TGStat
TGStat
Type to search
Advanced channel search
  • flag English
    Site language
    flag Russian flag English flag Uzbek
  • Sign In
  • Catalog
    Channels and groups catalog Search for channels
    Add a channel/group
  • Ratings
    Rating of channels Rating of groups Posts rating
    Ratings of brands and people
  • Analytics
  • Search by posts
  • Telegram monitoring
💰 Marathi Money | मराठी मनी

8 Aug 2021, 09:01

Open in Telegram Share Report

आता तरी करा गुंतवणुकींचा पुनर्विचार
श्री. उदय काशिनाथ पिंगळे


कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर अनेक पारंपरिक गृहितकांचा कस लागत असून त्यातून गुंतवणूक या विषयाची सुटका नाही. संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्याने सर्वच क्षेत्रांची अपरिमित हानी होत आहे. यातून बाहेर पडून नियमित व्यवहार चालू होऊन मागणी वाढायला कालावधी लागेल. यावर मात करण्यासाठी योजलेल्या उपायांचे परिमाण दुहेरी असून यामुळे व्याजदर कमी होऊन महागाई वाढू शकते. महागाई वाढली की क्रयशक्ती कमी, मागणी कमी असे हे दृष्टचक्र आहे. एक सजग गुंतवणूकदार म्हणून या दृष्टीने आपल्या सर्वच गुंतवणुकींचा पुनर्विचार करणे जरुरीचे झाले आहे.


आपली गुंतवणूक विविध साधनांत विभागलेली असून त्यातून चांगला परतावा, सुरक्षितता आणि रोकडसुलभता हवी. असे निकष पूर्ण करणारे एकही गुंतवणूक साधन नाही. परतावा आणि धोका यांचे प्रमाण व्यस्त असल्याने गुंतवणूकदारांनी उपलब्ध पर्याय तपासून काही प्रमाणात अन्य पर्यायांचाही विचार करायला हवा. अजिबातच धोका पत्करायचा नाही हे अधिक धोकादायक असून उपलब्ध पर्याय तपासून पाहुयात.
★ विविध बचत, अल्पबचत योजना, सरकारी कर्जरोखे : यातून मिळणारा परतावा ५.५% ते ७.७५% एवढा आहे. यातील सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (७.१%) सुकन्या समृद्धी योजना (७.६%) यातील परतावा करमुक्त असल्याने अप्रत्यक्ष परतावा वाढतो परंतू सुकन्या समृद्धी योजना सर्वांसाठी नाही. दोन्ही योजनांत वार्षिक गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा दीड लाख आहे. सहामाहीस व्याज देणारे ७.७५% व्याजदराचे भारतीय रिझर्व बँकेचे कर्जरोखे सुरक्षित असून याची किमान मर्यादा ₹१० हजार असून त्यावर कमाल मर्यादा नाही.

★ सोने : हा एक गुंतवणुकीचा पर्याय असला तरी याकडे गुंतवणूकीपेक्षा त्याचे भावनात्मक मूल्य जास्त आहे. गुंतवणूक म्हणून सोने घेणारे ९९% लोक सोने कधीच विकत नाहीत. चलनावरील विश्वास कमी झाल्यास मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होते. जागतिक मंदीमुळे भविष्यात सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून अल्पकाळात विक्री करून फायदा मिळवणाऱ्यासाठी यात गुंतवणूक संधी असल्याने ई टी एफ/ ई गोल्ड चा विचार करता येईल.
★ स्थावर मालमत्ता: यात सध्या करावी लागणारी गुंतवणूक ,मिळणारा परतावा पाहता हा पांढरा हत्ती ठरण्याची जास्त शक्यता असल्याने सर्व दृष्टिकोनातून विचार करूनच निर्णय घ्यावा.
★ म्युचुअल फंडातील गुंतवणूक : "म्युचुअल फंड सही है।" च्या जाहिरातीने आणि अन्य ठोस पर्यायांच्या अभावाने, या योजनांनी घरात आणि प्रत्येकाच्या मनात प्रवेश केला आहे. ही सर्वात फसवी जाहिरात आहे. यातून आपल्याला काही करावे लागत नाही, पैसे आपोआप वाढतात असा काहीसा बोध होतो. वेळोवेळी ही गुंतवणूक तपासून, जर अपवादात्मक परतावा मिळत असेल तर तो काढून घेऊन, सुरक्षित आणि करमुक्त परताव्याच्या ठिकाणी ठेवला तरच आपल्या खऱ्याखुऱ्या गरजेला तो उपयोगी पडेल. सध्या यातील गुंतवणूक काढून किंवा एस आय पी बंद करून आपले नुकसानच होणार. या गोष्टी पूर्वपदावर येण्यास तीन वर्षाचा कालावधी लागू शकतो. डेट फंड, जे मुदत ठेवीस पर्याय म्हणून समजले जातात त्यांनी गुंतवणूक केलेले कर्जरोखे अनुत्पादक मालमत्ता होण्याच्या शक्यतेने सुरक्षित समजणे कठीण वाटते.

2.6k 0 4
Catalog
Channels and groups catalog Channels compilations Search for channels Add a channel/group
Ratings
Rating of Telegram channels Rating of Telegram groups Posts rating Ratings of brands and people
API
API statistics Search API of posts API Callback
Our channels
@TGStat @TGStat_Chat @telepulse @TGStatAPI
Read
Академия TGStat Telegram Research 2019 Telegram Research 2021 Telegram Research 2023
Contacts
Справочный центр Support Email Jobs
Miscellaneous
Terms and conditions Privacy policy Public offer
Our bots
@TGStat_Bot @SearcheeBot @TGAlertsBot @tg_analytics_bot @TGStatChatBot