राथमिक औपचारिकतेतून नाही तर एकमेकांना अडीअडचीत समजून घेऊन, पुढच्या वाटेकरता अडचणीत असलेल्या व्यक्तीला त्याच्या भक्कम विश्वासाबाबत शाश्वती देणारी असली पाहिजे.


--©️किरण पवार (निनावी) ✍️


विधात्याच्या हातात जगणं
नाही माझं...

आपलं म्हणणारं कोणीच इथं
नाही तुझं...

एकटा चाल तू तूझ्या
वाटेने.....

होईल तेवढे कर तू तुझ्याने


जगणं इमानी 📚
✒BK
@bksuccess


Join our second channel 👆👆👆👆
for Hindi & English quotes pics..










* कर्तृत्व *

लेखन - ✍🏻 चंद्रकांत.

आयुष्य संपून जातं पण स्वतः च्या गुणांचा थारा लागत नाही.
नशीब नशीब म्हणून आयुष्यभर नशिबाला दोष द्यावा व सुप्त गुण तसेच राहावे हे बऱ्याचदा प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं .
खरं म्हणजे आपण कष्ट घेण्यात कुठंतरी कमी पडतो . हातावरच्या रेषांमध्ये भविष्य बघण्यात वेळ वाया घालवायचा आणि मग नशिबावर खापरं फोडायचे बस एवढ्यातच काहींचं आयुष्य जातं .
आपल्या मनगटात खूप जोर असतो सज्जनांनो ही ताकद फक्त आपल्याला ओळखता आली पाहिजे . सामान्य परिस्थितीत जीवन जगून प्रत्येक जण असामान्य कर्तृत्व घडवू शकतो , म्हणून कर्तृत्व दरवळण्यात व्यस्त व्हा...!
साहजिकच हे घडवणं तेव्हढं सोपं नसतं पण अथक परिश्रमानं आपण जगाच्या पडद्यावर नक्कीच चांगली छाप सोडू शकतो , मग याच्यात तुम्हांला कितीही संकटांचे हेलकावे बसले तरी चालेल पण आपल्या कर्तृत्वाने आपलं जीवन फुलवल्या शिवाय राहू नका...!
एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर - बिल गेट्स सर कोणत्याही शालेत , कॉलेज , विद्यापीठ मध्ये प्रथम क्रमांकाने कधीच उत्तीर्ण झाले नाही , पण आज पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी त्यांच्या कंपनीमध्ये काम करतात , याला म्हणतात
" कर्तृत्व " ....

@CPSST.
👆👆आपला अभिप्राय.

( आपला शुभचिंतक - चंद्रकांत संगीताबाई सर्जेराव तायडे-पाटील 8605611361 औरंगाबाद )


" तत्काळ भरती " वर.......






एकांतात गुंतलीय मी
यातून बाहेर मला काढशील का?

तुझ्याशी बोलायचं ठरवलं
अबोल शब्दांना बोलकं करशील का?

प्रीतीच्या या नात्याला
अनोख्या ऋणानुबंधाचं नाव देशील का?

प्रेम दडलंय काजळात
माझ्या डोळ्यातून ओळखून घेशील का?

काळोख्या वाटेत
मला मुक्त करायला तू येशील का?

वाटेवर चालतेवेळी
माझा आधार तू बनशील का?

पडताक्षणी वाटेवर
सावरायला तू येशील का?

झोप लागेल मला शांततेची
स्वप्नात एकदा तरी तू भेट देशील का?

गाढ निद्रेतही असतांना
स्वप्न माझे जागवशील का?

समजुतदारीच्या जगात हरवली मी
मला शोधून तू काढशील का?

बुडतेय मी खोलवर पाण्यात
यातून बाहेर मला काढशील का?

आयुष्य जगायचंय तुझ्यासोबत
माझा स्वप्नकिनारा तू बनशील का?
____________________________
✍शब्दशृंगार_सुप्रिया गोटेकर_




आजकाल लोकं कॉल्स मर्ज करायला लागलेत, मीटिंग मर्ज करायला लागलेत, कम्पन्या देखील मर्ज व्हायला लागल्यात.
पण मानवात असा कोणता व्हायरस दडलाय तेच कळेना,
माणसातील सहकार्य आणि माणुसकी कशीच मर्ज होईना झालीय...

- तेजस्विनी प्र. राऊत
@TejuRaut



20 ta oxirgi post ko‘rsatilgan.

2 565

obunachilar
Kanal statistikasi