🏹 पूर्व व मुख्य परीक्षाचा मेळ🏹
For beginners
दिवसंदिवस वाढत चाललेल्या स्पर्धेत टिकण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास व वेळेचे योग्य नियोजन घालणे खूप गरजेचे आहे.ज्यांना हे करता आले त्यांना नक्कीच पद मिळाले...
✒️सध्या स्पर्धा परीक्षाच्या परिक्षाचे नियोजन हे -मुख्य -पूर्व- मुख्य असेच असते.पहिले 3 महिने मुख्य ,त्यानंतर पूर्व ,मग परत मुख्य ...
कदाचित जास्तीत जास्त लोक हेच follow करतात ,आणि ते चांगले आहे.
पूर्व परीक्षा पास होऊन 3 महिन्यात mains ला जास्तीत जास्त score करणार असाल तर तुम्ही वेगळ्या zone मध्ये जगत आहात..1 वर्ष अभ्यास करून pre काठावर पास होणार,आणि 3 महिने अभ्यास करून mains पास होऊन ,अधिकारी होणार..
गणित जुळत नाही आहे ना??...
😍त्यामुळे ,सर्वांना लागू पडतील असे काही छान -छान संदेश देत आहोत वाचा...
✒️focus- तुमचं जे स्वप्न आहे,psi/sti/aso कोणते तरी एक ठेवा, एकाच वेळी सगळे होणे कठीण आहे.आणि फक्त त्याचाच अभ्यास करा,इतर परीक्षा द्या ,पण जे तुमचं मुख्य target आहे त्याला चिकटून रहा..
✒️अभ्यासक्रम-तुम्हाला जर ज्या परीक्षेसाठी आपण अभ्यास करत आहोत ,त्याचा जर पूर्व आणि मुख्य चा अभ्यासक्रम माहीत नसेल तर अजून 4 काय 10 वर्ष अभ्यास केला तरी post निघणार नाही....एक 5 रु ची print काढा आणि स्वतः जवळ ठेवा.आणि सतत 8 दिवसात त्याला नजरेखालून जाऊ द्या.
✏️प्रश्नपत्रिका विश्लेषण- ज्या परीक्षेसाठी आपण सुरवात करणार आहोत त्याचे पहिला विश्लेषण करा ,बाजारात भरपुर पुस्तके आहेत त्यातून मिळेल तुम्हाला आणि अभ्यासाची दिशा ठरवा.
✏️पुस्तकसूची- जे कोण तुम्हाला या स्पर्धेत गुरू सारखे मार्गदर्शन करतात ,त्यांच्याकडुन पुस्तकसूची काढून घ्या,योग्य आणि झेपणारी असू द्या.
नियोजन व time table- तुमचं पूर्व व मुख्य या दोन्ही विषयांच योग्य नियोजन तुमच्या जवळ असू द्या,1 month to 1 year हा plan तुमचा तयार पाहिजे, 1दिवसाच पण नियोजन हवेच..
✏️पूर्व-मुख्य परीक्षाचा संगम-जर 3-3 महिन्याच्या टप्प्याचे नियोजन असेल तरी ही चालेल पण दिवसाचे दोन टप्पे करून एक पूर्व व दुसरा मुख्य असा केला तरीही चालेल,या बाबत मार्गदर्शन घ्या मगच निर्णय घ्या..
क्लास- क्लास लावाच अस नाही म्हणत पण जो विषय तुमचा कच्चा आहे,ज्यात काहीही केलं तरी प्रगती होत नाही आहे ,तर त्या एका विषयाच लावा..【उगीच अहंम भावात नका राहू,क्लास न करता पोस्ट काढणार,कधी तरी मार्गदर्शनची गरज पण असते.【माझा कोणताही क्लास नाही आहे,जे real आहे ते सांगतो आहे】
टेस्ट-टेस्ट सोडवणे अत्यंत गरजेचे आहे,टेस्ट सेरीज कोणती पण एक जॉइन करा【online/offline भरपूर आहेत】जेणेकरून तुम्ही केलेल्या अभ्यासाची तुम्हाला तुलना करता येईल..
✒️प्रलोभनां पासून दूर रहा,1 सेकंद लागतो आयुष्य उध्वस्त व्हायला.motivational बघा/वाचा आणि सतत स्वतःच्या दुनियेत रहा.निदान post निघेपर्यंत..
ALL THE BEST😊