सिंधुताई सपकाळ,एन. डी. पाटील आणि एकनाथ आवाड
आज एकनाथ आव्हाड यांचा जन्मदिवस.एन डी पाटील सर दोन दिवसापूर्वी गेले आणि सिंधुताई सपकाळ त्यापूर्वी काही दिवस अगोदर...
मी सोशल मीडियाचा कानोसा घेतो आहे. या तिघांच्या बाबत भावनांची तीव्रता नेमकी कशी आहे ? त्या तिघांच्या कर्तुत्वाचा तुलना करण्याचा हेतू नाही किंबहुना ती करणे मूर्खपणा ठरेल पण यातून एक वेगळा मुद्दा मला मांडायचा आहे. त्यासाठी ही तीन नावे निवडली आहेत.
सिंधुताई गेल्यानंतर मी लगेच अनेकांचे स्टेटस बघितले तर दहा पैकी सहा स्टेटस तरी सिंधुताईंच्या फोटोचे होते. नंतर सोशल मीडियाच्या पोस्ट मध्ये ही तेच दिसले. एन. डी. पाटील सर गेले तेव्हाही मी स्टेटस बघितले ते प्रमाण होते पण तुलनेत कमी होते आणि दोन्ही मध्ये फरक हा की पाटील सर यांचे स्टेटस ठेवणारे लोक हे सामाजिक चळवळीत सक्रिय असणारे, वेगळा विचार मांडणारे समाजिक कामाशी जोडले असणारे व ओळखीचे चेहरे होते पण सिंधुताईंच्या पोस्ट फॉरवर्ड करणारे स्टेटस ठेवणारे हे त्या अर्थाने विचार वर्तुळातील नव्हते तर व मध्यमवर्गातील संख्या विशेष होती.
या दोघांच्या तुलनेत आज एकनाथ आवाड यांचा जन्मदिवस तर अजिबात परिचित नाही किंबहुना कोण हे एकनाथ आवाड ? असे अनेक जण नक्कीच प्रश्न विचारू शकतील....विशेषतः शहरी भागातून
मला ही चर्चा सामाजिक काम म्हणजे काय या प्रश्नाकडे न्यावीशी वाटते. आपल्याकडे सामाजिक काम याविषयी व्याख्या आणि स्पष्टता येणे गरजेचे आहे असेच वाटत राहते. सेवाकार्य आणि संघर्ष असे सामाजिक कामाचे दोन पैलू आहेत. सामाजिक व्यवस्थेचे जे बळी आहेत अशा महिला मुले वृद्ध यांना मदत करणे अशा प्रकारचे जे काम केले जाते. त्या प्रकारच्या कामाला समाजात विशेष मान्यता आहे. मध्यमवर्ग, सर्वसामान्य लोक त्या कामात उस्फूर्तपणे मदत करतात.त्या महिला, वृद्ध, आजारी व्यक्ती यांच्या समोर दिसणाऱ्या दुःखाने त्यांच्यातील करुणा जागी होते. त्यात सर्वच धर्मांनी अशा प्रकारच्या सेवेला पुण्याची जागा दिलेली असल्यामुळे या कामाचे मोल वाढते. मदर तेरेसा बाबा आमटे यांच्या या बाबतीत केलेल्या कामाचे महत्त्व अधोरेखित झाल्यामुळे या कामाला समाजाचा खूप पाठिंबा मिळतो. सिंधुताई विषयीच्या या लोकप्रियतेचे कारण या पाठिंब्यात आहे.त्यांची करुणा समाजाची करुणा बनते.त्यांनी आधार दिलेली १४०० लेकरं समोर बघायला मिळतात. त्यातून त्यांचे दुःख हे समाजाचे बनते व बघता बघता समाज त्या प्रश्नाशी जोडला जातो..
पण संघर्ष करणारे कार्यकर्ते हे त्यांच्या कामातून हजारो-लाखो कुटुंबाचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या कामाच्या प्रभावाची तीव्रता कितीतरी मोठी असते परंतु ती प्रत्यक्ष दिसत नसल्यामुळे किंवा त्या लोकांच्या जगण्याचे प्रश्न नीटपणे यांच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे ते लोक यांच्या भावविश्वाचा भाग नसल्यामुळे असेल संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याची काम हे सामाजिक काम मानले जात नाही. सेवाकार्य करणारे गरिबांच्या हातात भाकरी देतात आणि संघर्ष करणारे या गरिबांना त्यांची स्वतःची भाकरी का मिळत नाही या प्रश्नावर संघर्ष करतात. केवळ गरिबांची सेवा न करता गरिबी ज्या व्यवस्थात्मक चौकटीतून निर्माण होते ती व्यवस्थात्मक चौकट बद्दलण्यावर ते लक्ष केंद्रित करतात..कम्युनिस्ट पक्षाची संपूर्ण कार्यपद्धती या प्रकारची आहे..
ND पाटील यांनी आयुष्यभर संघर्ष केला.त्या संघर्षातून हजारो शेतकरी,शेतमजूर यांचे जीवनमान उंचावले. एन्रॉन सारखा प्रकल्प रद्द केल्यामुळे राज्याचे हजारो कोटी रुपये वाचले त्यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रातील शिक्षण आरोग्य परिवहन रेशन यासारख्या सुविधा अधिक प्रभावीपणे गरिबांपर्यंत पोहोचल्या. अनेक कष्टकऱ्यांना त्यांच्यामुळे न्याय मिळाला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामातून शोषण कमी कमी होत गेले. त्यांचे काम हे थेट व्यवस्थेवर परिणाम करत होते. राजकारणाचा एकूणच दर्जा उंचावत होते. वाईट प्रवृत्तींना जागेवर थांबवत होते पण त्याची आकडेवारी त्यांनी उभ्या केलेल्या कुटुंबांचे चेहरे या प्रकारे थेट समोर येत नसल्याने किंवा अशा कामाला सामाजिक काम म्हणण्याची पद्धत नसल्याने त्यांचे मूल्य कितीतरी मोठे असते पण ते ज्या विषयांवर काम करतात;तो विषयच मध्यमवर्गाला जवळचा वाटत नसल्यामुळे नकळत त्याने मध्यमवर्ग फार भारावून जात नाही. तो फार तर एन डी पाटील यांचा प्रामाणिकपणा,आयुष्यातील सातत्य,साधेपणा,वक्तृत्व,व्यासंग, नैतिकता रयत शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या संस्थेचे चेअरमन असणे महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव अशा गोष्टींनी प्रभावित होऊ शकतो परंतु शेतकरी कामगार पक्षाचा त्यांचा अजेंडा व त्यासाठी त्यांनी केलेले काम हे मात्र मध्यमवर्गाला कदाचित प्रभावित करत नसेल..