★ शेअर्समधील गुंतवणूक : दीर्घकाळात शेअरबाजाराने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. फार थोडे लोक याकडे गुंतवणूक या दृष्टीने पहातात याबद्दल लोकांचे गैरसमज अधिक असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. अनुभव, थोडीफार समज, पैसे, जोखीम घेण्याची, त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, आपण कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार आहोत याची ओळख, चुकांतून शिकून त्याच चूका न करणे, तीव्र मनोबल हे याचे भांडवल असून यासाठी कोणत्याही विशेष शैक्षणिक पात्रतेची गरज नाही. कॉफी कॅन पोर्टफोलिओ या तंत्राने जगभर अनेकजण गुंतवणूक करतात ते उपलब्ध आहे. सर्वसाधारण दैनंदिन जीवनात मागणी असलेल्या वस्तू, सामान्यज्ञान याचा वापर करून तसेच तंत्रशुद्ध पद्धतीचा वापर करून अल्पकालीन, मध्यम आणि दीर्घकालीन गुंतवणूक करून यातून आपली मुद्दल न गमावता आकर्षक परतावा मिळवणे शक्य असून याकडे कोणतेही पूर्वग्रह न ठेवून पाहावे. गुंतवणूकदारांना कोणताही पर्याय नसल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बाजाराकडे चालू असलेला ओघ चालूच राहणार असून, तेजी असो अथवा मंदी त्यातून कायम संधी उपलब्ध आहेत. सध्याच्या परिस्थितीत व त्यानंतर कोणत्या क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकेल याचा विचार करून त्यातील आघाडीच्या कंपन्यात आता गुंतवणूक केल्यास फायदाच होईल. फक्त बाजाराने सध्या तळ गाठला आहे का? यासंदर्भात कोणीच भाकीत करू शकत नसल्याने एकरकमी गुंतवणूक न करता अर्धी गुंतवणूक करून खालच्या टप्यावर गुंतवणूक थोडीथोडी वाढवून, वाढलेल्या भावात थोडी विक्री करावी म्हणजे बाजारात होणाऱ्या भावाच्या फरकाने आपला जीव वरखाली न होता भावातील फरक ही खरेदी विक्रीची संधी वाटेल. ज्यांना मुदत ठेवीप्रमाणे डिव्हिडंडमधून परतावा हवा आहे आणि भावात होणाऱ्या फरकाने थोडाफार फायदा अपेक्षित आहे अशा गुंतवणूक संधी सध्याच्या बाजारात उपलब्ध आहेत. गुंतवणूकदारांना फायदा न होण्याचे मुख्य कारण हे कोणत्याही गोष्टींची तीव्र प्रतिक्रिया आहे. भांडवल बाजाराने जेव्हा तळ गाठला तेथून दीड दोन वर्षात भरारी घेतली आहे यावेळी हा काळ कदाचित वाढू शकेल.
★ गुंतवणुकीचे आधुनिक पर्याय : यात विविध शेअर्स, इंडेक्स, करन्सी, इंटरेस्ट रेट, कामोडीटीज यांचे डेरीव्हेटिव्हीज पर्याय यांचा समावेश असून यासाठी अभ्यासाची गरज असून यातील किमान गुंतवणूक अधिक असून यासाठी अधिक अभ्यासाची जरुरी आहे. किमान ₹ ५० लाख फोलिओ/पैशांच्या माध्यमातून उपलब्ध करून देणाऱ्या फी आकारून सल्ला देणारे गुंतवणूक व्यवस्थापन करून देणारे तज्ञ उपलब्ध आहेत.
सर्वात महत्वाचे -
घरातील कमावत्या व्यक्तींचा पुरेसा मुदतीचा विमा आणि प्रत्येकाचा आरोग्यविमा असणे हे अत्यंत आवश्यक असून ही एकमेव गुंतवणूक फुकट जावी याच हेतूने केली जाते. ती फुकट जाणे याचा अर्थ आपण जगणे ,आरोग्य चांगले रहाणे असा असून याबाबतीत तडजोड करू नये.