मराठी लेखन - Marathi Lekhan


Channel's geo and language: not specified, not specified
Category: not specified


सोशल जगतात गाजलेले आणि नावाजलेले लेख एकाच चॅनेल वर..
जॉईन करा @MarathiLekhan ✍️
नवनवीन लेखन आणि साहित्य दररोज...
@MarathiReaders 📚
@MarathiHorror 🧟

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
not specified, not specified
Statistics
Posts filter


*आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो...*
*कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही...*
*ते आपोआप जोडलं जातं....*
*खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते....*
*हे दान ज्याला लाभतं, त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो ...!!!!*

🙏🏻💞 *शुभ सकाळ* 💞 🙏🏻#🌹


माघी गणेशोत्सव जवळ आला आहे. माघ शुद्ध चतुर्थी ही तिथी श्रीगणेश जयंती म्हणून साजरी होते.

गणेश किंवा गणपती ही देवता म्हटली की मराठी लोकांचा उत्साह ओसंडून वाहू लागतो आणि यात आपण हे पडताळून पाहत नाही की माघात गणेश जन्म जर झालाय तर मग भाद्रपदात कोणाचा जन्म झाला ? हा प्रश्न मला फार पूर्वी पडला होता आणि याचं उत्तर मला महत्प्रयासाने मिळालं होतं.

आता उंदीरमामा, मोदक, लाडका बाप्पा हे सुरू होईल. माघी सार्वजनिक गणेशोत्सवही होईल पण यात आपण नक्की कुठल्या देवाचा जन्मसोहळा साजरा करीत आहोत, ही जी मूर्ती आपण उत्सवमूर्ती म्हणून घडवलेली आहे, ती बरोबर आहे का, याचं भान मात्र राहणार नाही.

मूषक वाहन असणारा, मोदक आवडणारा, आपला अती लाडका बाप्पा हा पार्वतीचा मुलगा, ज्याचा जन्म आपण भाद्रपदात अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करतो. तो जन्म सोहळा बरोबरच...

माघात ज्याचा जन्म आहे, तो कश्यप ऋषी आणि माता अदिती यांचा पुत्र "महोत्कट विनायक". या विनायकाचं वाहन मूषक नाही तर सिंह आहे. त्याला दहा हात आहेत. कृतयुगात माध्यान्हीला हा अवतार झाला.

तेव्हा आता माघ शुद्ध चतुर्थीला श्रीगणेश जयंती म्हणताना ही विनायकाची जयंती आहे, ज्याचं नाव महोत्कट असं आहे, तो कश्यप - अदिती पुत्र आहे, हे ध्यानात ठेवावे.

- मंजुषा जोगळेकर




जपान आणि न्यूझीलँड मध्ये सार्वजनिक बस चालकांनी अनोख्या प्रकारे संप केला होता. त्याबद्दल नुकताच वाचनात आलं.

आता सध्या आपल्याकडे चालू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपापुढे, या परदेशी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप नक्कीच वेगळा आणि जास्त प्रभावी वाटला म्हणूनच येथे देत आहे.

त्यांनी संप पुकारला पण काम थांबवले नाही. त्यामुळे जनतेला बिलकुल त्रास झाला नाही. याउलट त्यांनी लोकांकडून तिकिटाचे पैसे घेण्यास नकार दिला. आणि संपकाळात चक्क फ्री बस सेवा दिली. यामुळे इंधनाचा अतिरिक्त खर्च आणि शून्य उत्पन्न अशा दुहेरी कात्रीत बस कंपनी व्यवस्थापन अडकले.

अशा प्रकारच्या संपामुळे सामान्य जनतेच्या मतांचं पारडं आपोआप कर्मचाऱ्यांच्या बाजूने झुकले. मला ही असहकाराची अतिशय प्रभावी युक्ती खूपच आवडली. Public opinion very powerful.

ते जिंकलं तर भल्याभल्या संकटांवर मात करता येते. आणि स्वतःचं नुकसान करेल अशा संपाचा काय फायदा ? वहा मारो जहाँ सबसे जादा दर्द होगा !! असा प्रकार आपल्याकडे झाल्याचे ऐकिवात आहे का ? या पद्धतीबद्दल कायदेशीर बाबी जाणून घ्यायला आवडतील. आणि एकंदर या युक्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं??

सलिल सुधाकर चौधरी

━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा @marathilekhan❤️━━━━━━━━━━━━━━━━━━


शारीरिक व्यंग एकवेळ पुरलं,

त्याचा इलाजही करता येईल,

पण

बौद्धीक अन वैचारिक पंगू माणसं समाजस्वास्थ बिघडविण्यात कोणतीही कसर सोडत नाही,

जे की अत्यंत घातक असतं.
@marathilekhan
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️


अति_हुशार_बायका😅😅😅

एकदा एका स्त्री ने फेसबुकवर दुधात पोळीचा चुरा कालवलेला फोटो शेअर केला.ते फोटो पाहुन तिला comment मध्ये रेसिपी विचारतील तीने हा स्वप्नात सुद्धा विचार केली नसेल😅😅😅
काही बायकांचे Comments😅😅

पहीली : दुध गायीचे घ्यायचे का म्हशीचे🤣🤣

दुसरी : पोळीचा चुरा हाताने करायचा कि Grinder ने😅😅

तिसरी : एका पोळीला किती दुध घ्यायचे😀😀😀

चौथी : दुधात साखरेऐवजी गूळ घातला तर चालेल का 😅😅

पाचवी : एका पोळीच्या चुऱ्यासाठी किती चमचे साखर🤣🤣🤣 वापरायची

सहावी : दुध थंड घ्यायचे का गरम😜🤣

सातवी : पोळीच्या ऐवजी भाकरी घेतली तर चालतील का😅😅😅

आठवी : पोळी ताजी हवी का शिळी😜😜😜

एका बाईच्या comment ने हद्दच केली🙄🙄🙄

१) पोळीसाठी गहु दळुन आणायचे.. का विकतचं पीठ चालेल🤣🤣🤣

२) पोळ्या घडीचे हव्या का फुलके😜😜😜

३) पोळ्या बाईने केले चालतील का नवऱ्याने 🤣🤣🤣🤣🤣🤣




एकनाथ आवाड यांची गोष्ट तर अधिकच न्यारी. एकनाथ आवाड दुर्लक्षित मराठवाड्यातील बीड सारख्या मागास जिल्ह्यातले,त्यातही दलित कुटुंबांसोबत काम करत राहिले. त्यावेळच्या तीव्र जातीय विषमता असलेल्या मराठवाड्यात एकनाथ आवाड यांनी केलेले संघर्ष अंगावर काटा आणणारे आहेत. त्यातही पारधी-भिल्ल आदिवासी दलित भटके-विमुक्त यांना त्यांनी गायरानाच्या जमिनीवर शेती करायला प्रोत्साहन दिले. त्या जमिनीवर अतिक्रमण करून त्या जमिनी ताब्यात घेतल्या. संघर्ष करून त्या जमिनी नावावर करून घेतल्या व त्यातून अक्षरशः हजारो कुटुंब आज स्थिरावले आहेत. मी आष्टी तालुक्यात एका भटक्या-विमुक्तांच्या अशाच वस्तीवर दारात शेतातील धान्य वाळत घालताना बघितले तेव्हा अंगावर काटा आला होता.भाकरी मागून खाणारे ते भटके आज आत्मसन्मानाने स्वतःच्या शेतातील धान्य खात होते.
एकनाथ आवाड यांच्या प्रयत्नाने हजारो कुटुंबे आज स्थिरावली आहेत.हजारो दलितांना आत्मसन्मानाने जगायला त्यांनी प्रेरणा दिली.याची कुठे नोंद आहे ? एकनाथ आवाड यांचे काम पुण्या-मुंबईच्या जवळ नसल्यामुळे ते कुठेच नीट पोहोचले नाही.शहरी भागात केलेले काम लवकर पोहोचते. अगोदरच मराठवाडा दुर्लक्षित त्यातला बीड जिल्हा त्यात दलितांमध्ये काम करणारा माणूस त्याची कोण कशाला नोंद घेईल ? पण दलित भटके आदिवासी यांना संघटीत करून त्यांना उदरनिर्वाहाची साधने आवाडांनी मिळवून दिली. पण आज त्याची राज्यस्तरावर कुठेच प्रभावी नोंद झाली नाही. महाराष्ट्र भूषण द्यावे अशा तोडीचे हे काम या माणसाने केले आहे पण त्याला आपण सामाजिक कामही मानत नाही...

या तीन उदाहरणातून माझा मुद्दा पोहोचला असेल... मुलांसाठी महिलांसाठी जे सेवाकार्य केले जाते त्याला मी अजिबात कमी लेखत नाही समाजातील या नाकारलेल्या वर्गात साठी कुणीतरी काम करायलाच हवे ते हे लोक करतात ही कौतुकास्पद गोष्ट आहे.मी आणि अनेकजण सदैव अशा व्यक्तींचे कौतुक करतो प्रोत्साहन देतो. समाजाचा त्यांना मोठ्या प्रमाणावर मदत निधी मिळतो मान्यता मिळते पण तोच समाज संघर्ष करणाऱ्यांना मात्र मदत करत नाही त्या कामाला सामाजिक काम मानत नाही ही खरी तक्रार आहे आणि म्हणून सेवेच्या कामाला समाज जितकी मदत करतो तितकीच मदत आणि मान्यता त्याने संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना ही दिली पाहिजे किंबहुना संघर्ष करणारे कार्यकर्ते गरिबांचे जीवनमान पूर्णपणे बदलून टाकण्यात यशस्वी होतात.ती संख्या काही हजारात असते आणि त्या सुधारणा व्यवस्थात्मक असल्यामुळे तिथून पुढच्या गरिबांनाही दिशा मिळत असते. वन हक्क कायदा २००६ सली आला. तो कायदा येण्यासाठी गावोगावच्या हजारो कार्यकर्त्यांनी संघर्ष केला होता आणि त्या कायद्यामध्ये जंगलात जमीन कसणाऱ्या आदिवासींना सर्व जमीन त्यांच्या नावावर मिळाली. या एका कायद्याने लाखो आदिवासींचे जगणे बदलून जाऊ शकते. मेधा पाटकर यांच्या आंदोलनातून २४५ बुडालेल्या गावातील हजारो कुटुंबांचे पुनर्वसन होऊ शकले. या हजारो कुटुंब बहिणीच्या रस्ताला आपण सामाजिक काम म्हणणार की नाही तेव्हा व्यवस्थात्मक संघर्षातून होणारी समाज सेवा ही अधिक व्यापक असते आणि म्हणून सेवा कार्याचे मोल किंचितही कमी न लेखता या संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना समाजाने मदत करायला हवी. पण 'दारिद्र्याची शोधयात्रा' या अहवालाच्या निमित्ताने मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या सामाजिक कार्यकर्त्यांना भेटलो. तेव्हा अतिशय विदारक स्थितीत ही सर्व आंदोलने सुरू आहेत. या कार्यकर्त्यांनाची आणि आंदोलनांची स्थिती अतिशय वाईट होती.नेमलेल्या कार्यकर्त्यांना साधे मानधने देणे मुश्किल होते. सामाजिक कृतज्ञता निधीतून काही कार्यकर्त्यांना मानधन सुरू होते.अवघे २००० ते ५००० मानधनावर अनेक ठिकाणी कार्यकर्ते काम करत होते. मोर्चा काढायचा तरी खर्च करायला पैसे नसायचे.गाडी असणे तर दूरच.. प्रत्यक्ष हजारो कुटुंबांना करण्याची क्षमता असणाऱ्या या आंदोलनांना समाज मदत का करत नाही ? असा प्रश्न माझ्या मनात आला. तेव्हा हे उत्तर मिळाले...

अर्थात त्यात आंदोलनांच्याकडेही एक छोटा दोष जातो की ते जे काम करतात ते वेगवेगळी माध्यमे वापरून मध्यमवर्गापर्यंत ते पोहोचवायला हवेत.आज आयटी क्षेत्र व मध्यम वर्गातील अनेक जण सामाजिक मदत करावी अशा मनाचे आहेत पण त्यांच्यापर्यंत सेवाकार्य जितके पटकन पोहोचते तितके आंदोलकांचे काम पोचत नाही व आंदोलक नेमके समाजाच्या प्रश्नांना कसे भिडतात गरिबांचे जगणे कसे बदलते. हे तपशीलवार त्यांच्यापर्यंत जर पोहोचले तर ते नक्कीच मदत करतील.त्यासाठी मध्यम वर्गात या आंदोलनाची वेगवेगळ्या प्रकारे माहिती पोहोचवून देऊन निधी संकलन करणारे कार्यकर्ते निर्माण व्हायला हवेत. तर मध्यम वर्ग आणि कार्यकर्ते यांना जोडणारे पूल आता निर्माण व्हायला हवेत म्हणून समाजात सेवाकार्य करणे हेही महत्त्वाचे आहे व आंदोलक ही महत्त्वाची आहेत आणि दोघांनाही सारखीच मान्यता मिळायला हवी आणि सारखाच समाजाचा हात मिळायला हवा यासाठी हे आज लिहिलंय

हेरंबकुलकर्णी


सिंधुताई सपकाळ,एन. डी. पाटील आणि एकनाथ आवाड

आज एकनाथ आव्हाड यांचा जन्मदिवस.एन डी पाटील सर दोन दिवसापूर्वी गेले आणि सिंधुताई सपकाळ त्यापूर्वी काही दिवस अगोदर...
मी सोशल मीडियाचा कानोसा घेतो आहे. या तिघांच्या बाबत भावनांची तीव्रता नेमकी कशी आहे ? त्या तिघांच्या कर्तुत्वाचा तुलना करण्याचा हेतू नाही किंबहुना ती करणे मूर्खपणा ठरेल पण यातून एक वेगळा मुद्दा मला मांडायचा आहे. त्यासाठी ही तीन नावे निवडली आहेत.

सिंधुताई गेल्यानंतर मी लगेच अनेकांचे स्टेटस बघितले तर दहा पैकी सहा स्टेटस तरी सिंधुताईंच्या फोटोचे होते. नंतर सोशल मीडियाच्या पोस्ट मध्ये ही तेच दिसले. एन. डी. पाटील सर गेले तेव्हाही मी स्टेटस बघितले ते प्रमाण होते पण तुलनेत कमी होते आणि दोन्ही मध्ये फरक हा की पाटील सर यांचे स्टेटस ठेवणारे लोक हे सामाजिक चळवळीत सक्रिय असणारे, वेगळा विचार मांडणारे समाजिक कामाशी जोडले असणारे व ओळखीचे चेहरे होते पण सिंधुताईंच्या पोस्ट फॉरवर्ड करणारे स्टेटस ठेवणारे हे त्या अर्थाने विचार वर्तुळातील नव्हते तर व मध्यमवर्गातील संख्या विशेष होती.
या दोघांच्या तुलनेत आज एकनाथ आवाड यांचा जन्मदिवस तर अजिबात परिचित नाही किंबहुना कोण हे एकनाथ आवाड ? असे अनेक जण नक्कीच प्रश्न विचारू शकतील....विशेषतः शहरी भागातून

मला ही चर्चा सामाजिक काम म्हणजे काय या प्रश्नाकडे न्यावीशी वाटते. आपल्याकडे सामाजिक काम याविषयी व्याख्या आणि स्पष्टता येणे गरजेचे आहे असेच वाटत राहते. सेवाकार्य आणि संघर्ष असे सामाजिक कामाचे दोन पैलू आहेत. सामाजिक व्यवस्थेचे जे बळी आहेत अशा महिला मुले वृद्ध यांना मदत करणे अशा प्रकारचे जे काम केले जाते. त्या प्रकारच्या कामाला समाजात विशेष मान्यता आहे. मध्यमवर्ग, सर्वसामान्य लोक त्या कामात उस्फूर्तपणे मदत करतात.त्या महिला, वृद्ध, आजारी व्यक्ती यांच्या समोर दिसणाऱ्या दुःखाने त्यांच्यातील करुणा जागी होते. त्यात सर्वच धर्मांनी अशा प्रकारच्या सेवेला पुण्याची जागा दिलेली असल्यामुळे या कामाचे मोल वाढते. मदर तेरेसा बाबा आमटे यांच्या या बाबतीत केलेल्या कामाचे महत्त्व अधोरेखित झाल्यामुळे या कामाला समाजाचा खूप पाठिंबा मिळतो. सिंधुताई विषयीच्या या लोकप्रियतेचे कारण या पाठिंब्यात आहे.त्यांची करुणा समाजाची करुणा बनते.त्यांनी आधार दिलेली १४०० लेकरं समोर बघायला मिळतात. त्यातून त्यांचे दुःख हे समाजाचे बनते व बघता बघता समाज त्या प्रश्नाशी जोडला जातो..

पण संघर्ष करणारे कार्यकर्ते हे त्यांच्या कामातून हजारो-लाखो कुटुंबाचे प्रश्‍न कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या कामाच्या प्रभावाची तीव्रता कितीतरी मोठी असते परंतु ती प्रत्यक्ष दिसत नसल्यामुळे किंवा त्या लोकांच्या जगण्याचे प्रश्न नीटपणे यांच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे ते लोक यांच्या भावविश्वाचा भाग नसल्यामुळे असेल संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याची काम हे सामाजिक काम मानले जात नाही. सेवाकार्य करणारे गरिबांच्या हातात भाकरी देतात आणि संघर्ष करणारे या गरिबांना त्यांची स्वतःची भाकरी का मिळत नाही या प्रश्नावर संघर्ष करतात. केवळ गरिबांची सेवा न करता गरिबी ज्या व्यवस्थात्मक चौकटीतून निर्माण होते ती व्यवस्थात्मक चौकट बद्दलण्यावर ते लक्ष केंद्रित करतात..कम्युनिस्ट पक्षाची संपूर्ण कार्यपद्धती या प्रकारची आहे..

ND पाटील यांनी आयुष्यभर संघर्ष केला.त्या संघर्षातून हजारो शेतकरी,शेतमजूर यांचे जीवनमान उंचावले. एन्रॉन सारखा प्रकल्प रद्द केल्यामुळे राज्याचे हजारो कोटी रुपये वाचले त्यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रातील शिक्षण आरोग्य परिवहन रेशन यासारख्या सुविधा अधिक प्रभावीपणे गरिबांपर्यंत पोहोचल्या. अनेक कष्टकऱ्यांना त्यांच्यामुळे न्याय मिळाला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामातून शोषण कमी कमी होत गेले. त्यांचे काम हे थेट व्यवस्थेवर परिणाम करत होते. राजकारणाचा एकूणच दर्जा उंचावत होते. वाईट प्रवृत्तींना जागेवर थांबवत होते पण त्याची आकडेवारी त्यांनी उभ्या केलेल्या कुटुंबांचे चेहरे या प्रकारे थेट समोर येत नसल्याने किंवा अशा कामाला सामाजिक काम म्हणण्याची पद्धत नसल्याने त्यांचे मूल्य कितीतरी मोठे असते पण ते ज्या विषयांवर काम करतात;तो विषयच मध्यमवर्गाला जवळचा वाटत नसल्यामुळे नकळत त्याने मध्यमवर्ग फार भारावून जात नाही. तो फार तर एन डी पाटील यांचा प्रामाणिकपणा,आयुष्यातील सातत्य,साधेपणा,वक्तृत्व,व्यासंग, नैतिकता रयत शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या संस्थेचे चेअरमन असणे महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव अशा गोष्टींनी प्रभावित होऊ शकतो परंतु शेतकरी कामगार पक्षाचा त्यांचा अजेंडा व त्यासाठी त्यांनी केलेले काम हे मात्र मध्यमवर्गाला कदाचित प्रभावित करत नसेल..


*रामाने रावणालाच विचारले,* गुरूजी, पूजाविधी यथासांग पार पडला. आता आपण आपली दक्षिणा सांगावी. *आता या क्षणी रामायणातील एक अतिशय महान आणि अतिशय महत्वाचा प्रसंग अनेक उपस्थितांच्या साक्षीने घडत होता*. आजपर्यंत रावणाने कुणाकडूनही कांहीच घेतले नव्हते. नेहमीच केवळ दात्याच्याच भूमिकेत होता. त्याने कुणाकडून कांही दक्षिणा स्विकारण्याचा प्रश्नच नव्हता पण आज या प्रसंगी रावणातील वैदिक पंडित जागृत झाला होता.दक्षिणा घेतलीच नाही तर यजमानाला पूजेचे फळ प्राप्त होत नाही. *यजमानाला या कारणाने पूजेचे फळ मिळत नसेल तर त्याचा दोष पुरोहिताकडे जातो* हे त्याला ठाऊक होते. तो रामाला म्हणाला, *हे रामा तू कोण आहेस हे मला पूर्णपणे ठाऊक आहे*. म्हणून दक्षिणा म्हणून मी तुझ्याकडे एवढीच मागणी करतो की *माझ्या अंतिम क्षणी तू माझ्या सन्निध असावेस. या व्यतिरिक्त मला अन्य काहीही नको.*

आणि म्हणूनच *रावणाचा, युद्धात श्रीरामांच्या अमोघ बाणांच्या आघाताने मृत्यू ओढवला* तेव्हा श्रीराम रावणाच्या सन्निध उभे होते. *भगवंताच्या सान्निध्यात मृत्यू येणे ह्या सारखे दुसरे पुण्य नाही*. रावणाला हे माहित होते. किती सहजतेने त्याने आपला मोक्ष साधून घेतला होता!

*ही गोष्ट फ़ार लोकांना माहिती आहे असे वाटत नाही,* हल्ली परत वाचनात आली...म्हटले तुम्हाला देखील आवडेल वाचायला.( रसाळ वाणी .)
बऱ्याच जणांना माहित नसलेली रामायणातील ही कथा खास आपल्या ग्रुप साठी !*
🚩🙏🚩🙏जय श्री राम 🙏🚩🙏🚩


**🙏रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग ज्याचा ऊल्लेख आजपर्यंत फार कमी झाला आहे पण महत्वाचा आणि वाचण्यासारखा आहे👏.*

सीतामाईच्या शोधार्थ निघालेले श्री रामचंद्र बऱ्याच दीर्घ प्रवासानंतर आपल्या वानरसेनेसह वर्तमान *दक्षिण टोकाजवळ येऊन पोहोचले. तेथे भूमीची सीमा संपत होती आणि सागराची हद्द सुरु झाली होती*. सीतामाई येथूनच कांही अंतरावर असलेल्या श्रीलंका नामक बेटावर बंदिस्त होती. सीतेचा शोध आता संपला होता; ती कुठे आहे हे आता श्रीरामांना कळले होते. आता फक्त *सीतेला रावणाच्या कैदेतून सोडवून आणण्याचे कार्य बाकी होते*; शांततेच्या मार्गाने किंवा प्रसंगी युद्ध करून सुद्धा. *कोणत्याही कार्याला सुरुवात करण्या अगोदर भगवंताची आराधना करण्याची आपल्याकडे परंपरा असते. त्यानुसार हे कार्य आरंभिण्यापूर्वी भगवान शिवाला अभिषेक करून त्यांचे पूजन करण्याचे श्रीरामांनी ठरविले*.

झाले, शिव आराधनेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव सुरु करण्यात आली. सगळी तयारी झाली *पण पूजा सांगण्यासाठी कुणाला बोलवावे असा प्रश्न त्यांना पडला. थोडा विचार करून त्यांनी ह्या कार्यासाठी सर्वात जवळ उपलब्ध असलेल्या लंकेच्या राजाला म्हणजे रावणालाच बोलाविण्याचा निश्चय केला.* रावण केवळ एक उत्तम राज्यकर्ताच नव्हे तर प्रखर शिवभक्त, प्रकांड पंडित आणि महापराक्रमी आणि सर्वोत्तम प्रशासकसुद्धा होता. म्हणून श्री *रामाने हनुमंताला आज्ञा केली तू असाच सागरावरून उड्डाण करून लंकेला जा आणि रावणाला ह्या विधीच्या पूजनासाठी येण्याची रामाने विनंती केली आहे असा निरोप त्याला दे.*

रामाचे ते बोलणे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हलकल्लोळ उडाला. *पूजेसाठी राम आपल्या कट्टर शत्रूलाच आमंत्रण करीत होते आणि तेही ह्या पूजनाचा हेतू रावणाचा पराभव आणि विनाश करण्याचाच असूनही,रावण ही असली भलतीच विनंती मान्य करणारच नाही असे त्यांना वाटत होते.* पण रामाचा एकनिष्ठ दास असलेल्या हनुमंताने मात्र त्वरित आपल्या स्वामींची ही आज्ञा पालन केली आणि श्रीरामांचा संदेश रावणापर्यंत पोहोचविण्यासाठी लंकेला वायुमार्गे प्रयाण केले. रामाचे म्हणणे हनुमंताने रावणाला कथन केले. *ते ऐकून रावणाच्या दरबारात उपस्थित असलेल्या दैत्यांनाही नवल वाटले*. ते गोंधळून गेले होते, त्यांना ते ऐकून धक्का बसला होता. अयोध्येच्या या राजपुत्राने रावणाकडे अशी विचित्र मागणी कां केली असेल याबद्दल त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होते.

*पण रावणाने आपल्या प्रकांड पांडित्याचा, देवपूजनाचे आमंत्रण न नाकारणाऱ्या ब्राह्मणी परंपरेचा आणि भगवान शंकराप्रती असलेल्या त्याच्या परम भक्तीचा मान ठेवत रामाचे, आपल्या शत्रूचे हे निमंत्रण स्वीकारले* आणि तो हनुमंतासोबत रामाकडे आला आणि पूजाविधीच्या तयारीची पाहणी करून तो श्रीरामांकडे वळून म्हणाला, *हे अयोध्येच्या कुमारा, तुझी पूजेची सिद्धता परिपूर्ण असली तरी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना तू करू शकणार नाहीस कारण ही प्रतिष्ठापना पती-पत्नी यांनी एकत्र करायची असते*. वेदात असे स्पष्टपणे सांगितले आहे की कुणीही माणूस तो कितीही श्रेष्ठ असेल किंवा उच्च पदावर असेल तरी तो त्याच्या जोडीदाराशिवाय ही पूजा करू शकत नाही आणि *त्या पूजेचे फळ त्याला प्राप्त होत नाही.*

श्रीराम ह्यावर अतिशय शांतपणे आणि सुहास्य वदनाने उत्तर दिले, *पूजेमध्ये कसलीही न्यूनता राहू नये यासाठीच तर हे रावणा पूजेचे पौरोहित्य तुला दिलेले आहे. आता ह्यावरील उपायसुद्धा तुलाच सुचवायचा आहे. तू पंडित आहेस. तेव्हा या समस्येवरील उपाय सुचविण्याची जबाबदारी सुद्धा तुझीच आहे.*

ह्या दोन अतिशय थोर आणि उदात्त अशा राजांमधील धर्मशास्त्रीय चर्चेकडे देवादिकांचेही लक्ष लागून राहिले होते. *लंकाधिपती हा एक अतिशय महान राज्यकर्ताच नव्हता, तर तो अतिशय विद्वान सुद्धा होता. तो प्रकांड पंडित होता.* रामाने त्याला दिलेल्या उत्तराने त्याच्यातील विद्वान जागृत झाला. रावण म्हणाला, "हे रामा, मी ह्यावर उपाय नक्कीच सुचवू शकतो आणि सुचावीतही आहे *कारण मी सहकार्य न केल्याने ही पूजा राम करू शकला नाही असा आरोप माझ्यावर कुणी करू नये असे मला वाटते. मी सीतेला ह्या धार्मिक विधीसाठी लंकेहून येथे घेऊन यायला तयार आहे,* पण माझीही एक अट आहे की कार्यभाग उरकताच मी सीतेला परत माझ्याबरोबर लंकेला घेऊन जाईन आणि तू त्यासाठी हरकत घेणार नाहीस.

*रामाने रावणाचा हा प्रस्ताव लगेच मान्य केला आणि मग रामाने आपला पूजाविधी अतिशय भक्तिभावाने रावणाच्या हस्ते सशास्त्र उरकून घेतला*. त्यानंतर भारतीय परंपरेप्रमाणे रावणाने राम-सीतेला *विजयी भव* असा आशीर्वाद दिला. वास्तविक ह्याचा अर्थ युद्ध झालंच तर ह्या आशीर्वादाने रावणाने *स्वतःचा विनाश स्वतःच स्वीकार करणे हा होतो हे माहित असूनही* रावणाने परंपरेचाच आदर केला होता. इथेच *स्वार्थापेक्षा रावणाने सर्वोच्च मानवी मूल्यांना प्राधान्य दिले होते*. आता एकच औपचारिकता शिल्लक उरलेली होती ती म्हंणजे पुरोहितांचा सन्मान.








७०च्या दशकातच शेकडो गुन्हे दाखल झाले होते- धार्मिक भावना दुखावल्याचे!

ओशो आयुष्यभर वादग्रस्त राहिले- भारतात, अमेरिकेत, जगात! अनाकलनीय असं ते आयुष्यभर करत राहिले! कुठल्याही धर्माच्या, पंथाच्या राष्ट्रीयत्वाच्या, पार्टीच्या, राजकारण्याच्या सोबत त्यांचं नाव नाही लागू शकत! (ओशोंची कॉपी करू पाहणारे आजचे गावठी सद्गुरु पाहून हसायला येतं!) माणूस म्हणून एवढं स्वच्छंद जगणारा हा अवलिया 'नेटफ्लिक्स'च्या Wild Wild Countryसारख्या वेबसिरिजमधून, एकेरी बाजुतुन बिल्कुल कळू शकणार नाही! त्याला प्रत्यक्ष ऐकावं, वाचावं, त्याच्यात बुड़ुन जावं, तरच हा माणूस थोडफार हाती लागतो.

टीप: ओशोंचा मी पंखा-बिंखा अजिबात नाहीये, पण ज्ञानाच्या/ध्यानाच्या या आयत्या महासागरात डुबकी मारायची संधी मी तरी सोडणार नाही!
आणखी एक अशी व्यक्ती आहे- जे. कृष्णमूर्ति! ❤️

©Shivanand Tupkari


©Shivanand Tupkari

पुण्यात आलो तेव्हा पहिल्यांदा ज्या गोष्टी कळल्या, त्यांपैकी एक म्हणजे कोरेगाव पार्कमधलं ओशो आश्रम! ज्याची महती अशी समजली की लोक तिथं 'सेक्स'च्या आकर्षणातून जातात, आत आश्रमासारखं काही नाही, तर विदेशी लोकांच्या करमणुकीचा तो अड्डा आहे. आम्हाला वाटलं असलं तर असू दे, आपल्याला काय त्याचं! तेव्हाच कधीतरी 'रसिक'मध्ये पुस्तकं चाळत असताना ओशोंचं एक पुस्तक दिसलं- 'संभोग से समाधी तक'! कार्यकर्ता जरा आगाऊ प्रकरण असणार अशी एक गाठ मग नकळत बांधल्या गेली! ओशोना 'सेक्स गुरू' पण म्हणायचे, आणि ते बरोबरच असेल असं वाटलं, कसलीही शहानिशा न करता!

मग दिवसामागुन दिवस, वर्षांमागून वर्षं गेली. ओशो आणि माझा चुकुनही काही संबंध आला नाही. मध्ये व्हाट्सअपवर ओशोंचा 'फक' या इंग्रजी शब्दाचा नाना प्रकारे उपयोग कसा होतो, हे सांगणारा एक कॉमेडी वीडियो पाहण्यात आला, तेवढंच! खळखळून हसलो. पुन्हा काहीच नाही.

मग गेल्या वर्षी यूट्यूबने ओशोंचा एक वीडियो रिकमेंड केला. 'आर ह्यो त्योच की- सेक्स गुरू' म्हणत आनंदाने विडिओ क्लिक केला.

पांढरीशुभ्र दाढी, डोक्यावर खास टोपी, शांत, धीरगंभीर आवाज, खोलात पाहणारे डोळे आणि मोठ्या खुर्चीत बसलेले ओशो बोलायला लागले- मी श्रीमंतांचा गुरू आहे, गरीबांचा नाही! जगातले सगळे धर्म, पंथ गरीबांसाठी काम करतात ना, श्रीमंतांसाठी कोणी पाहिजे की नाही, तर ती जबाबदारी मी घेतली!

अजून एका वीडियोत- My whole work is to confuse you baby!! च्यायला बुवा 'बेबी' म्हणतोय!! 'आर असला कसला गुरू हाय ह्यो', असं पुन्हा वाटलं, पण आता इंटरेस्ट आला. रैंडम वीडियो पाहायला लागलो. ओशोबद्दल माहिती करून घ्यायला लागलो.
यथावकाश त्यांची वेबसाइट मिळाली- oshoworld.com.

त्यावर ओशोंची हजारो भाषणं आहेत. सगळ्या विषयावरची- धर्म, विश्व, उत्पत्ती, तत्त्वज्ञान, बुद्ध, कृष्ण, येशु, झोर्बा, गुरजेफ, लाओ त्सु, मार्क्स, गांधी, आंबेडकर, मेकेनिक्स, फिजिक्स, राजकारण, इतिहास, गीता, कुरआन, बायबल, समाजवाद, सेक्स, भांडवलशाही, अष्टावक्र गीता, शिवसूत्र.. असं कैच्या कै!

'अरे हा तर 'सेक्स गुरू' होता, हा एवढा अजस्र, सर्वव्यापी कसा झाला!'

मग हे ऑडियो ऐकणं सुरू झालं. सातत्य कमीच होतं, पण ऐकायचो अधूनमधून.

अजून जवळून ओशो कळला तो लॉकडाऊनच्या काळात! फ्लैटवर एकटाच.. हा 'सॉलिट्यूड' मला सोडायचा नव्हता! स्वत: सकाळ-संध्याकाळ बनवून खाणे, भांडी धूणे, सफाई करणे ही रोजची कामं. ब्लूटूथ हेडफोन्स मध्ये ओशो ऐकत ही सगळी कामं व्हायची. त्या दीड-दोन महिन्यात शंभरेक तास तरी ओशोंना ऐकलं. कसल्या कसल्या जीवनमान्यतांमध्ये आपण अडकुन पडलोत, या भवतालचे किती मोठ्या प्रमाणात आपण नकळत गुलाम बनत गेलो, याची प्रत्येक वेळी जाणीव करून देऊन मुक्त होण्याचा मार्ग दाखवणारे ओशो! पलायनवादी नव्हे, तर याच जगात राहून आपलं कार्य करत मुक्त राहण्याची कला सांगणारे ओशो!

सगळीकडे कोरोनाचा कल्ला सुरू असताना मनात कधी नव्हे एवढी शांतता स्थापन झाली होती. ओशोंच्या सगळ्या तत्वज्ञानाचा गाभा म्हणजे "ध्यान", ते अगदी तल्लीन होऊन नकळत सुरू झालं होतं. नीरव शांतता त्याच काळात अनुभवता आली. रात्री ओशोंचा आवाज अंगाईसारखा वाटायचा, तो ऐकत झोपायचं!
ओशोंना समजून घेण्याची प्रोसेस अजूनही सुरू आहे...

ओशोंना 'सेक्स गुरू'पुरतं मर्यादित करण्यात कुणाचा फायदा झाला असेल? सर्व धर्मांचे ठेकेदार, धार्मिक शास्त्रं, राजकारणी, ढोंगी समाजकारणी, तथाकथित महापुरूष या सर्वांचा फायदा!
ओशो प्रत्येकाचा बुरखा कसलीही भीडभाड न बाळगता टराटरा फाडतात.
"जगाचं जेवढं नुकसान या धर्म-महात्म्यानी, त्यांच्या उलटसुलट तत्वज्ञानाने केलंय, तेवढं कशानेही केलं नाही."

"सवाल ये नहीं है कि कितना सीखा जा सकता है… इसके उलट , सवाल ये है कि कितना भुलाया जा सकता है!"
सगळी लेबलं लावून फिरणा-या आपल्यालाही आपल्या केंद्राकडे घेऊन जातात. माणूस स्वतःला सर्वात जास्त घाबरतो, हे खरं आहे!

ज्या अमृता प्रीतमजींच्या साहित्याचा आपण उदोउदो करतो, त्याच अमृता प्रीतम ओशोंच्या सर्वात 'वादग्रस्त' पुस्तकाला 'संभोग से समाधी तक'ला प्रस्तावना का लिहितात, याचा विचार केला तरी ओशोंबद्दल किती टोकाचा दुष्प्रचार झाला, हे कळतं! ओशोंच्या मृत्यूनंतर मराठी साहित्यातल्या तीन ता-यांनी- व.पु., मंगेश पाडगावकर आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी एकत्र येऊन 'ओशो: एक महोत्सव' हा कार्यक्रम का घेतला असेल, यातूनही त्याची प्रचिती येते.

दूसरी गोष्ट- हलक्या, पूर्वग्रहदुषित काळजाला ओशो झेपु नाही शकत! लै दम लागतो हा माणूस समजून घ्यायला. एका ठिकाणी राम ग्रेट, तर दूस-या ठिकाणी राम कसा परंपरावादी, असाहसी, पत्नीलाही न्याय न देऊ शकणारा! एका ठिकाणी एखाद्या धर्मग्रंथाची महती सांगायची, तर दुसऱ्या प्रवचनात तो ग्रंथ फाडून फेकायचा! हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, या धर्मांचं सडेतोड विश्लेषण, देवदेवतांना, साधु-महंताना हाणायला कधीही मागेपुढे न पाहणा-या ओशोंवर


• तुमच्या मुलांसाठी नियामक किंवा भावनिक प्रशिक्षक व्हा. त्यांना स्वतःची निराशा आणि राग ओळखण्यास आणि व्यवस्थापित करण्यास शिकवा.
• त्यांना अभिवादन करण्यास, वळण घेण्यास, काहीही न संपवता सामायिक करण्यास शिकवा, धन्यवाद आणि कृपया म्हणणे, चूक मान्य करणे आणि माफी मागणे (त्यांना जबरदस्ती करू नका), तुम्ही प्रस्थापित केलेल्या सर्व मूल्यांचे मॉडेल व्हा.
• भावनिकरित्या कनेक्ट व्हा - हसणे, मिठी मारणे, चुंबन घेणे, गुदगुल्या करणे, वाचा, नाचणे, उडी मारणे, खेळणे किंवा त्यांच्यासोबत रांगणे.

तुम्ही शेअर केल्यास मी तुमचे आभारी आहे.
https://t.me/+jOT--IccGfw2MjY1

डॉ. लुईस रोजास मार्कोस मानसोपचारतज्ज्ञ यांनी लिहिलेला लेख.


एक शांत शोकांतिका

एक मूक शोकांतिका आहे जी आज आपल्या घरात उलगडत आहे आणि आपल्या सर्वात मौल्यवान दागिन्यांची चिंता आहे: आपल्या मुलांची.
आमची मुले विनाशकारी भावनिक अवस्थेत आहेत! गेल्या 15 वर्षांमध्ये, संशोधकांनी आम्हाला बालपणातील मानसिक आजारामध्ये तीव्र आणि स्थिर वाढीची चिंताजनक आकडेवारी दिली आहे जी आता महामारीच्या प्रमाणात पोहोचत आहे:

आकडेवारी खोटे बोलत नाही:
• 5 पैकी 1 मुलास मानसिक आरोग्य समस्या आहेत
• निदान झालेल्या ADHD मध्ये 43% वाढ
• किशोरवयीन नैराश्यात ३७% वाढ नोंदवली गेली आहे
• 10 ते 14 वयोगटातील मुलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण 200% वाढले आहे

काय होत आहे आणि आपण काय चुकत आहोत?

आजच्या मुलांना भौतिक वस्तूंनी जास्त उत्तेजित केले जाते आणि त्यांना जास्त भेट दिली जाते, परंतु ते निरोगी बालपणाच्या मूलभूत गोष्टींपासून वंचित राहतात, जसे की:
• भावनिकदृष्ट्या उपलब्ध पालक
• स्पष्टपणे परिभाषित मर्यादा
• जबाबदाऱ्या
• संतुलित पोषण आणि पुरेशी झोप
• सर्वसाधारणपणे पण विशेषतः घराबाहेर हालचाल
• सर्जनशील खेळ, सामाजिक संवाद, असंरचित खेळ संधी आणि कंटाळवाणे जागा

त्याऐवजी, अलिकडच्या वर्षांत, मुले भरली आहेत:
• डिजिटली विचलित पालक
• आनंदी आणि परवानगी देणारे पालक जे मुलांना "जगावर राज्य करू" देतात आणि जो नियम ठरवतो
• हक्काची भावना, प्रत्येक गोष्ट कमावल्याशिवाय किंवा ती मिळवण्यासाठी जबाबदार न राहता पात्र आहे
• अपुरी झोप आणि असंतुलित पोषण
• एक बैठी जीवनशैली
• अंतहीन उत्तेजना, तांत्रिक आया, त्वरित समाधान आणि कंटाळवाण्या क्षणांची अनुपस्थिती

काय करायचं?
जर आपल्याला आपली मुले आनंदी आणि निरोगी व्यक्ती बनवायची असतील तर आपल्याला जागे व्हावे लागेल आणि मूलभूत गोष्टींकडे परत यावे लागेल. हे अजूनही शक्य आहे! अनेक कुटुंबांना खालील शिफारसी लागू केल्यानंतर काही आठवड्यांनंतर तत्काळ सुधारणा दिसून येतात:

• मर्यादा सेट करा आणि लक्षात ठेवा की तुम्ही जहाजाचे कॅप्टन आहात. तुमच्याकडे सुकाणूचे नियंत्रण आहे हे जाणून तुमच्या मुलांना अधिक आत्मविश्वास वाटेल.
• मुलांना जे हवे आहे तेच नव्हे तर मुलांना जे हवे आहे ते पूर्ण संतुलित जीवनशैली द्या. आपल्या मुलांना जे हवे आहे ते त्यांना आवश्यक नसल्यास त्यांना "नाही" म्हणण्यास घाबरू नका.
• पौष्टिक अन्न द्या आणि जंक फूड मर्यादित करा.
• सायकल चालवणे, चालणे, मासेमारी, पक्षी/कीटक निरीक्षण यासारख्या क्रियाकलापांसाठी दिवसातून किमान एक तास घराबाहेर घालवा.
• स्मार्टफोन किंवा विचलित तंत्रज्ञानाशिवाय दररोज कौटुंबिक जेवणाचा आनंद घ्या, प्रत्येकाला मूल्यवान वाटू द्या
• एक कुटुंब म्हणून बोर्ड गेम खेळा किंवा बोर्ड गेमसाठी मुले खूप लहान असल्यास, फक्त ते खेळण्याचे नाटक करू द्या
• तुमच्या मुलांना त्यांच्या वयानुसार काही गृहपाठ किंवा घरातील कामांमध्ये सामील करा (कपडे दुमडणे, कपडे लटकवणे, अन्न पॅक करणे, टेबल सेट करणे, कुत्र्याला खायला घालणे इ.)
• तुमच्या मुलाला पुरेशी झोप मिळेल याची खात्री करण्यासाठी सातत्यपूर्ण झोपेची दिनचर्या लागू करा. शालेय वयाच्या मुलांसाठी वेळापत्रक अधिक महत्त्वाचे असेल.
• जबाबदारी आणि स्वातंत्र्य शिकवा. सर्व निराशा किंवा चुकांपासून त्यांचे अतिसंरक्षण करू नका. गैरसमज त्यांना लवचिकता निर्माण करण्यास आणि जीवनातील आव्हानांवर मात करण्यास शिकण्यास मदत करेल,
• तुमच्या मुलांची बॅकपॅक सोबत ठेवू नका, ते विसरलेले गृहपाठ घेऊन जाऊ नका, केळी किंवा संत्री सोलू नका जर ते स्वतः करू शकत असतील (4-5 वर्षे). त्यांना मासे देण्याऐवजी त्यांना मासे शिकवा.
• त्यांना प्रतीक्षा करण्यास आणि समाधान देण्यास विलंब करण्यास शिकवा.
• "कंटाळवाणेपणा" साठी संधी द्या, कारण कंटाळवाणेपणा हा क्षण असतो जेव्हा सर्जनशीलता जागृत होते. मुलांचे नेहमी मनोरंजन करण्यासाठी जबाबदार धरू नका.
• कंटाळवाणा उपचार म्हणून तंत्रज्ञान वापरू नका किंवा निष्क्रियतेच्या पहिल्या सेकंदात ते देऊ नका.
• जेवणादरम्यान, कार, रेस्टॉरंट, शॉपिंग सेंटरमध्ये तंत्रज्ञान वापरणे टाळा. या क्षणांचा उपयोग मेंदूंना ते मोडमध्ये असताना कसे कार्य करावे हे जाणून घेण्यासाठी प्रशिक्षण देऊन समाजीकरण करण्याच्या संधी म्हणून करा: "कंटाळवाणेपणा"
• जेव्हा ते कंटाळले असतील तेव्हा त्यांना क्रियाकलाप कल्पनांसह "कंटाळ्याची बाटली" तयार करण्यात मदत करा.
• मुलांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांना स्व-नियमन आणि सामाजिक कौशल्ये शिकवण्यासाठी भावनिकदृष्ट्या उपलब्ध व्हा:
• डिजिटल विचलित होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळी जेव्हा मुलांना झोपायला जावे लागते तेव्हा फोन बंद करा.




संकटांचे आभाळ ज्या अर्थी इतके भरुन आले आहे त्या अर्थी सुखाचा श्रावण ही अगदी जवळपास असणार अशा आशेवर जगणे हेच जीवन.
@marathilekhan

20 last posts shown.

1 686

subscribers
Channel statistics